सर्वपक्षीय नेते एकत्र येत तालुक्यातील जनतेला पक्षविरहीत राजकारणाचा दिला सकारात्मक संदेश !! आज झालेल्या बैठकीच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस
निसाका-रासाका सुरू करण्याबाबत पिंपळगाव बाजार समितीत जेष्ठ नेत्या सह सर्वपक्षीय आज बैठक संपन्न
      नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कामगार व संपूर्ण तालुक्यात आर्थिक गणित या दोन्ही संस्थांवर असलेल्या निसाका व रासाका या दोन्ही संस्था सुरु होण्यासाठी व तालुक्‍यातील गेलेले गतवैभव परत येण्यासाठी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी आमदार अनिल कदम  यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. निसाका-रासाकाच्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी आपण आमदार दिलीप बनकर यांना राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करणार असून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे अनिल कदम यांनी यावेळी जाहीर केले. निसाकाच्या बाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत चर्चा झाली असून इतर सक्षम संस्थाना कारखाने चालवण्यास देण्यासाठी अध्यादेश काढून विधानसभेत कायदा पारीत होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दिलीप बनकर  यांनी यावेळी सांगितले. रासाका संस्थापक अध्यक्ष तथा  कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी आजी-माजी आमदारांनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येऊन आगामी हंगामात कारखाने कार्यान्वित करावे, असा सल्ला दिला. त्यासाठी उपस्थित सर्वांनी त्यासाठी अनुकूलता दर्शविली. बैठकीच्या चर्चेत मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, नासिक  जिल्हा परिषद  अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,  मविप्र सभापती तथा निसाका संचालक  माणिकराव बोरस्ते, माजी आमदार  नानासाहेब बोरस्ते, सहकार नेते राजेंद्र मोगल, निफाड  नगरपंचायत नगरसेवक अनिल पाटील कुंदे, विश्वास कराड, अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे  करंजगाव चे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, बाजार समिती सचिव बाजारे, अशोकराव बनकर पतसंस्थेचे संचालक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.*यावेळी  निफाड तालुक्यातील एक आगळे वेगळे चित्र आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळाले दोन राजकीय कट्टर विरोधक एक विद्यमान आमदार दुसरे माजी आमदार माजी आमदारांनी विद्यमान आमदार यांना त्यांच्या काल झालेल्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील राजकारण ज्यांच्या शब्दावर चालते असे वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या साक्षीने माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जन्मदिनाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि आज निफाड तालुक्यात राजकारण ते फक्त संघर्षाचे वादविवादाचे नव्हते, नाही व पुढे ही राहणार नाही हे एकाप्रकारे दोन्ही आमदार यांनी जनतेला दाखवून दिले आहे ,यातून एकच संदेश जनतेत जाणार आहे राजकारण हे राजकारण असते संबंध संबंध असतात
आमदार दिलीप बनकर यांचा विनायकदादा पाटील व अनिल कदम यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
*************************************
रासाका-निसाका या कर्मवीरांच्या त्यागातून उभारलेल्या संस्था, यांसाठी सभासदांनी मनी मंगळसूत्र मोडून सर्वस्वी त्याग केला आहे, याचे भान ठेवत आपली सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून कर्मवीरांनी स्थापन केलेल्या संस्थेला पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येत तालुक्यातील जनतेच्या व उस उत्पादक सभासदांच्या कल्याणासाठी झालेली बैठक ही मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!