गोबर व रूबेला आजार २०२० पर्यंत निर्मुलनाचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट ! जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम राबविणार ! आरोग्य विभागाला जनजाग्रुतीचे डाँ.गिते यांचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

नाशिक : केंद्र शासनाने सन २०२० पर्यंत गोबर व रुबेला आजाराचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने गोबर व रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिली. या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र शासन गोबर व रुबेला यासाठीची लस विविध राज्यामध्ये नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करीत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी आदि उपस्थित राहणार आहेत. तसेच २८  ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाभरात जनजागृती करण्याचे निर्देश डॉ.गिते यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।