संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी रविवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालणार, या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थान कडून करण्यात आले आहे-अध्यक्ष हभप संजय धोंडगे, सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा रविवारी " ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सोहळा " - वारकरी संप्रदायमध्ये ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शिवशंकर यांचा ब्रम्हगिरी पर्वतावर पदस्पर्श झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या रूपाने येथून ज्ञानगंगेचा उगम झाला. या अवतारी भावंडांंनी ही ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली असून त्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, म्हणून समस्त वारकरी ही प्रदक्षिणा करीत असतात. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी मंडळी अाश्विन महिन्यातील एकादशीला ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा मारतात. हजारोंच्या संख्येने वारकरी पालखी समवेत भजन करीत ब्राम्हगिरीची प्रदिक्षणा पूर्ण करून गाठीशी पुण्य गाठतात. यंदाही संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली व श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी भजनी मंडळ, त्र्यंबकेश्वर, यांच्या पुढाकाराने संत निवृत्तीनाथ महाराज यांची अाश्विन एकादशी दि. ४ नोव्हेंबर रविवार रोजी स