पोस्ट्स

ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे ! छावा क्रांतीवीर सेनेकडून दोन तास चक्काजाम आंदोलन !! मागण्यांचे निवेदन शासनदरबारी मांडण्याचे तहसीलदार यांचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
छावा क्रांतीवीर सेनेचे चक्का जाम आंदोलन ! निफाड तहसीलदार यांनी तात्काळ मागण्या शासनदरबारी मांडण्याच्या विनंतीमुळे निवेदन देऊन दोन तासाने आंदोलन स्थगित करण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे .                निफाड (५)::-नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे  नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी , वीजबिल माफी व  विद्यालयीन , महाविद्यालयीन , उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे. अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असून पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष , सोयाबीन , मका, कापूस , कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकरावरील द्राक्ष

ए,व्हि.एम नाईंटी फोर व्हाटस्अॅप गृप लवकरच नोंदणीकृत करणार ! समाजाचे आपण देणे लागतो व त्यासाठीचे कर्तव्य निश्र्चित करून साजरा केला स्नेहमेळावा !! हाथ छूटे भी तो, रिश्ते नहीं छोड़ा करते,. वक़्त की शाख़ से, लम्हे नहीं तोड़ा करते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
"ए.व्ही.एम. नाईंटी फोर"  चे गेट टुगेदर उत्साहात संपन्न... निजामपूर : दि.३०::- "हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते ..." प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या ओळींप्रमाणे जरी जीवनाच्या वाटा बदलल्या तरी मैत्रीचा धागा तुटू न देता आदर्श विद्या मंदिर, निजामपूर-जैताणे शाळेच्या १९९४ साली दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी 'ए.व्ही.एम. 94' या व्हॉटस्अॅप गृपच्या माध्यमातून एकत्र येत आपले गेट टुगेदर उत्साहात साजरा केले              बालपणापासूनचे वर्गमित्र आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध वाटांनी यश मिळवण्यासाठी निघून गेले पण २५ वर्षांनंतर ते पुन्हा 'रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा' साजरा करण्यासाठी एकत्र आले, या बॅचमध्ये अनेक जण शिक्षक, डॉक्टर्स , इंजिनिअर्स, फार्मासिस्ट, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात मनापासून काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून समाजात कार्यरत आहेत. समाज, शाळा, विद्यार्थी आणि मित्रांच्या सुखदुःखात धावून जाण्यासाठी 'ए.व्ही.एम. 94' हा व्हॉटस्अॅप गृप स्थापन करून सर्वजण धनाई पुनाई माता मंदिर परिसर

२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची सार्थ निवड !! साहीत्य क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची निवड       वाडीवऱ्हे/नाशिक:- इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित २१व्या ग्रामीण साहित्य समेंलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ  साहित्यिक, समीक्षक आणि कवी विवेक उगलमुगले यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली .       कवी विवेक उगलमुगले यांचे दिवाण्या आणि तोड्या, सायकलवरच्या कविता, प्रिय आईबाबांच्या शोधात, आठवणींची फुले, सांगवेसे वाटते म्हणून, आतला आवाज हे काव्यसंग्रह, शोध माणूसपणाचा हे व्यक्तिचित्रण यांसह दाट सायीचे गाव, हॅपी होम, रोजनिशी एका चिमुरडीची हे बालसाहित्य प्रकाशित आहे. अनेक पुस्तकांना त्यांची प्रस्तावना असून अनेक पुस्तकांवर समीक्षा लिहिली आहे. याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, रवींद्र पाटील, दत्तात्रेय झनकर, अॅड. ज्ञानेश्वर  गुळवे, अॅड. रतनकुमार इचम, हिरामण शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. हे २१वे ग्रामीण साहित्य संमेलन  रविवार दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.४० या वेळेत

पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! जी.पी.खैरनारांच्या लेखनीतून न्यूज मसालाचा खास रिपोर्ट !! न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांनी नितीन पवारांचा सत्कार केला त्याप्रसंगी चर्चेदरम्यान "मतदारसंघाबाबत वडीलांचा वारसा पुढे चालवत राहणार" !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पाणदेव "अर्जुनांचा" वारसदार विकास कामांचे राज-नीतिकार "नितिन" पवार ! ******************************        नाशिक::- जिल्ह्यातील आदिवासींचे नेते म्हणुन ज्यांनी साठ वर्षे राजकारण केले असे स्वर्गीय ए. टी. पवार साहेब यांचे वारसदार म्हणुन कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातून आमदार नितीन पवार निवडुन आले आहेत.            नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी बहुल क्षेत्र असे आहे. कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्रिंबकेश्वर, दिंडोरी हे तालुके पुर्णतः आदिवासी बहुल व डोंगराळ, दुर्गम - अतिदुर्गम अशी भौगोलिक स्थिती. बागलाण, देवळा, नाशिक हे तालुके अंशतः आदिवासी क्षेत्र अशी भौगोलिक स्थिती नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाची आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजातील जनतेस मुलभूत  आरोग्य सुविधा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे हा दूर दृष्टिकोन स्वर्गवासी अर्जुन तुळशीराम पवार साहेब तथा ए. टी. पवार साहेब यांनी ठेवला होता. हा दूर दृष्टिकोन ठेऊनच कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी जनतेच्या जिरायती क्षेत्र हे बागायती क्षेत्र करण्याचे काम आदरणीय ए. टी. पवार साहेब यांनी केले.

