पोस्ट्स

पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! जी.पी.खैरनारांच्या लेखनीतून न्यूज मसालाचा खास रिपोर्ट !! न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी नितीन पवारांचा सत्कार केला त्याप्रसंगी चर्चेदरम्यान "मतदारसंघाबाबत वडीलांचा वारसा पुढे चालवत राहणार" !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! ******************************        नाशिक::- जिल्ह्यातील आदिवासींचे नेते म्हणुन ज्यांनी साठ वर्षे राजकारण केले असे स्वर्गीय ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातून आमदार नितीन पवार निवडुन आले आहेत.            नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी बहुल क्षेत्र असे आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्रिंबकेश्वर, दिंडोरी हे तालुके पुर्णतः आदिवासी बहुल व डोंगराळ, दुर्गम - अतिदुर्गम अशी भौगोलिक स्थिती. बागलाण, देवळा, नाशिक हे तालुके अंशतः आदिवासी क्षेत्र अशी भौगोलिक स्थिती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाची आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जनतेस मुलभूत  आरोग्य सुविधा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हा दूर दृष्टिकोन स्वर्गवासी अर्जुन तुळशीराम पवार साहेब तथा ए. टी. पवार साहेब यांनी ठेवला होता. हा दूर दृष्टिकोन ठेऊनच कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी जनतेच्या जिरायती क्षेत्र हे बागायती क्षेत्र करण्याचे काम आदरणीय ए. टी. पवार साहेब यांनी केले.

हिटलरच्या पंख छाटलेल्या कोंबडी सारखी अवस्था करून घेऊ नका !!! मतदान करूया-सशक्त महाराष्ट्राला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!;

इमेज
चला मतदानाला चला;मतदान करा जरा समजून         "एकवीस  तारीख " , सर्वांना मतदान टाकण्याचे वेध लागले  आहेत. सर्वच पक्षांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की मी काय केले आणि काय करणार  आहे. कोणी सांगितले की मी काय करणार  आहे. सर्वच आश्वासनं......विश्वास तरी कोणावर  ठेवायचा. आज पंधरा दिवसात लोकांनी पाहिलं की सारेच राजकीय पक्ष आपल्या दाराशी  आले. कच-यावर  बसले. त्यांना घाण वाटली नाही,आपणही त्यांना चांगले  वाटलो. कितीही वाईट असलो  तरी. आपल्याला लुभावण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला गरळ घातली.        आपल्याला राज्याचा विकास करायचा  आहे. त्याचबरोबर आपलाही. केवळ राज्याचा विकास करुन चालणार नाही तर आपलेही हितसंबंध सरकारने जोपासले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान  करायचे. जर राज्याचा विकास होत असेल, पण आपला जर जीव जात असेल तर ते राज्य त्या हिटलरच्या कोंबडीसारखे होईल जी कोंबडी हिटलरने पाळली  होती. एका कोंबडीचे चक्क त्याने पंखच उपडून टाकले  होते. त्यानंतर तो त्यांना दाणे देत  होता. आता या कोंबडीला जर कुत्रीम पंख लावले व श्रुंगार केला तरी तिला चिरतरुणता प्रा

आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा चंग बांधला आहे का ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ! जिल्हा हिवताप अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महेंद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक, यांना १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक नासिक::- यातील तक्रारदार यांचे सन-१९८६ ते १९९२ या कालावधीमधील एक वेतनवाढ कमी दिली गेल्याचे तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे वेळी सन २०१३ मध्ये झालेल्या वेतन पडताळणीमध्ये निर्देशन वेतन फरकाचे बील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी सादर केले होते. सदर बील मंजुर करण्यासाठी आलोसे महेद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/-रू.लाचेची मागणी केल्याने, तक्रारदार यानी आज दि.१६/१०/२०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीची ला.प्र.वि.नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी केली असता पड़नाळणी दरम्यान आलोसे महेंद्र बबनराव देवळीकर यांनी तकारदार यांचेकडे २०,०००/-रू लाचेची मागणी करत त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १५,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम जिल्हा हिंवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कसं काय पाटील बरं हाय का ? पितृपक्ष संपला, आता कोण कुणाचे "कारणं" खाऊन "राज" करणार ! फड रंगतोय नासिकचा, आज कोलांटउड्या खाणारे कालचे खरे निष्ठावंत ! सविस्तर एक-दोन रिश्टर स्केल चे धक्के अर्थात किरकोळ भूकंपांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कसं काय पाटील बरं हाय का ! निवडणुकीच्या  काळात  उमेदवारांच्या कोलांटउड्या या आता जनतेला नवीन राहिलेल्या नाहीत. पक्षनिष्ठा आणि भाऊंचे  नेतृत्व भाऊंना आणि कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाईन याबाबत अनेक चर्चा निवडणुकीच्या काळात झडत असतात. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या राजकीय पटलावरही अनेक भुकंप, इच्छूकांच्या कोलांटउड्या, कार्यक़र्त्यांशी सल्लामसलत  आणि सुरु झाल्या आहेत याचा परिणाम आपल्याला दिसेलच. उमेदवारी अर्ज दाखल करायला आज आणि उद्या अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता या दोन दिवसांत काय उलथापालक्ष घडते ते बघणे रंजक ठरणार आहे. मनाला न पटणार्‍या आणि स्वप्नातील देखील विचार करता येणार नाही अशा खबरी निवडणुक काळात इच्छुकांच्या आणि विद्यमानांच्या बाबतीत येऊ लागल्याने काय सांगतो भाऊ ! खरंच की काय...? अशा शब्दांत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये घडतांना दिसत आहे. नाशिकचा विचार करता मध्य, पूर्व,पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या मध्य आणि पश्चिमची उमदेवारी भाजपाकडून जाहीर झाल्याने येथील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे. बैंठकीत सल्ला

एक पाऊल निरोगी आयुष्याच्या दिशेने महाराष्ट्र शासन - डॉ. अनुप कुमार यादव. कार्यशाळेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यशाळा व बैठक संपन्न        दिनांक १ऑक्टोबर २०१९ रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथील सभागृहात सार्वजनिक आरोग्य नाशिक विभागा तर्फे विभागीय आरोग्यवर्धिनी केंद्र कामकाज कार्यशाळा व आढावा बैठक घेण्यात आली, सदर कार्यशाळा व आढावा बैठकीसाठी डॉ.अनुप कुमार यादव, आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक रा.आ.अभियान, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तसेच या बैठकीसाठी डॉ.अर्चना पाटील अति. संचालक आरोग्य सेवा. डॉ सतीश पवार अतिरिक्त अभियान संचालक रा.ना.आ.अभियान, डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक (तं), डॉ.रत्ना रावखंडे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ,नाशिक, आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच कार्यशाळेला पाच जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी  मनपा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण व नागरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यवर्धिनी केंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते.            कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले डॉ. रत्ना

औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! आयोजकांतर्फे मनोरंजन गूरु यांच्या मनोरंजनाची खास मेजवानी !! जीपींकडून आलेल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा !            नाशिक जिल्हा शासकीय औषध निर्माण अधिकारी संघटनेने शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी यांचेसाठी हॉटेल साधना, गंगापूर रोड नाशिक येथे मनोरंजन गुरु यांचा अनोखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमात  उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घडवुन सर्वांना तीन ते चार तास मनोरंजन व हास्य विनोदात तल्लीन करुन टाकले होते. महिलांच्या व पुरुष अधिकारी यांच्या विविध खेळांतून मनोरंजन केले जात होते. कार्यक्रमाच्या मध्यानात विविध हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरुन उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांनी मनमुराद आनंद साजरा केला. विविध जुन्या गाण्यावर नाचण्याचा ठेका उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांनी धरल्यावर मनोरंजन गुरु हेही सर्व उपस्थित यांचे बरोबर गाण्याच्या तालावर नाचत होते.               उपस्थित औषध निर्माण अधिकाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी शिवाजी (आण्णा) मुसळे, श्री.मिश्रा,  पिंपळसे व श्री.मोरे साहेब यांचा सेवानिवृत्ती निमित्त

