समीर भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे -- अनिता भामरे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक (प्रतिनिधी) विकसनशील शहरांच्या यादीत असलेले नासिक शहर हरवले, यावर उपाय म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी  केले
        विकसनशील शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर असलेले नासिक भाजपा सरकारच्या काळात हरवले आणि विकासात मागे पडले म्हणून नासिक शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे  आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मतदारांना केले.
केवळ मोठमोठ्या घोषणा करून सर्व सामान्य जनतेला फसवून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मात्र गेल्या पाच वर्षांत ह्या सरकारने कुठल्याही प्रकारचे जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेतले नाही यामुळे जनतेच्या मनात राग आहे. शेतकरी कर्जमाफी नाही, युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, नोटबंदी, अशा विविध कारणांमुळे जनता हवालदिल झाली आहे असे भामरे यांनी सांगितले.
         पुढे त्या म्हणाल्या की भाजपा सरकार महिलांच्या बाबतीत अतिशय निर्दयी दिसत आहे. सरकार मधील एका खासदाराने  बलात्कार हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे असे निर्लज्ज विधान केले आहे. तर महाराष्ट्रातील भाजपाचे एक मंत्री यांनी दारूची विक्री करायची असेल तर दारूच्या बाटल्यांना महिलांची नावे द्या असे सुचवतात, यावर कळस म्हणजे  तुम्हाला जी मुलगी आवडेल तिच्याकडे बोट दाखवा असे एक आमदार सांगत, मी तिला स्वतः पळवुन आणतो आणि तिचे लग्न तुमच्याशी लावतो. असे महिला आणि मुलीं विषयी घाणेरडी नजर ठेवणार्‍या या सरकारला घालवल्या शिवाय पर्याय नसल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय ( कवाडे, गवई साळवे, खोब्रागडे ) संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे नासिक लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार समीर  भुजबळ यांनाच प्रगतीशील व्यक्तिमत्व म्हणून निवडून देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।