पोस्ट्स

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न ! कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांसाठी संस्थेच्या वतीने मदत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नाशिक::- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नाशिक संस्थेची ३० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळी च्या वातावरणात अध्यक्ष विक्रम पिंगळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.  ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मासिक वर्गणी १०००  रु. करण्यास सर्वानुमते मंजूरी दिली. संस्थेच्या मालकीची स्वताची इमारत व्हावी अशी सभासद व संचालक मंडळाची इच्छा असून त्यासाठीच्या निधीत दरवर्षी तरतूद करण्यात येत आहे त्याप्रमाणे याही सर्वसाधारण सभेने १० लक्ष इतक्या निधीस मंजूरी दिली. सन २०१८/१९ साठी ९% लाभांशला मंजूरी दिली. संस्थेची सभासदांना एस एम एस सुविधा सुरू केली याबद्दल सभासदांनी अध्यक्ष विक्रम पिंगळे व संचालक मंडळाचे व अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने कोल्हापूर-सांगली पुरग्रस्त नागरिकांना २५००० रु   (वस्तु स्वरुपात) देण्याचे जाहिर केले.            याप्रसंगी सभासद पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सभेस अध्यक्ष विक्रम पिंगळे, उपाध्यक्ष नितिन पवार, सचिव भाऊसाहेब पवार, विजयकुमार हळदे, पंडितराव कटारे, राजेंद्र भागवत , जी.पी. खैरनार, मधुकर आढाव, पांडुरंग वाजे , नितिन भडकवाडे, अमित आडके, संदीप दराडे, किश

छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- रुपये , एक ट्रक जीवनावश्यक वस्तू कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत !एक हात मदतीचा...! साप्ताहिक न्यूज मसाला कडून चटणी पॅकेटस् ची मदत रवाना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- रुपये कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत ! एक हात मदतीचा...        नासिक::-छावा क्रांतीवीर सेना, गरीबरथ ढोलपथक, लक्ष्मीविजय वरदलक्ष्मी लाॅन्स, वक्रतुंड केटरर्स, आदेश कलेक्शन, श्रीदत्त मंदिर देवस्थान नासिक, इडू कॉईन फाऊंडेशन,साप्ताहिक न्यूज मसाला यांच्याकडून संयुक्तपणे कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना खालीलप्रमाणे वस्तूरूपी मदत देण्यात आली. १००० नग झाडू, १००० नग फिनेल बाॅटल, १००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या,          २५० नग साड्या, १०० नग सोलापूरी चादर ३०० नग परकर, १५ बिस्कीट बाॅक्स , १००० किलो तांदूळ-गहू, १०० नग तेल पॅकेज १००० सॅनिटरी नॅपकिन न्यूज मसालाच्या वतीने चटणी पॅकेटस्, तसेच विविध प्रकारची औषधे, विविध प्रकारचा किराणा, व रोख स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१०००/- (एक्कावन्न हजार रुपये)रोख स्वरूपात व सदर मदत कोल्हापूर येथे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली, यावेळी नासिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,छा

माणुसकीच्या नात्याने पुरग्रस्तांना मदत – शितल सांगळे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी संघटना यांचेकडून दहा लाख रुपये किंमतीची जीवनावश्यक सामुग्री कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे रवाना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
               नाशिक  : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलया कोल्हापूर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी  नाशिक जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने आज विविध जिवनावश्यक वस्तुंनी भरलेला ट्रक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनिषा पवार, आरोग्य व शिक्षण सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. यामध्ये १० लक्ष रुपयांपर्यतच्या वस्तुंचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयात शहरे व गावे पूरपाण्यामुळे अद्यापपर्यत पूर्णपणे वेढलेली आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा मिळणे दुरापास्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेने व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी नाशिक जिल्हा परिषद अधि