हिटलरच्या पंख छाटलेल्या कोंबडी सारखी अवस्था करून घेऊ नका !!! मतदान करूया-सशक्त महाराष्ट्राला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!;

इमेज
चला मतदानाला चला;मतदान करा जरा समजून         "एकवीस  तारीख " , सर्वांना मतदान टाकण्याचे वेध लागले  आहेत. सर्वच पक्षांनी आपल्याला समजावून सांगितले आहे की मी काय केले आणि काय करणार  आहे. कोणी सांगितले की मी काय करणार  आहे. सर्वच आश्वासनं......विश्वास तरी कोणावर  ठेवायचा. आज पंधरा दिवसात लोकांनी पाहिलं की सारेच राजकीय पक्ष आपल्या दाराशी  आले. कच-यावर  बसले. त्यांना घाण वाटली नाही,आपणही त्यांना चांगले  वाटलो. कितीही वाईट असलो  तरी. आपल्याला लुभावण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्याला गरळ घातली.        आपल्याला राज्याचा विकास करायचा  आहे. त्याचबरोबर आपलाही. केवळ राज्याचा विकास करुन चालणार नाही तर आपलेही हितसंबंध सरकारने जोपासले पाहिजे यासाठी आपल्याला मतदान  करायचे. जर राज्याचा विकास होत असेल, पण आपला जर जीव जात असेल तर ते राज्य त्या हिटलरच्या कोंबडीसारखे होईल जी कोंबडी हिटलरने पाळली  होती. एका कोंबडीचे चक्क त्याने पंखच उपडून टाकले  होते. त्यानंतर तो त्यांना दाणे देत  होता. आता या कोंबडीला जर कुत्रीम पंख लावले व श्रुंगार केला तरी तिला चिरतरुणता प्रा

आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा चंग बांधला आहे का ? अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ! जिल्हा हिवताप अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महेंद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक, यांना १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक नासिक::- यातील तक्रारदार यांचे सन-१९८६ ते १९९२ या कालावधीमधील एक वेतनवाढ कमी दिली गेल्याचे तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीचे वेळी सन २०१३ मध्ये झालेल्या वेतन पडताळणीमध्ये निर्देशन वेतन फरकाचे बील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी सादर केले होते. सदर बील मंजुर करण्यासाठी आलोसे महेद्र बबनराव देवळीकर, जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/-रू.लाचेची मागणी केल्याने, तक्रारदार यानी आज दि.१६/१०/२०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीची ला.प्र.वि.नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी केली असता पड़नाळणी दरम्यान आलोसे महेंद्र बबनराव देवळीकर यांनी तकारदार यांचेकडे २०,०००/-रू लाचेची मागणी करत त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १५,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम जिल्हा हिंवताप अधिकारी कार्यालय नाशिक येथे स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

कसं काय पाटील बरं हाय का ? पितृपक्ष संपला, आता कोण कुणाचे "कारणं" खाऊन "राज" करणार ! फड रंगतोय नासिकचा, आज कोलांटउड्या खाणारे कालचे खरे निष्ठावंत ! सविस्तर एक-दोन रिश्टर स्केल चे धक्के अर्थात किरकोळ भूकंपांबद्दल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कसं काय पाटील बरं हाय का ! निवडणुकीच्या  काळात  उमेदवारांच्या कोलांटउड्या या आता जनतेला नवीन राहिलेल्या नाहीत. पक्षनिष्ठा आणि भाऊंचे  नेतृत्व भाऊंना आणि कार्यकर्त्यांना कुठे घेऊन जाईन याबाबत अनेक चर्चा निवडणुकीच्या काळात झडत असतात. विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या राजकीय पटलावरही अनेक भुकंप, इच्छूकांच्या कोलांटउड्या, कार्यक़र्त्यांशी सल्लामसलत  आणि सुरु झाल्या आहेत याचा परिणाम आपल्याला दिसेलच. उमेदवारी अर्ज दाखल करायला आज आणि उद्या अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता या दोन दिवसांत काय उलथापालक्ष घडते ते बघणे रंजक ठरणार आहे. मनाला न पटणार्‍या आणि स्वप्नातील देखील विचार करता येणार नाही अशा खबरी निवडणुक काळात इच्छुकांच्या आणि विद्यमानांच्या बाबतीत येऊ लागल्याने काय सांगतो भाऊ ! खरंच की काय...? अशा शब्दांत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये घडतांना दिसत आहे. नाशिकचा विचार करता मध्य, पूर्व,पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या मध्य आणि पश्चिमची उमदेवारी भाजपाकडून जाहीर झाल्याने येथील अनेक इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे. बैंठकीत सल्ला