पोस्ट्स

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकाची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचे आदेश ! पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही कणेबाबत नोटीस बजावली !! प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेतील इतर प्रलंबित प्रकरणांचा निपटाराही लवकर व्हावा अशी अपेक्षा !!! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.नरेश गिते यांनी प्रशासनातील एकएक नमुने शोधून त्यांचेवर करीत असलेल्या कार्यवाहीने काहींच्या मनात भीती तर काहींच्या मनात स्वागत होत अाहे, सर्वच विभागातील अनेक प्रकरणांचा निपटारा व्हायला हवा असा सूर ही व्यक्त होत आहे. न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांना आता चालना मिळेल अशी आशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून चर्चिली जात आहे !!          नाशिक (१७)::- त्रंबकेश्वर पंचायत समिती अंतर्गत विविध प्रकरणात दोषी आढळलेल्या तीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या खातेचौकशी प्रकरणात सादरकर्ता अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यानी अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी पंचायत समितीमधील दोघा कर्मचाऱ्याना नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कार्यवाही  करण्याचा इशारा दिला आहे.         त्रंबकेश्वर पंचायत समितीमधील परिचर बळवंत ढाकणे हे ऑक्टोबर २०१३ पासून तर ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर निवृत्ती गबाडे हे २०१० पासून अनधिकृत गैरहजर आहेत. तसेच तोरंगण प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर सुरेश महाले यांच्यावर कलम ३०२ अन

भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेचा बदनापुरांत पायताण मोर्चा ! दोन महीन्यात रस्ते दुरूस्त न झाल्यास आमदार खासदार यांना तालुका बंदी - करन गायकर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         बदनापूर( दि.१६)::- तालुक्यातील गावा-गावांना जोडणारे रस्ते अतिशय खराब झालेले असून या रस्त्यावरून साधे चालणेही दुरापास्त झालेले असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने बदनापूर येथे भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेकडून मोर्चा काढण्यात आला.           दोन महिन्यात रस्ते दुरुस्त झाले नाही तर आमदार व खासदारांना तालुक्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.          बदनापुर ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दूरवस्था झालेली असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर तयार करावेत तसेच  रोषनगाव येथील काही शेतकऱ्यांना महापारेषणकडून तयार होत असलेल्या विद्युत टॉवरचा मोबदला मिळालेला नसताना शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे या  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे  गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी बदनापूर ते तहसिल कार्यालयापर्यंत  जवळपास ३ किलोमीटर  मोर्चा निघाला, बदनापूर परिसरात आज सकाळपासून पाऊस सुरू होता या पावसातही मोठया संख्येने ठिकठिकाणच्या गावाच्या तरुणांनी सहभाग नो

राहुडे अतिसाराचे बळींची संख्या चारवर !! नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिणे व प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी-शितल सांगळे, खासदार चव्हाण यांनीही केली पाहणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
              नाशिक(१३)::– दुषित पाण्यामुळे  अतिसाराचा उद्रेक होवून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी भेट देवून याबाबत माहिती घेतली.  दरम्यान, खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनीदेखील राहुडे गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. ८ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील राहूडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत अति पावसामुळे विहिरी शेजारील नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दुषित होवून अतिरासाराची लागण झाली असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, त्यापाठोपाठ कळवण तालुक्यातील वीरशेत येथे पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या हातपंपाचे पाणी पिल्यामुळे साथीचा उद्रेक झाला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत, जलव्यवस्थापन सभेत तसेच स्थायी सभेत याविषयी चर्चा झाली होती. घटनेची सर्व चौकशी करून संबधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश शितल सांगळे यांनी दिले होते. जिल्ह

"परी हूँ मैं" ७ सपप्टेंबर ला सुरू होतेय ग्लँमरस दुनियेची सफर ! सविस्तर माहीतीसाठी दीनानाथ यांजकडून न्यूज मसालाच्या रसिकांसाठी, लिंक क्लिक करा !!!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]       ग्लॅमरस दुनियेची सफर  ‘ परी हुँ  मैं ’  या मराठी चित्रपटातून घडणार        ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महराष्ट्रात होणार प्रदर्शित             गाजलेल्या   ‘ वेगे वेगे धावू ’  एकांकिकेवर आधारित               टीव्हीच्या स्मॉल स्क्रीनमध्ये मोठी ताकद आहे, या छोट्या पडद्याने आपल्या घराचा ताबा कधी मिळविला हे आपल्या ध्यानातही आले नाही. मोठ्या कलाकारांसह लहान मुलांना नवी ओळख देणाऱ्या या छोट्या पडद्याचं विश्वच निराळं आहे. टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लहान मुले टार्गेट ठेउन टीव्हीवर अनेक कार्यक्रम होतात, चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मा

थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, ! समाजहितासाठी बंदी आवश्यकच !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
इको फ्रेंडली ‘उत्सवी’नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश! थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही , समाज हितासाठी बंदी आवश्यक –   मुंबईतील थर्माकोल फॅब्रिकेटर अॅन्ड डेकोरेटर्स असोसिएशनची विनंती फेटाळून लावत उच्च न्यायालयाने थर्माकोल बंदी कायम केली आहे. त्यामुळे थर्माकोल विक्रेत्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ‘पर्यावरणाला हानिकारक अशा वस्तूंना परवानगी देणे शक्य नाही’, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने याविषयी दिले आहे. तर बंदी संदर्भातील सविस्तर आदेश याआधीच दिलेले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे असेही उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या वस्तूंचा विरोध गेली ३२ वर्षे सातत्याने नानासाहेब शेंडकर करीत आहेत. अत्यंत कष्टातून जेजे महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेऊन नानासाहेब शेंड्कारांनी कलासाधना जोपासली आहे. गेली पन्नास वर्षे ते कलाक्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या  'aaartist'  या संस्थेद्वारे कलेचे विविध पैलू ते घडवीत आहेतच पण त्यासोबतच ‘उत्सवी’ संस्थेच्या वतीने समाजासाठी अत्यंत महत्वाचे कार्य त्यां

वाँक विथ कमीशनर कार्यक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा सुरू होणार - आयुक्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
            नासिक (१२)::-महानगरपालीकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नासिकला आल्यापासुन विविध उपक्रम राबवित आहेत त्यातीलच एक नावाजलेला उपक्रम "वाँक विथ कमीशनर". दर शनिवारी सकाळी शहरांतील वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक शहरांतील नागरिकांना भेटून त्यांना व शहरांतील जनतेस येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या कमीतकमी कालावधीत सोडविण्यास प्राधान्य देत आहेत, या प्रशासनासाठी पथदर्शी ठरलेल्या उपक्रमाला पावसामुळे ब्रेक लागला असुन हा उपक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा त्याच उत्साहाने सुरू होणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना आज अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने "वॉकविथ कमिशनर" "walk with commissioner" हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासुन पुनश्च: सुरू होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी थेट सुसंवाद साधुन नागरिकांच्या तक्रारी/सुचना जाणुन घेणार आहेत.

भूकंपप्रवण क्षेत्रास भेट देण्यात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता ! खासदारांनी केली नाराजी व्यक्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पेठ तालुक्यातील गोंदे, निरगुडे, भायगाव, आड, उस्तळे, या परिसरात दहा जुलै रोजी २.७ रिष्टर स्केलचा भुकंप झाला १९९५ पासून  ८२ वेळा भुकंपाचे धक्के बसले परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही तेथे आज खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भेट दिली व या धक्का दायक बाबीकडे दुरदर्शन, वर्तमानपत्रात बातमी आली,तरी साधा प्रशासनांतील तलाठी सुध्दा तेथे जाऊन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही, बाकी मोठे आधिकारी तर लांबची बाब अशा शब्दात तीव्र नापसंती व्यक्त केली. याबाबत तहसीलदार, पोलीस यंत्रणेने तेथील पोलीस पाटील सरपंच यांनी लेखी कळवल्या नंतर जाणे क्रमप्राप्त असतांनाही या ठिकाणास भेट देण्याचे औदार्य दाखविले जाऊ नये हि प्रशासनाची उदासीनतेला उत्तर म्हणून खासदारानी भेट दिली, सोबत प्रशांत भदाणे, रघुनाथ चौधरी,  बापु पाटील.भाऊ माळगावे, गणपत चौधरी,  कांतीलाल राऊत, यशवंत खंबाईत, संपत भोंडवे, तसेच गोंदे.निरगुडे .भायगाव येथील सरपंच व पोलीस पाटील हजर होते....