अखिल भारतीय छावा संघटना महिला आघाडी आयोजित वीर जवानांचे औक्षण करून रक्षाबंधन सोहळा साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर यांच्या तर्फे रक्षाबंधन चे औ चित्य साधून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे आकर्षण करून राखी बांधण्यात आली !         नासिक (१३)::-अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमानाने आज देशाचे संरक्षणासाठी आपल्या परिवारा पासुन दुर राहुन भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तसेच आता झालेल्या कोल्हापूर-सांगली येथील पुर ग्रस्तांना सहकार्य करणाऱ्या विर जवानांना काल (दि.१२) रक्षा बंधना निमित्त देशाचे रक्षण करणाऱ्या  जवानांना अखिल भारतीय छावा संघटना नाशिक आणि सरस्वती विद्यालय भगुर ह्यांचे संयुक्त विद्यमाने छावा महिला पदाधिकारी तसेच सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थीनी यांच्या हस्ते जवानांना औक्षण करून राखी बांधण्या आली.या वेळी जवानांनी देशाचे व देशातील नागरिकांचे, माता-भगीनींचे सतत रक्षण करु असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष शिंदे व अखिल भारतीय छावा महिला जिल्हाअध्यक्ष ज्योती झणकर यांनी केले होते, हया वेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेचे ज़िल्हाध्यक्ष आशिष हिरे, नाशिक शहरअध्यक्ष

छावा क्रांतीवीर सेनेचे ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न ! ठराव मंजुरीसह राज्यातील उत्कृष्ट मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले !! खासदार, आमदार, साधू-महंत, नेत्यांच्या उपस्थितीत यशस्वी अधिवेशन पार पडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
छावा क्रांतीवीर सेना, महाराष्ट्र.आयोजित ५ वे राष्ट्रिय महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न.              शिर्डी::-उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.       छावा क्रांतीवीर सेना. महाराष्ट्र ,५ वे राष्ट्रीय महाअधिवेश ,रविवार दि.११/०८/२०१९ रोजी सिद्धसंकल्प लॉन्स ,शिर्डी,राहता रोड येथे सायं ठीक ०५ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर सुरेश जाधव यांचा भव्य शाहिरी पोवाड्याचा कार्यकमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सुरू झाले. यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा आदी क्षेत्रातील तसेच महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली., अधिवेशनाचे अध्यक्ष :-आ. विनायक मेटे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई अधिवेशनाचे उद्घाटक :-  प.पूज्य.राष्ट्रसंत ” भय्यूजी महाराज . “ यांच्या धर्मपत्नी डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख ,इंदोर व मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक विश्वनाथ वाघ प्रदेश

पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची औषध फवारणी व धूर फवारणी !              नाशिक (दि.१०) –सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल यासारख्या पूरग्रस्त भागात साचलेला गाळ व कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्त्यांनी औषध व धूर फवारणी केली. औषध व धूर फवारणीची सुरवात रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती येथून करण्यात आली. गोदावरी नदीला आलेला आलेला महापुर ओसरल्यानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. परंतु गोदावरी नदीच्या महापुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, फुल बाजार, तीळभांडेश्वर लेन व दही पूल परिसरात शिरल्याने संपूर्ण परिसर पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचल्याने रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे.  पुरातील पाण्यामुळे आलेला गाळ व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता राष्ट्रवादी पक्षाकडून औषध, धूर फवारणी करण्यात आली आहे. औषध फवारणी व धूर फवारणी

ब्रेकींग,,. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेतील सविस्तर मुद्दे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगलीतील पत्रपरिषदेतील सविस्तर मुद्दे - यंदाचा पाऊस अतिशय प्रचंड झालेला आहे. सांगलीत २००५ ला पूर आला, तेव्हा ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस, २०१९ मध्ये ९ दिवसांत ७५८ टक्के पाऊस. - कोल्हापूरचा पाऊस २००५ मध्ये ३१ दिवसांत १५९ टक्के, तर २०१९ मध्ये ९ दिवसांत ४८० टक्के - कोयनामध्ये १०० टीएमसी पाणी असतं, ९ दिवसांत ५० टीएमसी पाणी भरले गेले आहे. त्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. - कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती - ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून टीम बोलावल्या. आज नौदलाच्या १५ चमू विशाखापट्टणम येथून येत आहेत. - केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. जितक्या टीम मागितल्या जात आहेत, तितक्या टीम्स प्राप्त होत आहेत. - सांगलीत सुमारे ९५ बोटी कार्यरत. - सांगलीत १०१ गावांतील २८५३७ कुटुंब विस्थापित - ३५ हजार जनावरं सुद्धा विविध शिबिरांमध्ये - ब्रम्हनाळच्या घटनेत १२ जणांचा मृत्यू, ८ बेपत्ता, २ जखमी. - याव्यतिरिक्त कुठेही जिवितहानीचे वृत्त नाही. - नजरपाहणीनुसार, २७४६८ हेक्टर जमीन बाधित. पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती ह

