अरेरे,, कसले कसले अनुदान खाणार, शेतकऱ्यांचा संताप ! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !!

पालम तालुक्यातील उमरा येथील तलाठ्याने गावातील पुढाऱ्यासोबत संगनमत करत लाखो रुपयांचे गारपीटीचे अनुदान एकाच कुटुंबातील १० सदस्यांच्या नावे टाकून दिले. तसेच उमरा या गावच्या शिवारात एक गुंठाही जमीन नसताना त्याचेही नाव बागायतादार शेतकऱ्यांच्या यादीत टाकून पात्र शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी उमरा येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून गावच्या पुढाऱ्यांसह दोषी असलेल्या तलाठ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तलाठ्याच्या या महाप्रतापामुळे पालम तालुक्यातील शेतकरी वर्गात उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. उमरा येथील आनंत मनोहर उगले, पंकज ज्ञानेश्वर चव्हाण, किशन सखाराम काचूळे, अनुरथ लिंबाजी चव्हाण, ज्ञानेश्वर विश्वनाथ शिंदे, बालाजी तुकाराम काचूळे, जब्बार अकबर पठाण, सुदाम बालासाहेब उगले, नारायण हारजी उगले, चंद्रकांत मंचक पौळ, केशव सुभाष उगले, पांडुरंग लिंबाजी उगले, पंडित मुंजाजी उगले,माधव रतन गिरी, उत्तम किशनराव गादगे, लोकश विठ्ठल उगले आदी शेतकऱ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली लेखी तक्रार मांडली. यात म्हटले आहे की, गावातील काही पुढारी शेतकऱ्यांच्या संगमणताने तलाठी आहेर यांनी गारपीटीचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना दिले नाही. याचवेळी एकाच कुटुंबातील १० सदस्यांच्या नावाने २ लाख ४८ हजार ४४४ रुपयांचे अनुदान टाकले. तसेच त्यांच्याच इतर नातेवाईकांच्या नावे १ लाख १७ हजार ४१५ रुपयांचे अनुदान टाकण्यात आले. तसेच त्यांचे बाहेरगावचे मित्र नंदकुमार श्यामराव, गोवर्धन ज्ञानोबा शिंदे व ज्ञानोबा तुकाराम शिंदे यांना उमरा शिवारामध्ये एक गुंठाही जमीन नसताना त्यांची नावे बागायतदार शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेली आहेत. शेत नसताना अनुदान काढणे हा सर्वात मोठा विनोद तलाठी आहेर यांच्यामुळे झाला असून शेतकरीवर्गात यामुळे उलट-सुलट चर्चा होत आहे. या शिवाय गारपीट अनुदानाच्या बागायतादार व कोरडवाहूच्या यादीत एकाच व्यक्तीची नावे डबल-डबल समाविष्ठ करण्याचा महाप्रतापही झाला आहे.उमरा येथ गारपीट अनुदानाची यादी शेतकऱ्यांच्या हाती पडताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तलाठी आहेर आणि गावच्या पुढाऱ्याने केलेला हा गारपीट घोटाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वरील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे.

अनामिक-सौजन्याने

Comments

Popular posts from this blog

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!