काँग्रेसच्या त्यागामुळे देश एकसंघ राहीला-पत्रकार हेमंत देसाई. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

कॉंग्रेसच्या त्यागामुळे देश एकसंघ ........

नाशिक : कॉंग्रेस पक्षाला त्यागाची मोठी परंपरा आहे महात्मा गांधी,पंडित नेहरू,लालबाहदूर शास्त्री अशा सर्वांनी देशाच्या उभारणी मध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या कर्तबगारी मुळे देशांमध्ये शिक्षणाची पाळेमुळे रोवली गेली.त्यांच्या सोबतीला पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे अंतरराष्ट्रीय धोरण व विकासाची दृष्टीमुळे भारत देश प्रगती पथावर आहे पण कॉंग्रेसच्या परिवाराने केलेल्या त्यागामुळे आपला देश एक संघ राहिला असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
        मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीची विशेष बैठक शनिवार दि.(९) रोजी कॉंग्रेस भवन येथे पार पडली.या बैठकीला नाशिक भेटीला अालेले हेमंत देसाई यांनी मार्गदर्शन केले.
        या बैठकीत मध्य नाशिक ब्लॉक कमिटीच्या कार्यकारिणीमधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीने आयोजित केलेल्या संवाद या प्रशिक्षण शिबिराच्या प्रशस्ती पत्रकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
         देसाई यांनी पुढे बोलतांना पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांनी शहरी व ग्रामीण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्वाचे योगदान दिल्याचे सांगत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसने केलेली कामे व भविष्यात अवलंबले जाणारे धोरण सर्वसामान्यांना सांगण्याचे आवाहन करतांना वाचाळविरांना देखील गप्प करण्याचा सल्ला दिला.प्रास्ताविक मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे यांनी केले.  
    

टिप्पण्या

  1. किती त्याग केला व किती भ्रष्टाचार केला ह्याचा ताळमेळ वा मोजदाद केलीच तर त्याग नसुन भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात केला हेच सर्रासपणे समोर येईलच.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !