जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! ऐतिहासिक भास्कर वाघ प्रकरणाला उजाळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून आजही अशी अफरातफर होते व प्रशासनाला उशिराने जाग येते, काही वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली गेली होती, सदर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती, "भास्कर वाघ" हे नाव न राहता एक वाक्प्रचार रूढ झाला होता, आजही आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा धनादेशावर शून्य वाढविला जात असे आता सरळ धनादेश व त्यावरील स्वाक्षऱ्याच बनावट करून तब्बल दोन कोटी ष्याऐशी लाख रुपये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे युनियन बँक खात्यातून काढून नेल्याची घटना घडली आहे. मात्र मुळ धनादेश आजही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे असताना बनावट धनादेश आरोपीने बनवलाच कसा, त्याला सदर माहिती कशी मिळाली, कव्हरींग नोट व सह्यांचा नमुना कसा प्राप्त झाला असे प्रश्र्न उपस्थित होत आहेत. राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या