मुका घ्या मुका ! राज्यातील सहा जागांवरील निकाल ! सत्तासुंदरीने घेतला मनसेचा व दोन्ही काँग्रेसचा मुका ! वर्चस्व नसल्याने मिळालेल्या भाजपाच्या पाठिंब्याने सेनेला एक जागा !

काय वाटते ?
राज्यभरांतील सर्व सहा जागांवर भाचपाचा धुव्वा, सेनेला मुंबईतील एक जागा जिथे भाजपाचे वर्चस्व नव्हते तेथे भाजपाने दिलेल्या पाठींब्याने !
सोलापूर व अहमदनगर काँग्रेसकडे !
पुणे व उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेच्या पारड्यात !
आणी---------
नासिक::-मनसेच्या गटनेत्या सुरेखा भोसले यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त  झालेल्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत अँड.वैशाली भोसले २३२२ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.
        तशी हि निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असतांना शिवसेनेची सत्तासुंदरीचा "मुका" घेण्याचा मनसुबा धुळीस मिळविणे हे दोन्ही काँग्रेसने ठरविल्या प्रमाणे घडले. याचा शिवसेनेच्या नवनिर्वाचित शहरप्रमुखांना मोठा धक्का मानला जात असुन मध्यंतरीच्या काळात मराठा क्रांती मोर्चा व पुन्हा तोच विस्मरणांत गेलेला मुद्दा गांढुळाच्या "मुका" ने एेनवेळी उकरून काढण्याचे कसब शब्दच्छल करून साधण्याचा खटाटोप करून सेना नेत्रुत्वाने का केला हे कोडे आता सोडविणे नासिक सेनेच्या पुढील मोठे आव्हान समजल्यास वावगे ठरू नये असा हा पोटनिवडणुकीचा निकाल आहे.
        सत्ता सुंदरीने मनसेचा "मुका" घेण्याइतपत मनसे ची ताकद सध्याच्या परिस्थितीत नव्हती असे वाटत असतांना हा विजय नवीन समीकरणांची नांदी ठरल्यास भाजपा-शिवसेनेला पुढील वाटचालीस कष्टप्रद होणारा ठरेल यांत कुणाचेही दुमत असावे असे वाटत नाही, आमदार देवयानी फरांदे यांना या निकालाचे विश्लेषण वा आत्मचिंतन करावे लागेल, आत्मचिंतनाची नासिक भाजपालाही तितकीच गरज आहे, हा निकाल फक्त आमदार फरांदेंपुरता मर्यादित राहू नये. ज्यांनी मनपा सार्वत्रिक निवडणुकीत सेना-भाजप युतीचा घरोबा तोडला त्यांचा निर्णय आजच्या निकालांत आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
          शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार व यंत्रणा करित असलेले काम प्रशंसनीय जरी होते तरी त्यांना अंतर्गत बंडाळी जी वरिष्ठ सेना नेत्यांकडून एखाद्या समाजाला टार्गेट करण्याची झाली त्याचे प्रत्यंतर या पोटनिवडणकीतून आले अशी भावना मतदारांमध्ये दिसुन आली.
         राजकीय निवडणुक कोणतीही असो तिच्यात एकच उमेदवार निवडून येतो, बाकी हरतात मात्र निवडून येणाऱ्याचे शक्तीस्थान कोणते,कसे व का याची चर्चा ओघाने येते, सर्व जाती धर्माच्या मतदारांचा हा प्रभाग असुन जास्त प्रमाणांत मराठा समाजाची मते व मनसेसहित दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे बाकी मतदारांशी असलेले हितसंबध लक्षात घेता जो निकाल आला तो वरील सर्व कारणांशी जुळविल्यास यथार्थ समजावा लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।