आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास पुरस्कार !न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

"लोकराजा" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार !
नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन  २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे,  न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
      लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात "सेंट्रल टेबलावर" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
        सन २०१२ मा. खा.  डॉ. दौलतराव आहेर यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित करून सुरूवात केलेल्या लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजपर्यंत
मा. खा. प्रतापदादा सोनवणे (२०१३),
मा.खा. गोपीनाथ मुंढे (२०१४),
मा.खा. समीर भुजबळ (२०१५),
मा.खा. छत्रपती संभाजी राजे (२०१६),
मा.खा. राजू शेट्टी (२०१७),
मा.खा. हेमंत गोडसे (२०१८),
मा.खा. रामदास आठवले (२०१९)   यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित केले आहे, सन २०२० यावर्षी नासिक चे लोकप्रिय खासदार मा. कै. माधवराव बळवंतराव पाटील यांचे छायाचित्र असलेला लोकराजा दिवाळी विशेषांक प्रकाशित होत आहे.
       आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा पुरस्कार"लोकराजा" अंकास मिळाल्याबद्दल सर्व लेखक, कवी, जाहीरातदार, हितचिंतक यांचे न्यूज मसाला परीवार सदैव ऋणी आहे.



टिप्पण्या

  1. अभिनंदन! आपणा सर्व न्यूज मसाला परिवाराचे हार्दिक अभिनंदन! आणि चालू वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  2. सर साहित्य पाठवायचे आहे तुमच्या अंकासाठी कसे पाठवले पाहिजे माहिती सांगा माझ्यी कथा आहे मीच लिहलेली आंदोलन या विषयावर प्लीज call 8605871150

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !