Posts

Showing posts from July, 2019

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
      सदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

जेष्ठ विचारवंत, लेखक, राजकारणी तथा दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड ! केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला !! न्यूज मसाला परीवार नासिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
महान लढवय्ये विचारवंत राजा ढाले यांचे निर्वाण ! दलित पँथर चे संस्थापक,  आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,  ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. १६ जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी (पू) येथील त्यांच्या निवसस्थानाहून निघणार,  दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ; मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण के…

न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! निव्वळ फार्स की ठोस कार्यवाही ची चर्चा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !!

नासिक::-   ४ फेब्रु. व ६ फेब्रु. १९ ला न्यूज मसालाने प्रकाशित केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यासाठी प्रशासनाला तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागतो याबाबत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागात कुतुहलाचा विषय ठरला असून सदर रस्ता व त्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहणी हा निव्वळ फार्स ठरेल की संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.
          त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराकडून बनविण्यात आला व तोच रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून ही बनविला आहे असा आरोप नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी सदर कामाची व फसवणुकीच्या चौकशीची वारंवार मागणी केली असता अखेर शुक्रवारी (दि.१२) चौकशी समितीने पाहणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर करण्याचे…

योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक !! योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य- पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेहस्थुलता निरावरणाचे धडे योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक नाशिक,दि.७ जुलै :- योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
           यावेळी…

जिल्हा परिषद बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...! शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...
     शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध        सिंधुदुर्गनगरी:- महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गुरुवारी कणकवली येथे चिखलाच्या पाण्याने घालण्यात आलेले आंघोळ प्रकरण जिल्ह्यातील शाखा अभियंता यांनी गंभीर घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समिती सभेला विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी अनुपस्थित राहत निषेध व्यक्त केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सचिव म्हणून सभेला उपस्थिती लावली. दरम्यान, सर्व अभियंत्यांनी रजेचा अर्ज टाकत घटनेचा निषेध केला आहे.
           सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या या सभेला सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रिया सावंत, राजन मुळीक यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी आ नितेश राणे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना कणकवली बाजार पेठेतील रस्ता पाहणी करण्यास बो…

पुरेसा पाऊस न झाल्याने टँकर लागण्याची शक्यता असल्यास टँकर वाढविण्यासाठी तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
नाशिक : - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज जिल्हयातील पाणी टंचाईबाबत तालुक्यांचा आढावा घेवून विविध सुचना केल्या. जिल्हयात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे काही तालुक्यांमध्ये टँकर लागण्याची परिस्थिती असून गटविकास अधिका-यांच्या आढाव्यामध्ये जिल्हयात १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची  गरज असल्यास तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.
           जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणी टंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेवून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.
                यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेवून विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी…

सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
सुविचार गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक दि. ०३ (प्रतिनिधी) :-कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे तसेच नावे सुचविण्याचे आवाहन सुविचार गौरव मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी केले आहे.
             समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामांन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. सोमवार दि. ०८ जुलै २०१९  पर्यंत हे प्रस्ताव एफ-१०, नानाजी शेटे बिझीनेस सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक या कार्यालयात सकाळी १२ ते ३ या वेळेत प्रत्यक्ष सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
            यापूर्वी नाशिक येथे आयोजित शानदार कार्यक्रमात सन २०१७ मध्ये  माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांच्या शुभहस्ते तर सन २०१८ मध्ये माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते “सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा” संपन्न झाला होता. या…

मुख्यमंत्र्यांना कर्मचारी महासंघाचा इशारा ! कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा,अन्यथा संप करण्याची वेळ येईल असं करु नका, असा इशारा जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून निदर्शने करून देण्यात आला !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

Image
कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत  प्रश्न मार्गी लावा ....
अन्यथा संपाची वेळ आणू नका ..
जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचा इशारा .. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आज  दि. ३ जुलै रोजी जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ व सलग्न सतरा संवर्गीय कर्मचारी संघटनांचे वतीने संपाचे पाश्र्वभूमीवर दि ४ ऑगस्ट १८ ला मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने, जोरदार निदर्शने करून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी सर्व संवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .प्रमुख मागण्या : राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या तात्काळ देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे,
केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्माण करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त व नविन पदे भ…

सातवा वेतन आयोग अधुराच, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी आज करणार निर्दशने !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

Image
सातवा वेतन आयोग अधुराच,कर्मचारी करणार ३ जुलै ला निर्दशने ... मागील वर्षाचे तीन दिवसाचे संपानंतर राज्य शासनाने १ जाणेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र सातवा वेतन आयोगातील त्रुटीमुळे अंमलबजावणी अधुरीच असल्याने कर्मचारी मध्ये नाराजीची संतप्त भावना आहे .
  यशस्वी संपानंतर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समीती आणि मा मुख्यमंत्री यांचे ४ ऑगस्ट१८ च्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,  सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मिती करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त व नविन पदे भरणे, परीभाषीत पेन्शन योजनेतील कर्मचारी यांचे १० वर्षाचे आत मृत्यु झाल्यास वारसास १० लाख सानुग्रह अनुदान मंजुर करणे, अंशदाई पेन्शन धारकाचा …