काँग्रेस नेत्रुत्वाशी शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून थेट संपर्क !! बूथ स्तरावर काँग्रेस बळकट करणार-शरद आहेर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून कॉंग्रेस बूथ स्तरावर बळकट करणार .....
     नाशिक (२९)::-काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी मांडलेली शक्ती प्रोजेक्ट मधील नोंदणीचा शुभारंभ काट्या मारुती चौक जुना आडगाव नाका पंचवटी येथील विजय राऊत यांच्या कार्यालया जवळ रविवारी दि.(२९) रोजी सकाळी करण्यात आला असून कॉंग्रेस पक्षाच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्ती नोंदणी चौका चौकात राबविण्यात येणार असून कॉंग्रेस जोडो अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात आला असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची ताकद उभी करणार असल्याचे मत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी व्यक्त केले.
              काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आहे. जो प्रत्येक गाव,शहर, तालुक्यात, जिल्हात राहत असून सर्व कार्यकर्त्यांना शक्तीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम करायचे असून त्याचा आवाज व विचार ऐकायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करावी असे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले.
        शक्तीच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्ते मजबूत होणार असून महिला व युवकांनी देखील जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन नगरसेविका व महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वत्सला खैरे यांनी व्यक्त केले.उद्योजक रमेश पवार,रामप्रसाद कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष शहर अध्यक्ष शरद आहेर,उपाध्यक्ष विजय राऊत ,महिला अध्यक्षा वत्सला खैरे,जिल्हा सरचिटणीस सुनील आव्हाड,रमेश पवार,ओबीसी सेलची प्रदेश सचिव रामप्रसाद कातकाडे,सरचिटणीस अनिल कोठुळे ,ज्येष्ठ नेते उत्तमराव बडदे,पंचवटी महिला ब्लॉक अध्यक्ष कल्पना पांडे,मध्य ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे,ज्युली डिसुजा,अरुण दोंदे,सुनील सूर्यवंशी,काशिनाथ बोडके ,युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव,आकाश घोलप,विश्वनाथ काळे,कैलास सैनी,राजेंद्र गुरव,चारुलता शिरोडे,वंदना पाटील,प्रमोद विसपुते ,संजय पुंड,प्रवीण जेजुरकर,जयेश पोकळे,दर्शन पाटील,संतोष सोमवंशी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी ब्लॉक चे अध्यक्ष उद्धव पवार यांनी केले होते.आभार शहर कॉंग्रेस सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी केले

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!