छत्रपती खा. युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते तुषार जगताप आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

छत्रपती खा.संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते तुषार जगताप यांना "आरोग्यदूत" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

      नाशिक ::- आडगाव येथील एका सभेप्रसंगी छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय काम तसेच एक हजारावरून अधिक रुग्णांना मोफ़त उपचार मिळून दिले याची दखल घेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तुषार जगताप यांना आरोग्यदूत या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री नामदार अर्जुन खोतकर, आणासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा दर्जा कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील उपस्थित होते.
      कार्यक्रमात बोलताना छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांनी, छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगडजाती,बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन काम करत होते आणि सर्व जातीधर्माच्या लोकांच्या हिताचं, संरक्षण देण्याचं काम करत होते. म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी देखील हाच विचार जोपासावा, तुषार जगताप हा मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक म्हणून काम करत असताना मराठा समाजाच्या हितासाठी लढत असला तरी, आरोग्यदूत म्हणून तो सर्वच जातीधर्माच्या लोकांना उपचारासाठी धावून जातो आणि लागेल ती मदत करतो. यासाठी संताच मन, महामानवाची वृत्ती लागते आणि ती तुषार जगताप यांच्यात या निमित्ताने बघायला मिळते आहे असे मत व्यक्त केले.
      कार्यक्रमात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शिवाजी सहाणे, उद्धव निमसे,शीतल माळोदे,मुजाहिद्दीन शेख, विष्णू महाराज,अमित जधाव,शरद तुंगार,राजन घाग, पराग मुंबरेकर आधी हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
         छत्रपती खा.संभाजीराजे भोसले, छत्रपती खा. उदयनराजे भोसले, राज्याचे वैधकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा ध्यास आम्ही घेतलेला आहे. कोणत्याही जातीपातीचा रुग्ण असो, त्या रुग्णाला औषध,उपचार,शस्त्रक्रिया विनामूल्य,अल्पदरात मिळून देणार आहेत. याही पुढे ते काम चालू राहणार आहेत अशी माहीती देण्यात आली.     
नाशिक मराठा क्रांती मोर्चा वतीने  लवकरच शहरात उपचारसाठी दाखल रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना  मोफत राहाण्याची,जेवण्याची तसेच अम्ब्युलन्स सेवा पुरवण्यात येणार आहेत.  ज्या रुग्णांना पैसे अभावी उपचार करता येत नसेल अशा रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा मोबाईल क्रमांक ९०११७३७३७३ , त्यांना उपचार मिळून देण्याचा संपूर्ण प्रयत्न करण्याचे आरोग्यदूत तुषार जगताप यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!