सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण नासिकच्या सुविचार मंचावर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक शुक्रवार, दि. १० ऑगस्ट २०१८

सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण

अभिनेते स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर यांच्यासह ९ जणांना आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुविचार गौरव   
         नाशिक दि. १० (प्रतिनिधी) :-सुविचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी दिली आहे.   

समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व के.बी.एच.आय.एम.आर. या व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने आलेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.       

          यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु (वैद्यकीय), विश्वास ठाकूर (सामाजिक), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यावेळी “जीवन गौरव” पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.

          सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।