"असे ही एकदा व्हावे" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा !


नरेंद्र पाटील,
संपादक-न्यूज मसाला,नासिक
+91 07387333801

पुणे(२६)::- "असे ही एकदा व्हावे" या आशेवर प्रत्येक व्यक्ती जीवन व्यथित करीत असतांना तो अनेक नात्यांना जपत त्यांची जबाबदारी पेलत, गुंतागुंतीच्या आयुष्यात रंग भरित असतो. अशा या नात्याच्या याच आशावादी पैलुंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंट निर्मित आणी सुश्रुत भागवत दिग्दर्शित "असे ही व्हावे" हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
प्रेमाची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यांत आला आहे. अवधूत गुप्तेंच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाची गाणी तयार झालीत. रोमँटीक गाणं, एक गझल व एक शास्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. या गाण्यांमधील "किती बोलतो आपण" या गाण्याला किर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तसेच "भेटते ती अशी" या गाण्यासोबत "यु नो व्हाट" या कवितेने रसिकांना प्रदर्शनापूर्वीच मोहीनी घातली आहे. ही कविता उमेश कामत व तेजश्री प्रधान ने म्हटली आहे. तीला वैभव जोशी ने शब्दबद्ध करतांना या कवितेचे गाण्यांत रूपांतर न करता दोन्ही कलाकारांकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने साधली.ही कविता म्हणजे उमेशच्या कल्पनेतील तेजश्री कशी असावी हे दाखवणारी असुन सोशल नेटवर्कींग साईटसवर तुफान प्रसिद्धी मिळवत मंत्रमुग्ध करणारी ठरली आहे.
    या सिनेमांत तेजश्री माँडर्न लुक द्वारे सर्वांसमोर येत असुन तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच आहे. उमेशने साकारलेली व्यक्तीरेखा आव्हानात्मक अशी असावी अशी आतापर्यंत आलेल्या गाण्यांमधून व टीझरमधून दिसते.
       हा निव्वळ सिनेमा वाटत नसून गाण्यांच्या मैफिलीचाही आनंद देणारा ठरेल असा वाटतो.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!