पोस्ट्स

"लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी" हे ब्रीदवाक्य अंगीकारून भारतीय आयुर्विमा महामंडळाची घोडदौड ! आजपासुन एलआयसी सप्ताहाची सुरूवात !! विमाधारकांनी विविध सुविधांचा लाभ घ्यावा- गडपायले, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
आज १ सप्टे . २०१८ , भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६२ वा वर्धापन दिन , नासिक::- आज भारतीय आयुर्विमा महामंडळ आपला ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असुन १ ते ७ सप्टें. हा एलआयसी सप्ताह महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये साजरा केला जाणार आहे अशी माहीती नासिक विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले यांंनी काल पत्रकार परिषदेत दिली.      सप्ताहात कर्मचाऱ्यांसहीत विमा धारकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, गरजूंना वस्तूंचे वाटप, व्रुक्षलागवड, आरोग्य शिबिर इ..       कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केलेली देशातील क्रमांक एकची वित्तीय संस्था असा नांवलौकीक प्राप्त असलेले आयुर्विमा महामंडळ आहे, २९ प्रकारच्या योजना सोबत घेऊन समाजांतील विविध घटकांची विम्याची गरज पूर्ण करीत आहे, पेन्शन, आरोग्य, मुलांसाठीच्या योजना व युलिप योजनांसह उच्चभ्रु ग्राहकांसाठी " जीवन शिरोमणी " ही किमान एक कोटी विमा रक्कम असलेली योजना आहे, " प्रधानमंत्री वय वंदना योजना " ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ % सुनिश्तित दराने दरमहा दहा वर्षांसा

९४ शिक्षकांना दणका ! खोटी माहीती सादर प्रकरणी आढळले दोषी !! एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, बदली विकल्पही नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  ९४ शिक्षकांना डाँ.नरेश गितेंचा दणका, कायमस्वरूपी एक वेतनवाढ कायमची बंद तसेच बदली विकल्पही नाही,         नाशिक – शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची ऑनलाईन प्रकीयेद्वारे बद्लीप्रक्रिया पूर्ण केली मात्र यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या आहेत अथवा बदलीतून सुट घेतली अशा १९४ शिक्षकांची सुनावणी घेण्यात आल्यानंतर खोटी माहिती भरून शासनाची दिशाभूल करणाऱ्या ९४ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दणका दिला असून एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे त्यांना बदलीसाठी विकल्प भरता येणार नसून अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.         शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती पत्नी एकत्रीकरण याबाबत  खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जुलै व ऑगस्ट

प्रशासकीय व्यक्तीच्या राजकीय पदार्पणाची प्रस्थापित राजकारण्यांना भीती अन् त्याच प्रशासनावर राजकीय दबाव आणून मुदतपूर्व बदलीचा डाव ! असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन !!! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रशासनावरील राजकारण्यांचा दबाव अन् प्रशासनाधिकाऱ्याचा धाक ! नासिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची झालेली की केलेली बदली या विषयावरून तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे, अहिरराव यांच्या बदलीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात आला असुन इतर तहसीलदारांच्या बदल्यांचा आदेश एकत्रितरित्या काढण्यात आला असा आरोप जनसामान्यांकडून करण्यात येत आहे, अहीरराव यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याआधीच ही बदली झाली आहे, याबदली मागील गौडबंगाल हे कुतुहल निर्माण करणारे असुन याला राजकीय किनार लाभली आहे असा आरोप तालुक्यातील अनेक संघटनांकडून होत आहे       राजकारणांतील अतीमहत्वाकांक्षींनी बदलीचा सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, यावरून प्रशासनाधिकाऱ्याचा किती धाक व भीती राजकारण्यांना वाटते तसेच दुसऱ्या बाजूने बघीतल्यास प्रशासनाला राजकारणी आपल्या राजकीय डावपेचाच्या माध्यमातून कसे झुकवतात हेही यानिमित्ताने प्रथमदर्शनी दिसुन येते.     राजश्री अहिरराव यांनी जर जनतेची कामे केली अाहेत तर त्यांचा यथोचित सत्कार करण्याऐवजी त्यांनी भविष्यात राजकारणांत पाय रोवण्याचे मनसुबे व्यक्त केले असतील या शंकेने त्यांची तालुक

कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करूनही पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही ! तीन वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून ४१२ योजना रखडल्या !! २९ आँगस्टच्या आढावा बैठकीत संबंधितावर जबाबदारी निश्चित करणार !!! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक  -   जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे रखडलेल्या ४१२ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असून यासाठी पाणीपुरवठा योजना रखडण्याच्या कारणांना जबाबदार असलेल्या सर्व संबधितांना बोलावण्यात आले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे काम करण्यात येत आहे. मात्र विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४१२ योजना ३ वर्षापेक्षा अधिका कालावधीपासून रखडल्या असून त्यांचे अंतिमीकरण झालेले नाही. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करता येत नाही.  गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येते मात्र समितीमधील अंतर्गत वाद, हागणदारीमुक्त गावाची अट, ठेकेदाराने केलेले अपूर्ण बांधकाम आदि कारणांमुळे पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहत आहेत.  कोट्यावधीचा निधी देवूनही योजना रखडत असल्याने याबाबत सर्व संबधितांचा आढावा घेवून अपूर्ण कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून  रखडलेली योजना पूर्ण करण्य

जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेतील मानाचा "मिसेस युनायटेड नेशन" किताबाची मानकरी ठरली नासिक कन्या श्रद्धा कक्कड ! बाँलीवुड मध्ये पदार्पण करण्याचा श्रद्धाचा मानस !! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्राच्या श्रद्धा कक्कड जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनायटेड नेशन किताबाने सन्मानित... आज महिलांनी सर्वच क्षेञात दबदबा निर्माण केला आहे, त्यातच अशी महिला (नासिक कन्या) श्रद्धा कक्कड जिने आजपावेतो देश विदेशातील अनेक सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक जिंकले आहे. त्यावर कळस करत तिने आज जमैकातील सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनायटेड नेशन हा किताब मिळवून नासिकसह देशाचे नांव उज्वल केले. नासिकच्या बी. वाय. के काॕलेज व पुणे विश्वविद्यालयातून शिक्षण  घेत असताना लहानपणापासूनच सौंदर्य स्पर्धेत करियर बनण्याचे स्वप्न तिने पाहिले होते.. वडिलांना व्यवसायात नुकसान आल्यानंतर तिने शिक्षण करित असताना वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे सिम कार्डही विकले , तसेच  पुण्यात एका खाजगी बँकेतही नोकरी केली.. जीवन संघर्षमय होते अनेक अडचणीवर मात करीत श्रद्धा ने 2000 साली मिस नाशिक हा अवार्ड जिंकला . त्यानंतर 2 वर्षात मिस पुणे हा अवार्ड नावावर केला.. तिचा सौदंर्य स्पर्धेचा प्रवास अखंडपणे चालू होता. त्यात मानाची भर पडली ती 2017 मध्ये दिल्लीत मिस इंडिया होममेकर हे अवार्ड जिंकल्याने. त्यानंतर जमैका मध्ये होणाऱ्या मिसेस यु

राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन ! उद्योजक तथा नवउद्योजकांना मार्गदर्शनाची एक अमुल्य संधी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन, नासिक (२४)::- उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सँटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून द्वैवार्षिक राज्यस्तरीय "उद्योगकुंभ २०१८" चे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आयोजकांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.           महाराष्ट्र राज्यातून नामवंत तसेच नव उद्योजक यांत सहभागी होत असुन इतरांनाही उद्योगकुंभात सहभाग नोंदविता येणार आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वा. नासिक शहरांतील हाँटेल एक्स्प्रेस इन , मुंबई आग्रा रोड येथे एकदिवसीय स्वरूपाचा उद्योग कुंभ भरणार आहे.         यांत सहभागी होण्यासाठी मोजक्याच जागा शिल्लक आहेत, इच्छुकांनी http://udyogkumbh. Com/ वर प्रवेश शुल्कासह नोंदणी करावयाची असुन अधिक माहीतीसाठी संदीप सोमवंशी-09850952266,  प्रणिता पगारे-09967989444,  योगेश नेरकर-09503842431  यांच्याशी संपर्क करावा,               "एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत" हा विचार घेऊन क्लबकडून उद्योग विकासाचे काम सुरू आहे, ही चळवळ अधिकाधिक उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सतत होत असुन याचाच हा द्वैवार्षिक उद्योगकुंभ आयोजनाचा एक भाग आह

प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! उपाध्यक्षपदी श्यामभाऊ जांभोलीकर व अजय गोवारी यांची नियुक्ती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रहार जनशक्ती पक्षाची ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीरः उपाध्यक्षपदी श्यामभाऊ जांबोलीकर.,अजय गवारी ठाणे /प्रतिनिधी :आ.बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची घोडदौड महाराष्ट्रभर सुरू असून ठाणे जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करण्यात आला आहे.बदलापूर येथील प्रहार जनशक्तीच्या कार्यालयात  पदाधिकारी निवड सभा दि. २२ आॕगस्ट रोजी पार पडली . ठाणे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख  अशोक बहादरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ठाणे जिल्हाध्यक्ष संभाजीराव  जाधव यांनी विस्तारीत जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली.आ.बच्चु कडू  यांच्या सुचनेनुसार जाहीर झालेल्या या ठाणे जिल्हा कार्यकारीणीत दोन उपाध्यक्ष असून या पदावर काम करून पक्ष विस्ताराची जबाबदारी श्यामभाऊ  जांंबोलीकर आणि अजय गवारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारीणीत ठाणे जिल्हा सचिव म्हणून संतोष हरावडे,सहसचिव दिपक साठे,रामचंद्र शहापूरे,जिल्हा संघटक सुरेश कदम,प्रसिध्दी प्रमुख जय चव्हाण,उल्हासनगर शहरसचिव म्हणून शरद घुडे,टिटवाळा शहर अध्यक्ष निर्भय सिंह यांना संधी देण्यात आली आहे.आ.बच्चु कडू, जिल्हा संपर्क प्रमुख अशोक बहाद