नासिक महानगरपालिका नाशिक अतिक्रमण विभाग मुख्यालय अतिक्रमण निमुर्लन मोहिमेचे आयोजन करुन काढण्यात आलेल्या अतिक्रमणांची माहिती


06/03/2018
सातपूर संयुक्त

सातपूर विभागातील सातपुर बसस्टॉप ते गुंजाळ पार्क ते अंबड लिंकरोड ते अशोकनगर बसस्टॉप ते बारदान फाटा पावेतो रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यावसायिक, विक्रेते, हॉकर्स यांचे हातगाडया, टेबल, खुर्च्या व इतर तत्सम वस्तु असलेले सुमारे 2 ट्रक साहीत्य जप्त करण्यात आले.

वरील कारवाई ही मा. आयुक्त श्री. तुकाराम मुंढे सो, मा. अति. आयुक्त (2) श्री. किशोर बोर्डे सो. यांचे मार्गदर्शनानूसार मा. उपआयुक्त (अति.) श्री. आर.एम. बहिरम यांचे सूचनेप्रमाणे सौ. एन.एम. गायकवाड (विभा.अधिकारी, सातपूर), श्री. पी.पी. पगारे (सहा.अधिक्षक, अति./सातपूर), अतिक्रमण विभागाचे एकूण 2 पथके व दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन पोलीस बंदोबस्त यांचेसह उपरोक्त नमूद अतिक्रमणे/अन.बांधकामे काढण्यात आलेली आहेत.

यापूढे सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
तसेच शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्कींगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमीत असलेली बांधकामे काढुन घेणेबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहिर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या नागरीकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे काढुन घेतलेली नाही, त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेत येईल, तेव्हा ज्यांनी-ज्यांनी असे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली आहेत. त्यांनी ती सत्वर काढून घेऊन मनपास सहकार्य करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।