औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! आयोजकांतर्फे मनोरंजन गूरु यांच्या मनोरंजनाची खास मेजवानी !! जीपींकडून आलेल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा !
           नाशिक जिल्हा शासकीय औषध निर्माण अधिकारी संघटनेने शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी यांचेसाठी हॉटेल साधना, गंगापूर रोड नाशिक येथे मनोरंजन गुरु यांचा अनोखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमात  उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घडवुन सर्वांना तीन ते चार तास मनोरंजन व हास्य विनोदात तल्लीन करुन टाकले होते. महिलांच्या व पुरुष अधिकारी यांच्या विविध खेळांतून मनोरंजन केले जात होते. कार्यक्रमाच्या मध्यानात विविध हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरुन उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांनी मनमुराद आनंद साजरा केला. विविध जुन्या गाण्यावर नाचण्याचा ठेका उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांनी धरल्यावर मनोरंजन गुरु हेही सर्व उपस्थित यांचे बरोबर गाण्याच्या तालावर नाचत होते.
              उपस्थित औषध निर्माण अधिकाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी शिवाजी (आण्णा) मुसळे, श्री.मिश्रा,  पिंपळसे व श्री.मोरे साहेब यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचेसाठी आयोजकांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
          उपस्थित सर्व शासकीय औषध निर्माण अधिकारी यांनी निसर्गाच्या सानिध्यात वैविध्यपूर्ण आगळ्या वेगळ्या फार्मसी दिनाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले.
           फार्मसी दिनाच्या कार्यक्रमास औषध निर्माण अधिकारी राजेंद्र सोनार, शिवाजी मुसळे, नंदु पवार, किरण अमृतकर, अजित गायकवाड, हेमलता चौधरी, जयवंत सोनवणे, दिलीप बच्छाव, वाय. टी. पवार, अल्ताफ अन्सारी, माधुरी पाटील, रामकृष्ण महाले, यांचेसह जिल्ह्यातील साधारण १५० औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी फैय्याज खान, विजय देवरे, जनार्धन सानप, भावसार, हेमंत राजभोज, सोनाली तुसे, सचिन अत्रे, शिरीन मांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
जी.पी. खैरनार
Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाच्या भुजबळांविषयी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकाचा भुजबळ समर्थकाकडून जाहीर निषेध ! भाजपाच्या फुटकळ दलालांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे प्रत्युत्तर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!