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता ! एस. भुवनेश्वरी यांच्या मान्यतेने डॉ.दावल साळवेंमार्फत उपोषणाची सांगता !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणांतर्गत आरोग्य सेवक पदाच्या नियुक्तीस मान्यता दिली !                   नाशिक::-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाच्या सन२००६ते२०१० या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% आरक्षण अंतर्गत एकूण ८ प्रलंबित आरोग्य सेवक पदी भरावयाच्या आरक्षित पदांच्या नियुक्ती मिळणे करिता वंचित ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास जेजुरकर व संजय विसपुते यांनी नाशिक जिल्ह्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे व राजू देसले यांचे नेतृत्वाखाली दिनांक ६/८/२०१९ पासून सुरू  केलेले आमरण व साखळी उपोषण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस. भुवनेश्वरी यांनी उपोणार्थीसह इतर वंचित कर्मचार्यांना गेली ५ वर्षां पासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सेवक  पदाच्या नियुक्ती देण्यास मान्यता दिल्यामुळे सुरु असलेले उपोषण आज दि.९/८/२०१९ रोजी मागे घेण्यात आले. उपोषणाची सांगता करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. साळवे , सहाय्यक प्रशासन अधिकारी जीभाऊ शेवाळे, अनिल गीते व कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनवणे उपस्थित

जलप्रलयच ! बाकी काही नाही ! मदत मागायची वेळ येण्याआधीच सामाजिक जाणीवेतून मदत करायला काय हरकत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जलप्रलयच !  बाकी काही नाही ! कोल्हापूर::- कोल्हापूर सांगली ला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे.  महाजनादेश यात्रा सोडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे सह अनेक राजकीय नेते कोल्हापूर वासियांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत, स्वता छत्रपती संभाजी राजे बोटीच्या माध्यमातून पुरात व जलप्रलयात अडकलेल्यांना बाहेर काढीत आहेत, सोशल मिडीयावर तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल,          कोल्हापूर शहर १००% या प्रलयाचा सामना करीत आहे, ५०% शहराला हानी पोहोचली असून  गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत, बाजारपेठेतील सर्व मालाचे नुकसान झाले आहे. रोज लागणाऱ्या अन्न धान्य, दूध व जीवनावश्यक वस्तू मिळेनासे झाले आहे, औषधे व वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे, या जलप्रलयापासून निर्माण झालेली परिस्थिती मानवाच्या हाताबाहेर गेली आहे. आज कोल्हापूर सांगली वासीयांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे, काही तासांपूर्वी सांगलीत बोट उलटून दहा लोकांना जलसमाधी मिळाली आहे, आपल्याच बांधवांवर असे अस्मानी संकट

लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लवकरच राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी होणार, पत्रकार सुरक्षा समितीला उपसंचालक यांचे पत्र !        राज्य सरकार व केंद्र सरकार केवळ अधिस्वीकृती पत्रिका धारक असलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार समजते व तशी शासन दरबारी नोंदणी केलेली असते अश्या अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतो इतर पत्रकारांना लाभ मिळत नाही हे सरकारचे धोरण चुकीचे असून इतर हजारो पत्रकारांवर अन्याय होत असून महाराष्ट्र मध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो पत्रकार जीवावर जीवघेणी जोखीम पत्करून अल्प मानधनावर विविध चॅनल्स ,दैनिके, सप्ताहिके युट्यूब चॅनल वेब पोर्टल, पाक्षिक, मासिके मध्ये काम करत आहेत त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जाचक अटी मुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळत नसल्याने त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार पत्रकार म्हणून मान्यता देत नसल्याने अश्या गरीब वंचित पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीची राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी करावी व त्यांना पत्रकारांसाठी असलेली यो

८ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन ! १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या देण्यात येणार !! मोहीमेचा फायदा घेण्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
           नासिक::- जिल्हा परिषद आरोग्य विभागा व महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, यांच्या सहभागाने येत्या ८ ऑगस्ट  रोजी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व नगरपालिका क्षेत्रात सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळा या ठिकाणी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना जवळच्या शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८% मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवीजंतां पासून धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे आयोजन करण्यात येते, या दिवशी १ते १९ वर्षे वयोगटातील तील सर्व मुला-मुलींना जवळच्या सरकारी शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येते  तसेच या मोहिमे पासून वंचित राहिलेल्या मुलांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे, यामध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात १ ते २ वयोगटातील ५,१२,०४३ लाभार्थी बालके असून व २ ते १९ वयोगटातील ११,६७,००७ लाभार्थी बालके आहेत, एकूण १२,१८,२५० बालकांना त्याचा लाभ दिला जाणार आहे .या कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे  २९ जुलै रोजी समन्वय स

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे शुभहस्ते करण्यात आले ! जन्मकहाणी पुस्तकाचे प्रकाशन ! शहरी भागातील नव्या पिढीला ग्रामीण एकत्रित कुटुंब पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असे पुस्तक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक::- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या स्वमालकीच्या कार्यालयाचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शीतल उदय सांगळे यांचे शुभहस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.              कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या कामकाजाचा लेखा जोखा नमूद करुन संस्था स्वमालकीच्या वास्तुत स्थानापन्न होत असल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे नमुद केले. कार्यक्रमात जी.पी. खैरनार यांनी कौटुंबिक कहाणी स्वरुपात जन्मानंतरची ज्ञात असलेली "जन्म कहाणी"  या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा सौ. शीतल उदय सांगळे व उपस्थित मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आला.             या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शितलताई उदय सांगळे यांनी आरोग्य कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व सभासद यांनी थोड्याच अवधीत संस्थ

आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने जलधारा रूग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ! ञ्यंबकेश्वर::-तालुक्यातील वाढोली येथील आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या पाण्याने गळक्या छतातून जलधारा  येत असल्याने उपकेंद्रात पाणी साचले आहे, यामुळे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन ही उपकेंद्राला दुरूस्ती निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे. वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने त्यावेळी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत असून उपकेंद्र सोय नसुन खोळंबा झाला आहे.त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रूग्नांना उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी,खोकला,ताप यांचे रूग्ण आहेत. त्यांना खाजगी दवाखान्याचा उपचार घ्यावा लागत असल्याने लाखो रुपयांचे उपकेंद्र बिनकामाची वास्तू होऊ पाहते आहे.  उपकेंद्र  दुरुस्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी यांच्याकडून  वारंवार करण्यात आ

न्यूज मसाला एक्सक्ल्युझिव्ह! आज नवनिर्वाचित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी "त्या" रस्त्याची माहिती घेणार ! १ आॅगस्ट रोजी केला जातेगांवचा दौरा !! प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना जनसंपर्काच्या माध्यमातून पोहचविली जाणार- एस. भुवनेश्वरी,मुकाअ,जिप. !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक ::- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी १ आॅगस्ट रोजी जातेगांव चा दौरा करून आपल्या कार्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात केली. सध्या कार्यालयीन कामकाजास व फाईलींचा स्वअभ्यासाबरोबरच निपटारा करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे, लवकरच जिल्ह्यातील पंचायत समित्या व गावांना भेटी देण्याचे व तेथील अडचणी समजून घेत दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे न्यूज मसालाशी बोलताना सदर माहिती दिली.                 प्रशासनाकडून विकासात्मक व प्रशासकीय कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी,  यांसाठी जनसंपर्काच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.            जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा या रस्त्याच्या चौकशी ची मागणी केली आहे, सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने की जिल्हा परिषदेने तयार केला आहे ? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार कोण ?, बील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे की जिल्हा पर