  प्लॅटून वन फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट पिकासो चा फर्स्ट लूक लाँच! दशावताराची कथा आणि व्यथा प्रथमच रूपेरी पडद्यावर !! न्यूज मसालाच्या रसिकांसाठी पिकासो बाबतचे महेश भट्ट यांचे ट्वीट !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
      'प्लॅटून वन फिल्म्स'निर्मित मराठी चित्रपट'पिकासो'चा फर्स्ट लूक लाँच! ·                 पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि व्यथा! ·                 अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय! ·                 ' पिकासो '   चे फर्स्ट लूक पोस्टर  जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले ट्विट! मुंबई, २३ सप्टेंबर २०१९: 'बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या'पिकासो' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शैलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून ह

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य ! मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली !        नाशिक  – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. आज देवळा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या खालप फाटा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आवारात पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतूक करुन जिल्हयातील सर्व शाळांमध्ये अशाप्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून जिल्हयातील ग्रामपंचायतींमध्ये याबाबत विशेष ग्रामसभा घेवून या मोहिमेचा शुभारंभ तसेच प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत प्लॉस्टिक श्रमदान, स्वच्छताफेरी, शपथ, गृहभेटी आदि प्रकारचे उपक्रम ग्रामपातळीवर राबविण्य

न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ! दिवाळी विशेषांक प्रकाशक अनेक संकटांचा सामना करीत लेखक कवी यांच्या सृजनशील शब्दांना समाजापर्यंत पोहचवितात - अॅड. बाळासाहेब तोरस्कर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !     पुणे (२२)::- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला नक्षत्रांचं देणं काव्यमंच, पुणे, या संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक, समिक्षक अॅड बाळासाहेब तोरस्कर प्रसिद्ध कवी विलास शिंदे, यशस्वी उद्योजक अतुलशेठ परदेशी, वसई येथील सुप्रसिध्द डॉ, पल्लवी बनसोडे, रेखा रोशनी मुंबई, संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे आदिंच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृहात येथे सोहळा संपन्न झाला.         पुणे येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था गेली वीस वर्षे लेखक कवी यांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. लेखक कवी यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दिवाळी अंक प्रकाशक मोठ्या कष्टाने व आर्थिक संकटातून प्रयत्नशील असतात त्यांचा सत्कार करणे व त्यांना सामाजिक पाठबळ मिळावे या हेतूने तेरा वर्षांपासून राज्यभरातील दिवाळी विशेषांकातून दरवर्षी तीन उत्कृष्ट अंकांना  गौरविण्यात येत आहे, या वर्षी न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला गौरविण्यात आ

जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! ऐतिहासिक भास्कर वाघ प्रकरणाला उजाळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब !                       जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून आजही अशी अफरातफर होते व प्रशासनाला उशिराने जाग येते, काही वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली गेली होती, सदर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती, "भास्कर वाघ" हे नाव न राहता एक वाक्प्रचार रूढ झाला होता, आजही आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा धनादेशावर शून्य वाढविला जात असे आता सरळ धनादेश व त्यावरील स्वाक्षऱ्याच बनावट करून तब्बल दोन कोटी ष्याऐशी लाख रुपये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे युनियन बँक खात्यातून काढून नेल्याची घटना घडली आहे. मात्र मुळ धनादेश आजही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे असताना बनावट धनादेश आरोपीने बनवलाच कसा, त्याला सदर माहिती कशी मिळाली, कव्हरींग नोट व सह्यांचा नमुना कसा प्राप्त झाला असे प्रश्र्न उपस्थित होत आहेत.      राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर तुषार जगताप यांना मिळाली संधी... !!! न्यूज मसाला परीवाराकडून त्यांच्या निवडीचे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नाशिक मधून तुषार जगताप यांना मिळाली संधी...                नाशिक(२१) :- राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रथमच महामंडळाच्या अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा त उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा देण्यात आला असून नऊ संचालक महाराष्ट्रातील विविध भागातून निवडण्यात आले असून नाशिक विभागातून तुषार जगताप यांना संधी देण्यात आली आहे. _________________________________________            न्यूज मसाला चे हितचिंतक आमचे मित्र तुषार जगताप यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !                          संपादक                        नरेंद्र पाटील __________________________________________          या निवडीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन तसेच नाशिक खासदार, आमदार सर्व पक्षीय पदाधिकारी मराठा संघटना, मराठ

शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बॅंक ! २२ सप्टेबरला समाज प्रबोधन शोभायात्रा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन !! कार्यक्रम उदय निरगुडकर व चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत !!! नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक चे शंभराव्या वर्षात पदार्पण !      नासिक (२०)::- नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक २२ सप्टेंबर २०१९ ला ९९ वर्ष पूर्ण करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत स्वच्छ व सुंदर नासिक, प्लॅस्टिकमुक्त नासिक, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण जनजागृती करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण कार्यक्रमास जेष्ठ लेखक व व्याख्याते उदय निरगुडकर, सिने व नाट्य अभिनेता चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे असून सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह शोभायात्रेचे आयोजन केले आहे.          शतक महोत्सवी वर्ष लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , नोव्हेंबर २०१९ पासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे साहित्य संमेलन, माजी संचालक-पदाधिकारी सन्मान सोहळा, जिल्ह्यातील बॅंक व नोकरदार पतसंस्थांची परिषद भरविणे, सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यानांचे

कुत्रा आणि पत्रकारात फरक काय ? सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश मे. जोसेफ कुरीयन यांनी वाॅचडाॅग शब्दप्रयोग कुणासाठी वापरला ? सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
             यशस्वी चोरी करायची (वैयक्तिक फायद्यासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी) असेल तर, बंगल्याच्या आवारात कितीही कुत्रे असूद्या, सदर चोरावर एकही कुत्रा भुंकू शकत नाही, कारण त्या चोराकडे बुद्धी असते, तो छोट्या चोऱ्या करतच नाही, मोठ्याच करतो, व मोठ्यांकडेच कुत्रे असतात ! तो चोर समाजहितासाठी चोरी करत असेल तर तोच या जगात * शोध पत्रकारिता* करणारा पत्रकार म्हणून गणला जातो, या यशस्वीतेसाठीचा फंडा शेवटी आपणांस सांगणारच आहे, तत्पूर्वी पत्रकारांना कुत्रा संबोधले आहे असे पत्रकारांनी समजू नये, मात्र कुत्रा किंवा श्र्वान हे वासावरून गुन्हेगारांचा शोध घेतं, तसेच एखाद्या छोट्या संकेतांने पत्रकार बातमी करतो, त्याला "वास" आला रे आला, समजून घ्या समोरच्याची चड्डी पिवळी झालीच, मग कुत्रे अंगावर सोडलीच !  जो वासावरून खरी बातमी पत्रकारांना पोहचवितो तो कुत्रा व संकेतावरुन समाजापर्यंत बातमी पोहचवितो तो पत्रकार ! मग कुत्रा आणि पत्रकारात काय फरक, म्हणून राग मानू नका, सर्वोच्च न्यायालयाचे २०१८ चे तत्कालीन न्यायाधीश जोसेफ कुरीयन यांनी "वाॅचडाॅग" हा शब्दप्रयोग केला होता की न्यायव्यवस्

