पोस्ट्स

कनिष्ठ सहाय्यकांची वेतनवाढ रोखण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
        नाशिक – महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना  मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेतील २४ कनिष्ठ सहायकानी अद्याप पर्यंत परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सदर न केल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचार्यांनी इंग्रजी व मराठी भाषेतील ३० शब्दाहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास कोणती कार्यवाही करावी याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाही. मात्र १९९९ मधील सामान्य प्रशासन विभागाच्या राजपत्राच्या नियमावलीनुसार मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून धरण्याची तरतूद आहे. या नियमाचा आधार घेत सामान्य प्रशासन विभागाने विविध विभागात का

विश्वनाथ मोरे यांचेकडून एक्केचाळीस लाखाची देणगी ! महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद- नाम.सौ.शितल सांगळे !! संस्थेच्या विभाग नामकरण सोहळ्याच्या कौतुकास्पद सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद -सौ. शीतल सांगळे      ******************************          महात्मा फुले समाज शिक्षण संस्था संचलित, सौ.विमलताई विश्वनाथ मोरे शैक्षणिक संकुल आणि गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज नामकरण सोहळा नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शितलताई उदय सांगळे, अध्यक्षा जिल्हा परिषद, नाशिक तसेच नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार  पंकज भुजबळ यांचे शुभहस्ते व महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष   अँड. सुभाष सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  याप्रसंगी संस्थेस भरीव देनगी देणारे  विश्वनाथ सोनाजी मोरे यांनी त्यांच्या धर्मपत्नी स्व . विमलताई   विश्वनाथ मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या आवारास पत्नीचे नांव देण्यासाठी रुपये एक्केचाळीस लक्ष देणगी संस्थेस देण्यामागची भुमिका विषद केली. विश्वनाथ मोरे म्हणाले की, मुले आणि मुली सुस्थापित असल्यामुळे  स्वतःची पेंशन बँक खाती जमा होती. धर्मपत्नी स्व. विमलताई यांचे सौभाग्याचे लेने तथा सर्व दागिने कुटुंबाने संस्थेस दान करण्याची मुभा दिली. स्व. विमलताई यांचे सर्व

जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू (अँटलांटा) नासिक जिल्ह्यातील लसीकरण मोहीमेबाबत समाधानी ! मोहीमेत शिक्षण विभागालाही सहभागी करून घेण्याची डाँ. नरेश गितेंची सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      नाशिक  - जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीने जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभागाची महत्वपूर्ण भूमिका असल्याने शिक्षण विभागाला मोहिमेत सहभागी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली. (अँटलांटा) अमेरिका येथून जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी अँलन सी.वू  हे गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी सुरगाणा येथील अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली. दुर्गम भागात मोहिमेस मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत आज अँलन सी.वू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेवून मोहिमेबाबत चर्चा केली अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी  शिक्षण विभागाची भूम

नैराश्याच्या गर्तेत नासिक जिल्हा परिषद ! वरिष्ठांचा जाच या संशोधनाच्या विषयाला कुणीतरी हात घालायला हवा !! खालील लिंकवर क्लिक करा मंथन करून तणावमुक्त रहा-संपादक

इमेज
जिल्हा परिषद नासिक अंतर्गत काम करीत असतांना कर्मचाऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व त्यातून घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणे आज प्रशासनापुढील मोठे आव्हाण असल्याचे दिसत आहे, वरिष्ठांचा जाच सहन करणारे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे पळ काढू शकत नाहीत तरीही कालची सिन्नर येथील आरोग्यसेविकेची आत्महत्या हे त्याचेच द्योतक असल्याचे बोलले जात आहे, अडीच महीन्यापूर्वी आरोग्य विभागांतील मालेगांव तालुक्यातील कर्मचाऱ्याची आत्महत्याही चर्चेत आली होती, वरिष्ठांचा जाच होतो की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी परिस्थितीनुसार जाच होण्याचे पारडे जड ठरत आहे, याचा परिणाम काही अधिकारी कर्मचारी स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन मुक्त होण्याचा मार्ग अवलंबतात, आरोग्य व शिक्षण विभागाकडे सत्ताधाऱ्यांचे एक मोठे कुरण म्हणून बघण्याचे कारणही अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे. वरिष्ठांच्या जाचासोबतच ठेकेदाराने केलेल्या दादागीरीचे गेल्या आठवड्यातील प्रकरणानेही जिल्हा परिषदेचे वातावरण ढवळून निघाले होते, मागच्या सर्वसाधारण सभेदिवशी अधिकारी-कर्मचारी

आज पाणीदार व्यक्तीमत्व उर्फ पाणदेव कै. ए.टी.पवार यांची जयंती ! सक्षम व विकासात्मक बिरूदावलीचा सर्वमान्य नेता ! विशेष लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" शनिवार दि.1 डिसे माजी मंत्री ए.टी.पवार जयंती) """"""""""""""""""""""""""""""""""""""""""""" विकासाचा ध्यास घेतलेला कर्तृत्ववान नेता:ए.टी.पवार """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" ए.टी.पवार जयंतीनिमित्त विशेष लेख... """""""&

एलइडी व्हँनचा शुभारंभ, गांवागांवात जाऊन करणार जनजाग्रुती ! शासनाकडून निवडलेल्या गांवात जाऊन या माध्यमाचा उपयोग करावा-शीतल सांगळे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
       नाशिक  - राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छते विषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे  जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात  या एलईडी व्हॅनचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.  या एल इ डि व्हॅन द्वारे स्वच्छतेविषयी गावागावात जनजागृती  करण्यात येणार आहे.        यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काळे, अशोक डोंगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,  प्रदीप चौधरी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना शितल सांगळे यांनी शासनाकडून निवडलेल्या सर्व गावात प्रभावीपणे या माध्यमाचा उपयोग करून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. या एलईडी व्हॅनच्या- माध्यमातून  जिल्हास्तरावर शाश्वत स्वच्छता, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयाचा वापर व स्वच्छता, व अन्य पाणी व स्व