गोदावरी नदी व उपनद्या प्रदुषणमुक्त करणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभापती उध्दव निमसे यांनी घेतलेल्या भेटीत दिले नीधी मागणीचे निवेदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
          प्रतिनीधी ::-भारतातील पवित्र गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील पवित्र गोदावरी नदी व उपनद्या या प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच नाशिक शहरातील विकास योजना आराखड्यातील डीपी रस्ते पूल व तद्अनुषंगिक मुख्य रस्ते विकसित करणेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार , माजी मंत्री बबन घोलप , जगदीश गोडसे, सचिन हांडगे  यांनी निवेदन दिले, या योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबाबत मागणी करण्यात आली.          नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अंसित्त्वातील मलनि:सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी  राष्ट्रिय नदी संवर्धन योजने अंतर्गत रु. ३२२ कोटींच्या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विकास योजना आराखडयातील डी.पी. रस्ते, पुल व                         तद्नुषंगीक मुख्य रस्ते विकसित करणेच्या कामांसाठी निधी प्राप्त व्हावा व त्यातून शहर विकासाला चालना मिळू शकेल असे निवेदन यावेळी नाशिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केले.     

खासदार डॉ भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
खासदार डॉ.भारती पवार यांनी घेतली केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट मंत्र्यांची भेट !     प्रति निधी::-  दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दि.१ ऑगस्ट रोजी निफाड येथे ड्रायपोर्ट व्हावे या करीता केंद्रीय शिपिंग ट्रान्सपोर्ट, पोर्ट मंत्री मनसुख मांडवीय यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी प्रसंगी निफाड येथे ड्रायपोर्ट उभारणी बाबत चर्चा करत असताना ड्रायपोर्ट कसे व्यवहार्य आहे हे खा.डॉ.भारती पवार या पटवून देत शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा कणा आहे आणि या ड्रायपोर्टमुळे ग्रामीण भागासह शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास अधिक मदत होईल. या संदर्भात अधिक सकारात्मक चर्चा करत मंत्री महोदयांनी आपण देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. सदर भेटी प्रसंगी सुरेश बाबा पाटील, केदा आहेर, आ.अनिल कदम, व्यवस्थापकीय संचालक खरे आदी उपस्थित होते.

व्हर्च्युअल क्लासरुमची जिल्हयाने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला !! असा कोणता जिल्हा व कोण जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक   –  आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण् शिक्षण उपलबध करुन देण्यासाठी  व्हर्च्युअल क्लासरुम महत्वाच्या आहेत. यासाठी नाशिक जिल्हा परिषदेमार्फत प्रायोगिक तत्वावर सामाजिक बांधिलकी (सीएसआर) या उपक्रमातून उपलब्ध होणा-या निधीतून व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या 100 शाळांमध्ये राबविण्यात येणार असून आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.              व्हर्च्युअल क्लासरुमबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून याबाबत माहिती देवून या उपक्रमाचे संगणकीय सादरीकरण केले. पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्हयाने याची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अशा पध्दतीने व्हर्च्युअल क्लासरुम हा उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला. शहर व गाव यांच्यात

आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...!   प्रतिनिधी::-  विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या "बे दुने चार"  या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच "शिक्षक कधीच  सामान्य नसतो" या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान क

शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी ४० ते ५० हजार सरपंच उपस्थित राहतील !! नासिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण-शितल सांगळे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी (दि.३१) शिर्डी (जि. अहमदनगर) येथे सरपंच, उपसरपंच यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील ४० ते ५० हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हयातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.           सरपंच परिषदेबाबत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर यांनीही यावेळी सरपंच परिषदेविषयी तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प

प्रतिक्षा संपली........ केंद्रीय राज्यमंत्री यांची छबी झळकणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला, प्रतिक्षा संपली......               या वर्षी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल न्यूज मसाला वर प्रेम  करणाऱ्या सर्व मान्यवरांप्रती दिलगीरी व्यक्त करतो, तसेच आनंदाची बातमी म्हणजे न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.           दरवर्षी जुलै च्या सुरुवातीला मुखपृष्ठावरील सन्माननीय संसद सदस्य (खासदार) मानकरी जाहीर करण्यात येते मात्र या वर्षी उशिराने पण सामाजिक जाणीव असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित  करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे.            महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते याचे सारे श्रेय आपले

पाटीलकी, देशमुखी व श्रीमंती या कारणामुळे उचभ्रू समजला जाणारा समाज नापिकी शेती, कर्जबाजारी यामुळे हतबल झाला आहे !! पाणीदार जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता !!! ग्रामीण भारत देश अस्तित्वात राहण्यासाठी शासनाने चांगले धोरण आखुन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे !!! सविस्तर लेख वाचून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी खालील लिंक शेअर करा, पुढील पिढ्यांसाठी आजच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत !!!!

इमेज
पाणीदार नाशिक जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता ! ****************************** महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्याची ओळख ही धरणांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मुंबई, जळगांव, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. मुंबईसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. तर औरंगाबाद, अहमदनगर व जळगांव या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आधुनिक शेती व्यवसायामुळे संपूर्ण भारत देशातील बागायती क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्याचा उपसा शेतीसाठी केला जात आहे. सोबत मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय उभे राहिल्यामुळे धरणांमध्ये साठविणेत आलेले पाणी औद्यगिक क्षेत्रासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. त्यातच विद्युत पंपामुळे पाणी उपसा करण्याची सुविधा कमी खर्चात व सहज होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात भुगर्भातील पाणी साठा

जमीन विकून आलेल्या पैशाचा "माज" काय असतो ? "माज...फिनिश इट" नक्की काय आहे ? सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जमीन विकून आलेल्या पैशातून जो "माज" येतो व आयुष्य काय वळण घेते, हा "माज" आजच्या तरुणाईला काहीतरी संदेश देणारा ठरेल असे आशिष जैन यांना वाटते. आशिष जैन हे दिग्दर्शक असलेल्या "माज-फिनीश इट" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिक येथे आले असता त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.         गेली काही वर्षे हा विषय समाजात नैराश्य निर्माण करणारा तर काहींना जमीन विकून आलेल्या पैशांनी नवीन व्ययसायात गुंतवणूक करुन यशाची शिखरे पादाक्रांत केलीत मात्र अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. हाच मुद्दा पकडून "माज" या चित्रपटाची निर्मिती केली आहे, "माज" सकारात्मक वा नकारात्मक हे गुलदस्त्यातच ठेवले आहे, ते येत्या २ आॅगस्ट रोजी सिनेमागृहात शिरल्यावर कळेल असे चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सांगितले.             या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे, "अमित रेखी व अर्चना संकेत," सोबत नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, व्रुंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बोरकर, जगदीश कुंभार, यासारखे कलाकार आहेत, स

शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! नासिक::- आलोसे राजू पुणा  रामोळे, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग सटाणा यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.         आलोसे राजु रामोळे याने जाखेडा धरणातून गाळ काढण्याचे मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी १३ जून २०१९ रोजी १५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार सापळा पूर्व पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रामोळे याने तक्रारदाराकडून १५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. १९ जुलै १९ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात ! खास बातमी ::- तब्बल ११३ एन्काऊंटर करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे लवकरच राजकारणात उतरण्यास सज्ज होत आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र तो आजपावेतो मंजूर करण्यात आलेला नाही.            सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा व दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवायची व मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार इतकाच सोपस्कार बाकी असल्याचे कळते !

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.       सदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

जेष्ठ विचारवंत, लेखक, राजकारणी तथा दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड ! केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला !! न्यूज मसाला परीवार नासिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
महान लढवय्ये विचारवंत राजा ढाले यांचे निर्वाण ! दलित पँथर चे संस्थापक,  आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,  ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. १६ जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी (पू) येथील त्यांच्या निवसस्थानाहून निघणार,  दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे. राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ; मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्

न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! निव्वळ फार्स की ठोस कार्यवाही ची चर्चा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! नासिक::-   ४ फेब्रु. व ६ फेब्रु. १९ ला न्यूज मसालाने प्रकाशित केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यासाठी प्रशासनाला तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागतो याबाबत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागात कुतुहलाचा विषय ठरला असून सदर रस्ता व त्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहणी हा निव्वळ फार्स ठरेल की संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.           त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराकडून बनविण्यात आला व तोच रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून ही बनविला आहे असा आरोप नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी सदर कामाची व फसवणुकीच्या चौकशीची वारंवार मागणी केली असता अखेर शुक्रवारी (दि.१२) चौकशी समितीने पाहणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर कर

योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक !! योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य- पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेह ,  स्थुलता निरावरणाचे धडे योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक  नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक नाशिक , दि.७ जुलै :-  योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.          या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.