लोकराजा स राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ! कोल्हापूर चे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शारदापीठ द्वारकाचे शंकराचार्य श्री स्वरुपानंद यांच्या शुभेच्छा मिळालेला एकमेव दिवाळी विशेषांक लोकराजा ला पुरस्कार म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांचा गौरव- संपादक नरेंद्र पाटील !! न्यूज मसाला गौरवाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
"लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ ला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!             नासिक::-न्यूज मसाला च्या " लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ ला नक्षत्रांचं देणं काव्यमंचचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराने लवकरच पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते लोकराजा दिवाळी अंकास गौरविण्यात येणार आहे.          नक्षत्राचं देणं काव्यमंच ची १३ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०१८ चा निकाल दि. १ सप्टें. २०१९ रोजी जाहीर करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील मराठी दिवाळी अंकांच्या स्पर्धेत  नासिक मधून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक न्यूज मसाला च्या दिवाळी विशेषांक "लोकराजा" ची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.        पुरस्कार प्रदान सोहळा वित्त व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जेष्ठ कवी, कायदेतज्ज्ञ बाळासाहेब तोरस्कर, जेष्ठ साहित्यिक, कवी, पत्रकार विलास शिंदे, शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आम. महेश लांडगे, आम. शरद सोनवणे, आम. सुरेश गोरे, महापौर राहुल जाधव, प्रा. राजेंद्र सोनवणे य

महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी मविप्रचे डॉ.एस.के. शिंदे यांची बिनविरोध निवड !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्य अध्यक्षपदी डॉ.एस.के. शिंदे   मुंबई::- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची कार्यकारिणीची सभा मुंबई येथे आमदार निवास येथे कार्याध्यक्ष प्रा.अविनाश तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.                 यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्यात राज्य अद्यक्षपदी संघाचे माजी राज्य सरचिटणीस व मविप्र शिक्षण संस्थेचे शिक्षणाधिकारी, अष्टपैलू नेतृत्व असलेले डॉ.एस के शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.              महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ या संघटनेवर सरचिटणीस म्हणून डॉ.एस.के. शिंदे कार्यरत होते,  महासंघाच्या सर्व पदाधिका-यांच्या एकमताने त्यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्याला हा मान मिळाला असून राज्य सरचिटणीस असताना फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी "कायम विनाअनुदानित" या शब्दातील 'कायम' शब्द काढण्यात विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्यात म.वि.प्र.ही एकमेव अशी संस्था आहे, नोकरभरतीवर स्थगिती असतांना माध्यमिक व उच्च माध्य

शहराच्या सौंदर्यात भर व शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी या उदात्त हेतूने एसकेडी ग्रुपने सहभाग नोंदवत रस्ता सुशोभीकरण कामाचा केला उद्घाटन सोहळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एसकेडी ग्रुप च्या वतीने भोसला मिलिटरी स्कुल गेट ते दूधवाला कॉर्नर रस्ता सुशोभीकरण  उद्घाटन सोहळा संपन्न झाला.      नासिक (१५)::-केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नासिक शहराची निवड झाली आहे, शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असे जर प्रत्येकाने ठरवले तर कधीच ते शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकत नाही, सर्वांचा सहभाग असला तरच हे शक्य होईल, यासाठी आपले आपल्या शहरासाठी चे योगदान असावे, शहराला सामाजिक, व्यावसायिक दर्जा प्राप्त व्हावा व जागतिक पातळीवर एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने नासिकच्या सुप्रसिद्ध एसकेडी ग्रुप ने महात्मानगर येथील भोसला महाविद्यालय ते दुधवाला काॅर्नर हा रस्ता सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, सुंदर व सुशोभित करण्यात येत असलेल्या कामाचे उद्घाटन निमंत्रितांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नाशिक महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते , माजी स्थायी सभापती सौ.हिमगौरी आहेर-आडके,  नगरसेविका सौ.राधाताई बेंडकुळे, विष्णूपंत बेंडकुळे, नगरसेवक योगेश हिरे, एसकेडी ग्रुप चे संचालक संजय देवरे व सौ.मीना देवरे, अंकुर सुराणा, पोपट देवरे व एसकेडी

