पोस्ट्स

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध संघटनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनिल लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू व्यक्यिमत्वा मुळे जिल्हयासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले असून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अनिल लांडगे यांनी आजपर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेत काम करताना अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध नियम तसेच त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यतीन पगार यांनी लांडगे हे अभ्यासू अधिकारी असल्याचे सांगत यापुढेही त्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. उप मुख्य

दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!!              दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत केंद्र शासनामार्फत सदर विषय मार्गी लावणेकामी शून्यकाळात विनंतीपूर्वक प्रश्न सादरीकरण करताना डॉ.भारती ताई प्रवीण पवार हीच परिस्थिती कायम राहिली आणि शासनामार्फत जर यावर काही तोडगा काढला गेला नाही तर डिसेंबर अखेर पर्यंत जवळपास 3000 गावांच्या वर दुष्काळाचे भयंकर सावट तयार होईल. करिता केंद्र सरकार द्वारा जलयुक्त शिवार अभियान व इतर योजनांच्या अंतर्गत सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

आयपीएस अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला आयपीएस अधिकारी दर्जा ! पोलिस आयुक्त व डॉक्टर यांचे सर्व स्तरांतून स्वागत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे  सागर बोरसे याची भेट IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला IPS  अधिकारी दर्जा !         आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा. सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना  भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही वि

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर !! ग्रुप रेनोची नवीकोरी कार, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर ! भारतीय वाहनबाजारात लवकरच दाखल होत आहे रेनो ट्रायबर !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
## भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर   ग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर !  ## ## रेनो ट्रायबर ## नवी दिल्ली::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर ची आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन जे भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.          “ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ समजून भारतात रेनो उचलली आहे,  कंपनीची महत्त्वाकांक्षा ही धोरणात्मक योजना "ड्राईव्ह द फ्युचर" प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत रेनोची विक्री दुप्पट करायची आहे. रेनो ट्रायबर ही एक अद्वितीय संकल्पना जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे," असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लो

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! नासिक::- वाडीवऱ्हे येथील वडीलोपार्जित शेतगट ५३ चे फेरफार रजिस्टर चर्या ६(ड) नोंदीच्या नकला देणेकरीता तत्कालीन तलाठी सुनतीलाल शिवाजी गावीत याने ४००/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम १३ आॅगस्ट २०१४ ला वाडीवऱ्हे बाजार पटांगणात स्विकारण्यात आली होती, त्यांचा गुन्हा वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्याचा निकाल काल मा. जे. पी. झपाटे , जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ नासिक यांनी निकाल दिला असून कलम ७ प्रमाणे तीन वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद, तसेच कलम १३(२) प्रमाणे चार वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे गुन्ह्याचे कामकाज श्रीमती विद्या जाधव यांनी पाहीले.

पोलिस अधिकारी, कर्मचारी यानी सहकुटुंब लुटला नाटकाचा आनंद !! भरत जाधव चा पोलिस आयुक्तांनी केला सत्कार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
                 नासिक::-पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व एकदंत फिल्मस यांच्या संयुक्त विद्यमाने काल कालिदास कलामंदिर येथे भरत जाधव निर्मित "मोरूची मावशी"  या मनोरंजनपर नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकुटुंब नाटकाचा आस्वाद घेतला. नासिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांचे वतीने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव व एकदंत फिल्मसचे प्रोड्युसर अमित कुलकर्णी यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त श्रीमती माधुरी कांगणे,पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले व सर्व सहा.पोलीस आयुक्त उपस्थित होते .

सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी !!              नासिक::- आपल्या 'व्यवस्थेतच ' भयानक दोष आहे. मराठा समाजासह धनगर ,आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्या समोर आ वासून उभे आहेत.आणि दुसऱ्या बाजूला या समस्यांना सामोरे जात असताना पर्याय मिळत नसल्याने या प्रत्येक समाजातील घटक जीवन संपविण्याचा निर्णय घेत गळ्याला फास लावून घेत आहे.एकामागून एक माणूस अशा पध्दतीने स्वतःला संपवू लागला तर शासन नावाची व्यवस्था प्रेतांवर राज्य करणार आहे का? अशा ओसाड मनोवृत्तीचा कारभार सुरू असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,आपण हा सारा उपद्व्याप का आणि कुणासाठी करतो आहोत? म्हणूनच समाजाच्या पदरात त्याच्या हक्काचे योग्य दान टाकण्याचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.पहिली पायरी म्हणून सध्या ऐरणीवर असलेला मराठा, धनगर,  मुस्लिम आर

डॉ. भारती पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारती पवार यांचा दि.22 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .        सध्या दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असताना मु ख्य मंत्र्यांनी अधिवे शन सं पल्यानंतर डॉ. भारती पवार यांना मुंबईत सत्कारासाठी निमंत्रित केले होते, दिं डो री लोकसभा मतदारसंघा तून डॉ. पवार या पही ल्या महिला खासदा र व मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने त्यांचा सन्मानाने सत्कार सोहळा भाजपा महाराष्ट्र प्र देश कार्याल यात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

योग विद्याधाम यांच्यावतीनेयोग दिनानिमित्त (२१ जून) मोफत सामुहिक योग साधना व रक्तदान शिबीर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
योग विद्याधाम ओंकार नगर नाशिक यांच्यावतीने योग दिनानिमित्त मोफत ‘ सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबीर’ नाशिक,दि.२० जून :- योगविद्याधाम ओंकार नगर तसेच अत्रेयनंदन सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने (२१ जून) जागतिक योगदिनाचे औचित्य साधून माऊली लॉन्स, कामटवाडे सिडको नाशिक येथे ‘सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू डॉ.विश्वासराव मंडलिक, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहे. या सामुहिक योग साधना व रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्याधामचे नाशिकचे अध्यक्ष मनोहर कानडे, उपाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पुरी, कार्यवाहक अॅड. अमरजितसिंग गरेवाल, सिडको विभाग अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष संजय जाधव, कार्यवाहक शंकरराव बोराटे, योगशिक्षिका कांचन खाडे यांनी केले आहे. योग विद्याधाम यांच्यावतीने निरोगी आयुष्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार केला जात असून त्यांच्याकडून वर्षभर विविध योग वर्गाचे आयोजन केले जाते. नाशिक शहरात प्रकल्प प्रमुख व सहप्रकल्प प्र

पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत छावा क्रांतीवीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रूग्णवाहिका यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभहस्ते उद्घाटन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांती वीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवा वारकऱ्यांच्या चरणी रूजू नाशिक::-छावा क्रांतीविर सेनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर्स , रूग्णवाहीका , औषधं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा  आज बुधवार दि.१९ जून रोजी रूजू केली. या सेवेला युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले (खासदार)  यांच्या विशेष प्रेरणेने ही सेवा रूजू केल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश संघटक नितीन सातपुते यांनी सांगीतले.             छत्रपतींनी वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला अभय दिले, वारकऱ्यांची सेवा केली त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांचे पाईक म्हणून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने ही सेवा पुरवली जाते. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर व सहकाऱ्यांचे पथक व सोबत विविध आजारांवरील गोळ्या औषधे आदींचा पुरवठा करून आज नाशिकमध्ये दिंडी सोहळ्याचे स्वागत करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.न