करन गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीच्या घोषणेने प्रस्थापितांमध्ये संभ्रमाचे वातावरण ! तरूण, हरहुन्नरी, सामाजिक जाणीवेच्या चेहऱ्याने घेतलेल्या आघाडीचीच चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी करण गायकर यांची उमेदवारी निश्‍चित !
समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या पांठिब्यानंतरच उमेदवारीचा निर्णय जाहीर !!
==========================
छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा महाराष्ट्रांत उमटविणारेत्याचबरोबर मराठा आरक्षण, कोतवाल आंदोलन, केबीसी गुंतवणूकदारांचे प्रश्न, आदीवासी समाजाच्या मागण्यांसाठीचे सक्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्पावधीत लोकप्रिय झालेले संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीने नासिक मधील राजकीय गणितांची समीकरणे बदलाचे वारे प्रवाही झाले आहे, निवडणुकीची तारीख जवळ येत असतांना प्रस्थापित राजकारण्यांचे ठोकताळ्यांना गायकरांच्या सर्वात प्रथम उमेदवारीच्या  घोषणेने एका नवीन आव्हाणाला सामोरे जावे लागण्याचा मोठा प्रश्न  निर्माण केला आहे अशी चर्चा नासिक लोकसभा मतदार संघात होत आहे.
=========================
नाशिक ::-शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात विकासाला प्रचंड वाव असलेला नाशिक जिल्हा केवळ राजकीय अनास्थेपायी देशातील प्रगत शहरांच्या यादीत तळाच्या क्रमांकावर आहे. नाशिकचा राजकीय इतिहास पाहता नाशिककरांनी आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना संधी दिली. परंतु यातील काही मोजक्या उमेदवारांव्यतिरिक्‍त एकही उमेदवार नाशिककरांच्या अपेक्षांना  पात्र ठरला नाही. गेल्या दहा वर्षांच्या काळाचा विचार केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या खासदारांनी तर  अक्षरश: नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे नाशिकचा शाश्‍वत विकास साधता यावा तसेच देशात या शहराला क्रमांक एकचे विकसित शहर म्हणून लौकीक मिळवून देता यावा, याकरिताच छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, सुकाणू समितीचे सदस्य,   मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात  उतरण्याचे कार्यकर्ता मेळाव्यात निश्‍चित केले आहे. अर्थात समाजातील सर्वच स्तरातून मिळालेल्या पाठिंब्यानंतरच त्यांनी उमेदवारीची घोषणा करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे शनिवारी झालेल्या मेळाव्यातील प्राथमिक चर्चेनंतर निर्णय घेतला असल्याचे सूतोवाच केले,
मराठा क्रांती मोर्चा, सुकाणु समिती, केबीसी आंदोलन, कोतवाल आंदोलन, सरकारी कंत्राटी कर्मचारी आंदोलन,मराठा, आदिवासी मुलांसाठी संगणक आणि वसतीगृह आंदोलन, शेतकर्‍यांसाठी आंदोलन अशा विविध प्रश्‍नांवर वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवून देणारे करण गायकर यांनी अल्पावधीतच राज्यभरात आपले नेतृत्त्व सिद्ध केले आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी शेतकरी, उद्योजक, कामगार यांच्यासाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. आदिवासी बांधवांचे  प्रश्‍न निकाली काढताना त्यांनी सरकारलाही झुकण्यास भाग पाडले आहे. बेरोजगार तरूणांच्या पाठिशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच सामाजिक आणि विकासात्मक कार्यामुळे त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघात विरोधकांसमोर आपले भक्‍कम आव्हाण उभे केले आहे.
दरम्यान, आपल्या उमेदवारीची घोषणा करताना करण गायकर यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार  व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार  यांच्यावर टीका करतांना शहराच्या दुर्दशेला आजी माजी खासदार कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. समीर भुजबळ यांच्या कार्यपद्धतीमुळे नाशिककरांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांना नाकारले. गेल्या लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. मोदी लाटेत संधी मिळालेल्या हेमंत गोडसे नाशिककरांच्या विश्‍वासाला पात्र ठरण्यात अपयशी ठरलेत. त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा विचार केल्यास, एकही स्मरणात राहील असा मोठा प्रकल्प मोठा उद्योग  ते उभारू शकले नाहीत, या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांनी पुन्हा खासदार होण्याचे स्वप्न पाहू नये, असा घणाघातही करण गायकर यांनी केला.
त्याचबरोबर आपण इतर उमेदवारांप्रमाणे कुठलेही जातीपातीचे राजकारण न करता केवळ विकासाच्या मुद्यांवर आणि नाशिकच्या विकासासाठी ही निवडणूक लढणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यांवेळी छावाचे विलास पांगारकर यांनी करण गायकर यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यास त्यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य होईल तसेच विरोधकांसाठी त्यांचे आव्हान कडवे असेल यात शंका नाही असे म्हटले,
या मुद्यांवर लढविणार निवडणूक
- शेतकरी, कामगार, मराठा समाजासह इतर समाजातील बेरोजगार तरूण-तरूणी, विद्यार्थी यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी...
- नाशिकला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न फक्‍त कागदावरच झळकतो, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी...
- नाशिकचे उद्योग गुजरातसह इतर राज्यात स्थलांतरीत होत आहेत. परंतु आजी माजी  खासदारांना याचे काहीही देणे घेणे नसल्याने नाशिकचा विकास खुंटला  आहे, त्यामुळे उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करणेस प्राधान्यक्रम असेल.
- नाशिकची हवाई वाहतुक केवळ खासदारांसाठी प्रसिद्धी स्टंट ठरत आहे, हे सर्व चित्र बदलण्यासाठी...
- नाशिकमध्ये आयटी प्रकल्पांना पोषक वातावरण मिळवून देण्यासाठी...
- जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना अद्ययावत मैदाने उपलब्ध नसल्याने, त्यांच्या खेळाला म्हणावा तसा वाव मिळत नाही, या खेळाडूंना अद्ययावत मैदानांसह योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी...
- द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये एक्स्पोर्टची सुविधा नाही, ती उपलब्ध करून देण्यासाठी...
- अद्ययावत बाजार समिती नसल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी...
- नाशिकला पर्यटनासाठी प्रचंड वाव असतानाही केवळ खासदारांच्या अनास्थेमुळे नाशिक पर्यटनात मागे राहिले आहे. त्यामुळे पर्यटनासाठी नाशिकचे नाव देशात झळकविण्यासाठी...
- शहरात सुसज्ज असे सांस्कृतिक कलाकेंद्र उभारण्यासाठी...
- एमपीएससी, यूपीएससी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अद्ययात ग्रंथालय उभारण्यासाठी...                                   - महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी.


टिप्पण्या

  1. करन गायकरांच्या लोकसभेच्या उमेदवारी साठी आमच्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा आणि सर्व नातेवाईक,आप्तेष्ट व मित्र या सर्वांचे प्रचारास सहकार्य व मतदान सुद्धा. कारण करण गायकर यांचा सर्वसमावेशक संघर्ष मी अनुभवला असुन नासिक जिल्ह्याच्या विकासा साठी जिवाचे राण करणारे व्यक्तिमत्व असेल यात मला शंकाच नाही.तसेच प्रामानिकपणे काम करत असतांना ते जाहीरात आणि प्रसिद्धी याला फार से महत्व देत नाही. त्या मुळे त्यांनी उमेदवारी केल्यास तन, मन,व धनाने आम्ही त्यांचे बरोबर राहु.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!