पोस्ट्स

इंदोरस्थित सुर्योदय परीवाराकडून दत्तजयंती उत्सव साजरा ! राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांच्या अपूर्ण राहिलेल्या सामाजिक कार्य अखंडपणे सुरू राहणार- डॉ. आयुषी देशमुख. सामाजिक कार्यात अग्रेसर सुर्योदय परीवारावर टिका करणाऱ्यांना छावा शैलीत उत्तर दिले जाईल - करन गायकर. न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील यांच्या कार्याचा सुर्योदय परीवाराकडून यथोचित गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
इंदोर येथे दत्त जयंती उत्सव साजरा-  सूर्योदय परिवार. श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर द्वारा आयोजित श्री दत्तजयंती महोत्सव २०१९ दि.११ डिसेंबर २०१९ रोजी ,सद्गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या अशिर्वादाने, प्रेरणेने ,वास्तव्याने पुनीत झालेल्या सूर्योदय आश्रम ,भारत माता मंदिर ,बापट चौराहा, सुखलिया इंदोर येथे मोठ्या उत्साहात डॉ.आयुषी उदयसिंह देशमुख (धर्मपत्नी परमपूज्य श्री भय्यूजी महाराज) यांच्या मार्गदर्शन व समर्थ नेतृत्वाखाली संपन्न....                    इंदोर (११)::-दत्त जयंतीला दत्त तत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. यामुळे परम पूज्य भय्यूजी महाराज यांच्या नंतर देखील सूर्योदय परिवाराच्यावतीने अविरतपणे सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील वारसा जपण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्यात आलेले आहे. दत्तजयंती उत्सवानिमित्त ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१९ सकाळी ९ ते १२ श्री गुरुचरित्र पारायण संपन्न झाले व सांगतादिनी ११ डिसें. रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा सुरूवात

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
                                                                  राज्य शासनाने  सारथी संस्थेचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा . छावा क्रांतीवीर सेनेचे नाम. छगन भुजबळ यांना निवेदन !        नासिक::-सारथी बंद चा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून निर्णय फिरवावा. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू  महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही  संस्था मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हिता करीता स्थापन केलेली आहे.ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आम्हाला समजले असून, हा निर्णय शासनाने त्वरीत माघारी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची "सारथी" स्थापना मागील राज्य सरकारने केली होती परंतु असा मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश

तीनशे स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहीम ! मोहीमेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारींसह अनेकांचा सहभाग !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज  किल्ले रामशेज (ता. दिंडोरी)  येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्रमदानातुन रामशेज गावात तसेच किल्याच्या माथ्यावरील विविध प्रकारचे प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेत तीनशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राम दत्तक योजना राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  चंद्रकांत भावसार, सरपंच जिजाबाई कांजळे, उपसरपंच संजय बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभिनयाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी किल्याच्या पायथ्यापर्यंत स्वतः श्रमदान करून प्लास्टिक संकलित केले. किल्यावरील मंदिर तसेच परिसराचीही यावेळी स्वच्छता करण्यात आ

