भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लिबर्टी ब्रँड चे नासिकच्या बाजारपेठेत पदार्पण ! 'आराम के लिए फँशन !

लिबर्टी" चे नाशिक मध्ये पदार्पण
नाशिक (११)::-- पादत्राणे उद्योगातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा  ब्रँड  असलेल्या "लिबर्टी "ने  नाशिकच्या बाजारपेठेत  पदार्पण केले असून, कॉलेजरोड वरील श्रद्धा पेट्रोल पंपाजवळील बी  स्क्वेअर येथे कंपनीने आपले भव्य दालन सुरु केले आहे. ६४ वर्षापासुन लिबर्टी कंपनी या क्षेत्रात असुन आजमितीस अतिशय नवीन ,फॅशनेबल स्वरूपाची पादत्राणे आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत अशी माहीती आर.के.साधू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
"आराम के लिए फॅशन" ही टॅग लाईन तंतोतंत  सांभाळत कंपनी आपल्या ग्राहकांची आवड निवड जपत उत्कृष्ट पद्धतीचे फॅशनेबल आणि तेवढेच आरामदायी पादत्राणे वेळोवेळी बदल करत  ग्राहकांसाठी बाजारात आणते . एस एस १८ ही नव्याने येत असलेली श्रेणी आणि कंपनीची  इतर सुमारे ४५० पेक्षा जास्त उत्पादने नाशिक मधील दालनात  कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत . पुरुषांकरिता फॉर्मल आणि कॅज्युअलसाठी "कुलर्स" , स्पोर्ट्स मध्ये फोर्स १०, महिला वर्गासाठी खास "सेनोरिटा "  मुलांसाठी  "फुटफन " ही उत्पादने येथील खास आकर्षण आहेत . हीलर्स सारख्या आरामदायी पादत्राणांमध्ये वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरून ते तयार करण्यात आले आहेत. फॉर्च्युन सारखी पुरुषांसाठीची फॉर्मल पादत्राणे पुरुषांचा चालण्याच्या वेगाला साजेशी आणि ऐटदार आहेत. लिबर्टीची ही उत्पादने त्यांच्या गेल्या पाच दशकातील वेगळेपण दर्शवतात . लिबर्टी शूज कंपनी ही एका दिवसात चामड्यापासून ५० हजार जोडी बनवणाऱ्या अग्रगण्य  कंपन्यांपैकी एक आहे . आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधूनही लिबर्टीच्या उत्पादनांना प्रचंड मागणी असते. जगभरात लिबर्टीचे १५० हुन अधिक डिस्ट्रिब्युटर्स, सुमारे ४०० एक्सक्लुसिव्ह शोरूम्स  आणि ६००० पेक्षा जास्त मल्टिब्रँड आउटलेट्स असून , कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० करोडहून अधिक आहे.

www.libertyshoesonline.com


Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!