पोस्ट्स

मुख्यमंत्र्यांना कर्मचारी महासंघाचा इशारा ! कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा,अन्यथा संप करण्याची वेळ येईल असं करु नका, असा इशारा जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून निदर्शने करून देण्यात आला !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत  प्रश्न मार्गी लावा .... अन्यथा संपाची वेळ आणू नका .. जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचा इशारा .. जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आज  दि. ३ जुलै रोजी जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ व सलग्न सतरा संवर्गीय कर्मचारी संघटनांचे वतीने संपाचे पाश्र्वभूमीवर दि ४ ऑगस्ट १८ ला मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने, जोरदार निदर्शने करून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी सर्व संवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. . प्रमुख मागण्या : राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या तात्काळ देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्माण करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त

सातवा वेतन आयोग अधुराच, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी आज करणार निर्दशने !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
सातवा वेतन आयोग अधुराच,कर्मचारी करणार ३ जुलै ला निर्दशने ... मागील वर्षाचे तीन दिवसाचे संपानंतर राज्य शासनाने १ जाणेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र सातवा वेतन आयोगातील त्रुटीमुळे अंमलबजावणी अधुरीच असल्याने कर्मचारी मध्ये नाराजीची संतप्त भावना आहे .   यशस्वी संपानंतर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समीती आणि मा मुख्यमंत्री यांचे ४ ऑगस्ट१८ च्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी यांना केंद्राप्रमाणे वेतन भत्ते देणे, अशंदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच  पेन्शन योजना लागू करणे, सर्व विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुकंपावरील नियुक्त्या देणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना दोन वर्ष संगोपन रजा मंजुर करणे,  सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मिती करुन जिल्हा परीषद संवर्गातून रिक्त व नविन पदे भरणे, परीभाषीत पेन्शन योजनेतील कर्मचारी यांचे १० वर्षाचे आत मृत्यु झाल्यास वारसास १० लाख सानुग्रह अनुदान मंजुर करणे, अंशदाई पेन्शन धार

नासिक जिल्ह्यातून नांदेड येथील अधिवेशनास ३५० जणांची उपस्थिती राहणार !!!-- जिल्हाध्यक्ष पवार यांची माहिती,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नांदेड येथील अधिवेशनास ३५० पत्रकार उपस्थित राहणार ! जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती पिंपळगांव( ब )::-नांदेड येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी होणाय्रा मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनास नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ३५० सभासद पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.          पिंपळगाव बसवंत येथे स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद, मुबई हि देशभरातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असून मातृसंस्था असलेल्या परिषदेच्या आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती राहिली आहे. हि परंपरा नांदेड येथील अधिवेशनात कायम राहणार असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुमारे साडेतिनशेहून अधिक सभासद उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला, स्वागत निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे यांनी केले.        सरचिटणीस कल्याणराव आवटे यांनी प्रस्ताविक करुन तालुकानिहाय अधिवेशन नियोजना

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध संघटनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनिल लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू व्यक्यिमत्वा मुळे जिल्हयासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले असून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अनिल लांडगे यांनी आजपर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेत काम करताना अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध नियम तसेच त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यतीन पगार यांनी लांडगे हे अभ्यासू अधिकारी असल्याचे सांगत यापुढेही त्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. उप मुख्य

दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!!              दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत केंद्र शासनामार्फत सदर विषय मार्गी लावणेकामी शून्यकाळात विनंतीपूर्वक प्रश्न सादरीकरण करताना डॉ.भारती ताई प्रवीण पवार हीच परिस्थिती कायम राहिली आणि शासनामार्फत जर यावर काही तोडगा काढला गेला नाही तर डिसेंबर अखेर पर्यंत जवळपास 3000 गावांच्या वर दुष्काळाचे भयंकर सावट तयार होईल. करिता केंद्र सरकार द्वारा जलयुक्त शिवार अभियान व इतर योजनांच्या अंतर्गत सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

आयपीएस अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला आयपीएस अधिकारी दर्जा ! पोलिस आयुक्त व डॉक्टर यांचे सर्व स्तरांतून स्वागत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे  सागर बोरसे याची भेट IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला IPS  अधिकारी दर्जा !         आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा. सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना  भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही वि

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर !! ग्रुप रेनोची नवीकोरी कार, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर ! भारतीय वाहनबाजारात लवकरच दाखल होत आहे रेनो ट्रायबर !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
## भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर   ग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर !  ## ## रेनो ट्रायबर ## नवी दिल्ली::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर ची आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन जे भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.          “ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ समजून भारतात रेनो उचलली आहे,  कंपनीची महत्त्वाकांक्षा ही धोरणात्मक योजना "ड्राईव्ह द फ्युचर" प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत रेनोची विक्री दुप्पट करायची आहे. रेनो ट्रायबर ही एक अद्वितीय संकल्पना जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे," असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लो