अखिल भारतीय समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे संपन्न ! सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर दौरे करणार-छगन भुजबळ, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे संपन्न !
          मुंबई, दि.२४:- बहुजन समाजातील लोकांनी नाशिक सह राज्यभरात विविध मोर्चे काढले या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व जाती धर्मातील व विविध राजकीय पक्ष संघटना सहभागी झाले होते. या सर्व मोर्चेकऱ्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.यावेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रभर  दौरे करावे अशी उपस्थितांनी साद घातली. यावेळी आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरे करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
            आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणी बैठक मुंबई येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
                यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,आ.पंकज भुजबळ,समता परिषदेचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह,उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके,डॉ.कैलास कमोद, माजी आ.जयवंतराव जाधव,आ.लक्ष्मणराव तायडे,आ. तुकाराम बिडकर,आ. तोतरांम कायंदे, माजी आ. हरिराम वरखेडे, दिलीप खैरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
           यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की,समता परिषदेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षांनंतर आपण भेटलो सगळ्यानी या अडीच वर्षाच्या काळात मोलाची साथ दिली आंदोलन मोर्चे काढले त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार मानले. तसेच यापुढील काळातही आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.
           भुजबळ म्हणाले की,समता परिषद ही बहुजन समाजाची संघटना आहे. यात सर्व जाती धर्माचे लोक असून हे सर्व पदाधिकारी म्हणून तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर काम करत आहे.ज्यांना समतेचे विचार मान्य आहे ते सर्व लोक या संघटनेत काम करू शकतात. त्यामुळे ही संघटना वाढविण्यासाठी जुन्या नव्या पदाधिकाऱ्याना सोबत घेऊन सर्वानी काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या.  संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हावार प्रशिक्षण शिबिरे घेण्यात यावे व नवीन शाखा देखील निर्माण करण्यात याव्यात यातून समतेचे विचार जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन देखील त्यांनी केले. त्याचप्रमाणे सर्व घटकांपर्यंत समतेचे विचार पोहचण्यासाठी आगामी काळात विद्यार्थी,युवक आघाडी तयार करण्यात येईल असे भुजबळ यांनी सांगितले.
             यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या प्रा.दिवाकर गमे यांचे काम अधिक चांगले असल्याचे सांगून त्यांचे कौतूक केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी. एमपीएसएसी व युपीएससीच्या परीक्षामध्ये मागासवर्गीय आणिओबीसी विद्यार्थ्यांना डावलले जात आहे. या सर्व उच्च पदस्थ परीक्षामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे.यासाठी प्रसंगी आंदोलन देखील आपल्याला करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
             ते पुढे म्हणाले की, देशात ओबोसींचे संघटन करून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र सरकार कडून अद्यापही जातनिहाय आकडेवारी घोषित करण्यात येत नसल्याने यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.      
            मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह म्हणाले की,आज संपूर्ण देशात भययुक्त स्थिती आहे. मध्य प्रदेशात गेल्या पंधरा वर्षापासून आमचे शोषण सुरू आहे. छोट्या छोट्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उरतण्याची वेळ येते. त्यामुळे मध्य प्रदेश मध्ये छगन भुजबळ यांनी येऊन दौरा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीला आजही दिशा देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व समाजाला संघटित करण्याची आज आवश्यकता आहे. शासन  व्यवस्थेत समाजाला संधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. फुले शाहू आंबेडकर,सम्राट अशोक यांचे विचार देशातील तरुणांना घडवू शकतात त्यामुळे यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अधिक बळकट व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..
           प्रा.हरी नरके म्हणाले की, ओबीसी शिष्यवृत्ती,विद्यार्थ्यांचे प्रश्न व आरक्षणाचे प्रश्न पुढे आले आहे.एमपीएससीच्या परीक्षेत ओबीसीना डावलण्यात येत आहे. असे असतांना खुल्या प्रवर्गातून विद्यार्थी परीक्षा देऊन पास झाले. मात्र ४२ मुलांना अद्यापही नोकरीवर रुजू केले नाही. खुल्या प्रवर्गातील जागा या सर्व जाती गटातील लोकांसाठी आहे. त्यामुळे यावर सगळ्यांचा अधिकार आहे यासाठी लढा दिला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी लढा दिला. मात्र जातनिहाय जनगणना आकडेवारी घोषित करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. ओबीसींच्या बजेट मध्ये देखील निधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।