पी एम एस प्रणाली विकसित देशांमध्ये वापरली जाते ती भारतासारख्या विकसनशील देशांत प्रभावीपणे लागू झाल्यास जगाच्या पाठीवर भारत लवकरच विकसित देश म्हणून ओळखला जाईल ! पी एम एस प्रणालीला विरोध का ? प्रशासन ठेकेदारांना समजावून सांगण्यात अपयशी ठरते आहे काय ? दोन्ही बाजू काय आहेत व पी एम एस प्रणालीची अंमलबजावणी याबाबतच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
नाशिक (प्रतिनीधी)::- ठेकेदारांना पीएमएस प्रणाली लागू करण्याबाबत जिल्हा परिषदेतील प्रशिक्षण वर्गात ठेकेदारांनी जि. प. प्रशासनातील कर्मचाऱ्या कडून होणाऱ्या अडवणुकीचा पाढाच वाचला.  व आमच्या अडचणी सोडवा अशी भूमिका घेत प्रणालीलाच विरोध केला .अखेर मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रभारी  जिल्हाधिकारी  यांनी व्यावसायिकांच्या समस्या ऐकून त्यावर योग्यतो मार्ग करण्याचे आश्वासन देत पी.एम.एस. प्रक्रियेत ठेकेदारास स्वतःचीच मोजमापे लिहिता येणे शक्य झाले असून विभागामार्फत लगेचच खातरजमा झाल्या नंतर बिल मिळणे प्रक्रियेत बचत व पारदर्शकता कशी निर्माण होणार या बाबद मार्गदर्शन केले . बुधवारी  कै. रावसाहेब थोरात सभागृहाच्या नव्या बिल्डिंगमध्ये पी एम एस प्रणाली ठेकेदार नोंदणी प्रक्रिया लागू करण्याबाबद मार्गदर्शन आणी प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदार, मजूर संस्था, सुरक्षित बेरोजगार अभियंता यांच्या साठी अभ्यास वर्गाचे आयोजन केले होते. यास प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मार्गदर्शन  करताना या नोंदणी प्रक्रियेमुळे फायलीचा विलंबाने होणारा प्रवास व त्रास बंद होईल हे नमूद केले. यावेळी उपस्थि

आज नाम. बाळासाहेब थोरात नासिक दौ-यावर ! माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट !! दौऱ्याच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आज शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी वाजता प्रदेशाध्यक्ष, नामदार बाळासाहेब थोरात नाशिक दौ-यावर !     नासिक::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे आज शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- स.९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे आगमन स.९.५० वाजता गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,  स.१०.३० वाजता कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट व नंतर सकाळी ११.०० वाजता पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान.

लाच स्विकारताना दोघांना अटक ! कुणी, कशासाठी मागीतली लाच ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आलोसे नानासाहेब रामकिशन नागदरे,पोलीस निरीक्षक, व  सुभाष हरी देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणुक नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांना २२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक करण्यात आली.               तक्रारदार यांचे ७ डिसेंबर २०१९ रोजी सुला वाईन, नाशिक म्युजिक इवेंट असून त्यासाठी त्यांना साउंड सिस्टीमची परवानगी देणेकामी तक्रारदार यांचेकडे दि.४/१२/२०११ रोजी आलोसे  नानासाहेब रामकिशन नागदरे, पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २२,०००/- रुपये लाचेची मागणी केली व त्यानंतर दि ५/१२/२०१९ रोजी आलोसे सुभाष हरी देवरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी याच कामासाठी तक्रारदार यांचेकडे ९.०००/-रूपये लाचेची मागणी केल्याने, ला.प्र वि नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता पंचसाक्षीदार यांचे समक्ष आलोसे नानासाहेब  नागदरे, यांनी २२,०००/-रुपये लाचेची रक्कम आज दि.५/१२/२०१५ रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कक्षात स्विकारली असता नानासाहेब नागदरे, व स

बॅंकेच्या कर्ज मर्यादेत ८ लाखावरून १० लाख करण्याचा संचालक मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय !!! नुतन अध्यक्ष सुनील बच्छाव व उपाध्यक्ष अजित आव्हाड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या कर्ज मर्यादेत वाढ - सुनिल बच्छाव, अध्यक्ष       नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या नियमित कर्जाची मर्यादा दि.०१ डिसेंबर २०१९ पासुन ८ लाखावरून १० लाख इतकी करण्याचा महत्वपुर्ण कर्मचाऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेण्यात आला.           नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी सांगितले आहे तसेच सभासद झाल्याबरोबर १ वर्षापर्यंत देत असलेला कर्ज मर्यादेत देखील वाढ करून ३ ऐवजी ५ लाख इतकी तर २ वर्ष पुर्ण झालेल्यांना ४ ऐवजी ७ लाख इतकी मर्यादा केली असल्याची माहीती नुतन उपाध्यक्ष अजित आव्हाड यांनी दिली.         संचालक मंडळाची नुकतीच पहिली बैठक अध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली असुन त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यास सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली असुन, सदरची वाढ दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून लागू होण