महाराष्ट्रातील जाणकार मान्यवरांच्या उपस्थितीत सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना ! विश्वकर्मा पूजन दिनी तमाम समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना !        नासिक::- काळ बदलला तशी सामाजिक परिस्थिती बदलत गेली, बारा बलुतेदारांच्या व्यवसायात ही स्थित्यंतरे झाली, शिक्षणाचं विकेंद्रीकरण झाले परंतु सर्वांना वेळीच हा बदल आत्मसात करता आला नाही याचा परिणाम समाजावर कालानुरूप होत गेला. समाजातील अनेक जातीधर्माच्या कुटुंबांना पिछाडीवर टाकत असताना काही जाणकारांनी वेळीच लक्ष देऊन समाज संघटित करून भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. तसाच सुतार समाज यांत्रिकीकरणाचा बळी पडून पारंपरिक व्यवसायासही मुकत चालला असून त्याला भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नासिक मध्ये सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना सुतार समाजातील जाणकारांकडून करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिनी या संस्थेची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे,  मे. धर्मादाय आयुक्त, नासिक येथे नोंदणी  केली असून राजे छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील मायको फोरम हाॅल येथे विश्वकर्मा पूजन दिनी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सुतार समाजातील सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माह

छावा क़ांतीवीर सेनेचा झंझावात ! इगतपुरी तालुक्याची कार्यकारिणी गठित ! नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात बहुसंख्येने कार्यकर्त्यांचा उत्साहात प्रवेश सोहळा पार पडला !!! उत्तर महाराष्ट्रातील बातमी मागच्या बातमीसाठीचे एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
इगतपुरी तालुका कार्यकारणी निवड, छावा क्रांतीवीर सेनेत शेकडो तरुणांचा प्रवेश.        नासिक (१५)::- छावा क्रांतीवीर सेना नाशिक यांच्यावतीने काल इगतपुरी तालुक्यातील नवीन पदाधिकारी नियुक्ती, संघटनेच्या नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत नियुक्त्या देण्यात आल्या, यावेळी उमेश शिंदे यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी व नवनियुक्त प्रवेश घेणाऱ्यांना संघटनेच्या ध्येय धोरणांची, संघटनेच्या वाटचालीचा सविस्तरपणे आढावा मांडून छत्रपती शिवराय यांच्या आचार, विचारांवर प्रेरित होऊन करण गायकर यांच्या सह प्रदेश कार्यकारणी यांनी वाढवलेल्या या संघटनेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून चागले काम उभे करू शकतो, असा संदेश देऊन सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना, महिलांना, बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला पाहिले असे आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या. यावेळी संस्थापक करण गा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांना तत्त्वता मान्य केल्याने राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांच्या प्रश्नांसंदर्भात सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाची सांगता ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडून प्रलंबित तसेच विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होते, ग्रामसेवकांच्या मागण्यांना ठोस नाही मात्र तत्त्वता मान्य करण्यात आल्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती ग्रामसेवक युनियन चे पदाधिकारी वाघचौरे यांनी दिली. प्रामुख्याने मासिक प्रवास भत्ता १५००/- रुपये करणे, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तामध्ये बदल करणे व पदोन्नतीच्या पदांमध्ये वाढीव पदांचा समावेश करणे,  या मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असल्याची चर्चा होऊन आज संघटनेमार्फत सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेतले असून सुमारे २२ हजार ग्रामसेवक आजपासून कामावर हजर होत आहेत.

डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी थांबणे - अवर सचिव प्रियदर्शन कांबळे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                 डॉक्टर , शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी थांबले बंधनकारक करण्यात आले आहे, तसा शासन निर्णय असतांनाही मुलांचे शिक्षण  वा तत्सम कारणे दाखवून तालुका जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत आदेश पारित केला आहे अशी माहिती राज्य शासनाचे अवर सचिव प्रियदर्शन कांबळे यांच्याकडून देण्यात आली. सदर शासन निर्णयानुसार आता डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांचे धाबे दणाणले असून, राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे, त्यांनी त्यांची अंमलबजावणी करणे व शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांत समाधानकारक प्रगती साधण्यासाठी या शासन निर्णयानुसार नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी नसणाऱ्यांना आदेशित करून सुधारणा करावी.

मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत….. ! छावा क़ांतीवीर सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ! सदर पत्र जसेच्या तसे प्रकाशित करून दिले आहे, सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जा.क्.१०४७/२०१९    दि.११/०९/२०१९ प्रति मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई विषयः- मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत….. महोदय, चला घेऊ शिवरायांचा आशीर्वाद ..अशी भावनिक साद घालून आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशापातळीवर सत्ता प्रस्थापीत केली.तथापी सत्तेचे इप्सीत साध्य झाल्यानंतर देश घडविणाऱ्या छञपतींच्या तरूण वारसादारांचे हक्क पायदळी तुडविण्याचा विडा आपले शासन आणि प्रशासनाने उचलला असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे  हक्क देतांना आपले शासन आणि प्रशासन आकस बुध्दीने सुडाची भावना बाळगत आहे आसा आमचा ठाम समज झाला आहे.हा समज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या देतांना घेतलेल्या भुमिकेमुळे आपणच अधोरेखीत केला आहे. महोदय,  गेली चाळीस मराठा समाज आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीत आहे.  दोन वर्षापुर्वी हा संघर्ष शिगेला पोहचल्यानंतर ५८मोर्च आणि ४३ समाजबांधवांनी आत्मबलिदान आणि  ८० वकीलांची फौज मराठा समाजाने उभी केल्यानंतर आरक्षण पदरात पडले.शासन

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धेचे एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बातमीत दिलेल्या संपर्क नंबरवर नोंदणी करून सहभाग नोंदवावा !! यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार !!! अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धा.            नाशिक (प्रतिनिधी)::- येथील एस.के.डी. चॉरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा संवाद लेखन वाचन आत्मविश्वास कौशल्य विकसित व्हावे या उदात्त हेतुने एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हातील महाविद्यालयांतील विदयार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत, कर्मवीर शांताराम बापू वावरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिडको, नासिक मध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन केलेची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. सदर स्पर्धेचे विषय, मोबाईलमुळे वाचन व संवाद हरवला आहे ?, शिक्षणाचं खरंच बाजारीकरण झाले का?, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील का? ,  शिक्षणातुन समाज परिवर्तन ! आदी चार विषयांवर स्पर्धा घेण्यात येणार आहे . प्रथम, द्वितीय, तृतिय, तसेच उत्तेजनार्थ विशेष बक्षीस व रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मान

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा ! जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भरभराट होवो व सुखसमृद्धी लाभो - जिल्हा परिषद अध्यक्ष !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा !           नासिक (११)::- जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात सहभागी होत असतात. सालाबादप्रमाणे अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. याही वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष नाम. शितल ताई सांगळे सह श्री. उदय सांगळे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली, यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना नाम. सांगळे यांनी जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भराभराट होवो व सुखसमृद्धी लाभो अशी भावना व्यक्त केली.   यावेळी उपाध्यक्ष नयनाताई गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनिषा ताई पवार, समाजकल्याण सभापती  सुनिता ताई चारोस्कर, सदस्य संजय बनकर, उदय जाधव, जिल्हा परिषद सरकारी व सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, जी. पी. खैरनार,  चंद्रशेखर वडघुले,  रविंद्र देसाई, सचिन पाटील, अनिल ससाणे, दत्तात्रेय मदने, अजित आव्हाड, मधुकर पुंड, तसेच  चेतन ठाकूर, सागर सोनवणे, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचा एल्गार !मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

इमेज
कर्मचाऱ्यांचा एल्गार ! मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !          नासिक (९)::- राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी   एकदिवसीय लाक्षणिक संप करून शासनाला मागण्यांसाठी जिल्हास्तरावर निवेदने देण्यात आली. कालच्या लाक्षणिक संपात नासिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेत सहभागी होत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.          पुणे येथे २५ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गातील संघटनेच्या प्रमुखांची व प्रतिनिधींनी राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली व संघटनांच्या सर्व समावेशक,समान मागण्यांसाठी समन्वय समिती स्थापन केली होती. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल सर्व संघटनांनी एकत्र येऊन लाक्षणिक संप पुकारला यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.           कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा