देशातील कोणत्याही भागात महीलांना समाजात वावरताना प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळावी -पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले ! महिलांना बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वावर मान व हक्क मिळाला पाहिजे- शीतल करदेकर !! नॅशनल युनियन आॅफ जर्नेलिस्ट तर्फे कार्यक्षम महीलांचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट तर्फे समाजातील कार्यक्षम महिलांचा सत्कार
नाशिक :स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाकं असून त्यापैकी कोणतेही चाक लहान किंवा मोठे नाही समाजनिर्मितीसाठी हा समाजरथ वेगाने चालला पाहिजे म्हणून निसर्गाने त्या दोन्हीची निर्मिती केली आहे मात्र समाजात स्त्रीला कमी दर्जाचे स्थान दिले तर समाजरथाचा वेग मंदावेल, केवळ जागतिक महिला दिनी आठ मार्चला वर्षाचे ३६५ दिवस समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. देशातील सर्व भागात वर्षभर कोणत्याही वेळी महिला समाजात प्रतिष्ठेने सुरक्षित वावरू शकल्या पाहिजेत तर प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल ८ मार्च चा वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन नाशिकच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. नाशिक शाखेतर्फे व बेटी फाउंडेशन तर्फे आयोजित समाजातील सक्षम महिलांचा सत्कार श्रीमती चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमती वैशाली आहेर दैनिक नवशक्ती वरिष्ठ पत्रकार दीपक मोहिते ज्येष्ठ पत्रकार आणि बेळगाव शाखेचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर नगरसेविका दीक्षा लोंढे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र समाज कल्याण विभागाचे माजी संचालक श्री गं.पा.माने होते यावेळी बोलताना श्रीमती चौगुले म्हणाल्या की महिलांना विविध पातळीवर तारेवरची कसरत करावी लागते हिंदू धर्मात अनेक देवीचे पूजन होते या सर्व देवी महिलाच आहेत इतकेच नव्हे तर महिलांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यादेखील देवतासमान असून महिला ही सहनशीलता आणि नम्रता अशी दोन रूपे धारण करते, मात्र आज समाजात महिलेला एका सासूपासून कुटुंबात उपद्रव सहन करावा लागतो हे योग्य नसून सुनेला सासू ने पाठिंबा दिला तर खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवशी ८ मार्च साजरा होईल. सध्या चटणीपासून जेवणापर्यंत कपड्यापर्यंत रेडिमेडचा जमाना आला आहे मात्र या सर्व वस्तू निर्माण करण्यासाठी किती हाल सोसावे लागतात याची जाणीव त्यांनी ठेवावी यावेळी बोलताना संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शीतल करदेकर म्हणाल्या की संघटनेच्या माध्यमातून केवळ पत्रकारच नव्हे तर पोलीस समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी ही संघटना कार्य करीत आहे पत्रकारांनी समाजात आपली प्रतिमा चांगली ठेवली तर त्यांना विशेष संरक्षण मागण्याची गरज भासणार नाही महिलांवर विविध प्रकारची बंधने असताना त्यांना सर्व क्षेत्रात काम करताना संरक्षण आणि न्याय मिळण्यासाठी संघटनेची गरज आहे ती संघटना पुरुष आणि महिला असा भेदभाव न करता सर्वांच्या न्याय हक्कासाठी झटत आहे महिलांना केवळ बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वाने मान आणि हक्क मिळाला पाहिजे. महिला पत्रकारांनी इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी अन्याय सहन न करता आत्महत्या हा पर्याय निवडण्याला आवश्यक प्रतिकार केला पाहिजे. संस्था पोलीस आणि समाजसेवी संस्थांना साहाय्य करण्यासाठी नेहमी आघाडीवर असावे, समाजात जातीयतेचे राजकारण नको, धर्म पुरुष स्त्री जात असा भेदभाव वाढला तर त्याचा दुरुपयोग समाजातील राजकारणी आणि इतर घटक करतात, असे म्हणाल्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी नगरसेविका दिक्षा लोंढे म्हणाल्या की अनेक वेळा समाज आणि कुटुंबांकडून महिलांवर अनेक बंधने लादण्यात येतात पण महिलांनी सक्षम पणे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे धाडस दाखवावे त्याच बरोबर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, महिला सुदृढ असेल तर परिवार ही सुदृढ राहील. अध्यक्षस्थानावरून बोलताना समाज कल्याण विभागाचे माजी संचालक श्री गं.पां.माने म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला महत्त्वाचे स्थान आहे ते देवही संकटात सापडल्यावर स्त्रीशक्तीने महिषासुरमर्दिनीच्या रूपाने असुरी प्रवृत्तीचे निर्दालन केले आहे समाजातील प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला आहे, पडद्यामागे राहूनही महिला मोठे कर्तृत्व सिद्ध करतात, एका वेळी अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे, मात्र अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, जगामध्ये अनेक देशांमध्ये ही परिस्थिती आहे, महिला सक्षम पणे अन्यायाला प्रतिकार करू शकतात, देशाची सूत्रे महिलांच्या हाती दिल्यास देश प्रगतीपथावर जाईल  असे माने म्हणाले
      महिला दिनाचे औचित्याने लायन्स क्लब जुनी पंडीत कॉलनी नाशिक येथे काल नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र नाशिकच्या वतीने  पोलीस , पत्रकार तसेच सेवाभावी संस्थात काम करुन विशेष  योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला नाशिक डीसीपी चौगुले मॅडम, गं.पा.माने दिक्षा लोंढे ,  वैशाली आहेर , (एनयुजेएम कोषाध्यक्ष) सामाजिक कार्यकर्त्या अनिता पाटील,एनयुजेएम पालघर समन्वयक ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते प्रमुख अतिथी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर उपस्थीत होत्या.
यावेळी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारित महिला  पोलिस  प्रणाली जगन्नाथ सोनवणे( मुबई नाका पोलिस स्टेशन) , उज्वला नारायण तिटमे (आडगाव पोलीस स्टेशन ),पल्लवी भुजबळ( सातपूर पोलीस स्टेशन ),बुटे मॅडम (इंदिरानगर )
, जोशी मॅडम (सायबर क्राईम )
सुनीता पवार  (गंगापूर पोलीस स्टेशन ),सोनाली भालेराव( अंबड पोलिस स्टेशन),स्नेहल सोनवणे (नाशिक रोड पोलिस स्टेशन),
बबिता म्हसदे ,छाया चैधरी (उपनगर पोलिस स्टेशन)सामाजिक कार्यकर्त्या
मंजुषा परदेशी, सुनिता चव्हाण,
गोसावी मँडम प्रसारमाध्यम क्षेत्र
माधुरी वैद्य (महासत्ता केसरी ),सुचिता दास (नवभारत ), कृतिका देशपांडे (वृत्तवैभव),
गायत्री जेवूघाले (सकाळ ),
बैरागी मँडम( भ्रमर ),
अंजली मुर्तडक (समय नॅशनल न्यूज),
संगिता पवार (पुढारी ),
सई कांबळे (पुढारी)यांना सन्मानित करण्यात आले.
             कार्यक्रमात एनयुजेएम नाशिक जिल्हा अध्यक्ष राम ठाकुर यांनी स्वागत केले.निमंत्रक सतीश रूपवते व अन्य सदस्य यावेळी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समाजसेवक अविनाश आहेर यांनी केले कार्यक्रमाला सर्वच स्तरातील विशेषता पत्रकारिता आणि पोलीस दलातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!