पोस्ट्स

अभिनेता सोनू सुद च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ, आश्रमातील मुलांसोबत डान्सगाणे !

इमेज
नासिक फन फेस्टिवल मध्ये फिल्म अभिनेता सोनु सुद  च्या सहभागाने फन फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. सोनु सुद  ने अनाथ आश्रम शाळेच्या मुलांसोबत स्टेजवर गाणे व डान्स  केला. नासिक ठक्कर डोम मैदान सिटी सेंटर माॕल च्या जवळ १९/५/२०१८ पासून सुरू झालेल्या नासिक  फन फेस्टिवलला पहिल्या दिवशी नागरिंकाकडुन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला येत्या ९ दिवसात नाशिककर नागरिकांना हिंदी व मराठी कलांकारांचा लाभ मिळणार आहे . तसेच  विविध प्रकारचे खाद्य स्टाॕल व मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाळण्यांचा लाभ घेता येणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून लाभ घ्यावा .

नासिक फन फेस्टिवलला अभूतपूर्व प्रतिसाद, अभिनेत्री सविता प्रभुणेंची उपस्थिती,

इमेज
नासिक फन फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी फिल्म अभिनेत्री सविता प्रभुच्या उपस्थितीत नाशिककरांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद .... नासिक च्या सिटी सेंटर माॕल च्या जवळ असलेल्या ठक्कर डोम मैदानात १९ मे पासून सुरू झालेल्या  नासिक फन फेस्टिवलला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. रोज सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाने फन फेस्टिवलला रंगत येत आहे. ९ दिवसाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध हिंदी व मराठी कलाकारांचा समावेश होणार आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेञी सविता प्रभुणेच्या उपस्थितीने नाशिककरांनी मोठ्याप्रमाणावर मनमोकळेपणाने आनंद घेतला. महिलांसाठी सोनि पैठणी मार्फत मनोरंजनाच्या खेळात  विजेत्यांना सविता प्रभुणेंच्या हस्ते पैठणी देण्यात आली. फिल्म अभिनेत्री सविता प्रभुणेंचा  सत्कार सोनि पैठणी देऊन करण्यात आला. पुढिल दिवसात आयोंजकामार्फत नाशिककरांसाठी विविध मनोरंजनाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे तरी नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेत ई-निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना, कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम होणार !

इमेज
नाशिक – शासनाच्या निर्देशानुसार ई गव्हर्नन्न्सच्या प्रभावी अंबलबजावणीसाठी जिल्हा परिषदस्तरावर मध्यवर्ती ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व निविदांबाबतचे काम या कक्षामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख,पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने ई निविदा काढण्यात येतात मात्र यामध्ये सुसूत्रता यावी व एकाच ठिकाणाहून सदरचे काम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गिते यांनी पुढाकार घेऊन ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. डॉ गिते हे या समितीचे अध्यक्ष असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सनियंत्रक तथा सह अध्यक्ष, कार्यकारी अभियंता इवद क्र ३ हे सदस्य सचिव व सर्व विभागांचे प्रमुख हे सदस्य असणार आहेत. या कक्षाच्या वतीने विविध विभागनिहाय प्राप्त निविदांची नोंद ई निविदा आवक नोंदवहीत करणे, निविदा अपलोड करणे, निविदा उघडणे आदि निविदेशी संबंधित

अधिकारी वाघमारे लाचलुचपतच्या जाळ्यात ! तसेच दुसऱ्या प्रकरणांत राक्षे व कोळी ही जाळ्यात !

इमेज
वाघमारे लाचलुचपतच्या जाळ्यात ! राक्षे व कोळी ही जाळ्यात ! भ्रष्टाचाराचा भस्मासुराला काबूत आणण्याचे लाचलुचपत खात्याकडून अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत, अनेकांना आपल्या कर्माची फळे भोगावी लागत असतांनाही लाच घेण्याचे वा देण्याच्या प्रकरणांना आळा बसत नाही,       अशाच एका प्रकरणांत वाघमारे सारखा उच्चपदस्थ अधिकारी काल लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला.       आरोग्य सेविकेच्या अंचर्गत बदली साठी १५०००/- रूपयांची लाच स्विकारतांना डाँ.अनिल वामण वाघमारे अंबड (जालना) तालुका आरोग्य अधिकारी यांस लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाकडून यशस्वी सापळ्यात पकडण्यात आले.             दुसऱ्या एका  प्रकरणांत पाटण (कोयना) येथील पोलीस हवालदार संजय बाळक्रुष्ण राक्षे व पोलीस नाईक कुलदिप बबन कोळी यांनी तक्रारदारावर असलेल्या गुन्ह्यात मदत करणे तसेच त्याचे विरूद्ध चाप्टर केस एलसीबी सातारा यांचेकडे पाठवू नये यांसाठी दोघांनी मागीतलेली रूपये २०००/- लाच स्विकारतांना लाचलुचपत कडून पकडण्यात आले.

शंभूराजेंची जयंती उत्साहात साजरी, जयंतीचे औचित्य साधून टाँपकार सर्विस सेंटरचे उद्घाटन !

इमेज
सिन्नरला छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी, टाँपकार सर्विस सेंटरचे उद्घाटन ! सिन्नर(१४)::-नासिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आज शंभूराजेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, जयंती समारोहाचे आयोजन विलास पांगारकर यांनी केले होते, यांवेळी सिन्नर पंचक्रोशितील सामाजिक, राजकीय तसेच तरूण , ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,     शंभूराजेंच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून विशाल पांगारकर यांनी टाँपकार या दालनाची सुरूवात केली. सिन्नर तालुक्यातील चारचाकी वाहन धारकांसाठी व्हिल अलायमेंट, सर्विसिंग, अँक्सेसरीज, विविध कंपन्यांचे टायर तसेच कार डेकोरेशन या शहरांत मिळणाऱ्या सुविधा टाँपकारच्या दालनांतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहीती संचालक विशाल पांगारकर यांनी दिली. सदर दालनाचे उद्घाटन सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, यांवेळी नासिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे , छावाचे किशोर चव्हाण, नासिक ग्रामीण पोलीस अधिकारी आंधळे आदी मान्यवर होते.

श्री.श्री.रविशंकरजी नगर फलकाचे अनावरण

इमेज
किशोर पाटील यांजकडून, विंचूर, दि.१४  येथील श्री श्री ध्यान केंद्र विंचूर परीसराला श्री श्री रविशंकर नगर हे नाव देण्यासाठी परीसरातील नागरीकांनी एकञ येवुन ग्रामपालीकेकडे अर्ज दाखल करुन नाव देण्याची मागणी केली. ग्रामपालीकेने मासिक बैठकीत एक मताने  श्री श्री रविशंकर नाव देण्यास अनुमती दिली.          आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक तथा प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांचा दि.१३ मे रोजी वाढदिवस असल्याने त्याचे औचित्य साधत श्री श्री ध्यान केंद्रात सुदर्शन क्रिया, योगा,प्राणायाम, संत्संग, गुरुपुजा आदी कार्यक्रम संपंन्न झाले. त्यानंतर श्री श्री रविशंकरजी नगर फलकाचे उदघाटन पं.स.सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षीरसागर, विष्णुनगर सरपंच किशोर मवाळ, टाकळी विंचूर विद्यालयाचे प्राचार्य पी.बी.चौरे आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपंन्न झाले.          यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक किशोर पाटील प्रास्तविक व उपस्थितीतांचे स्वागत केले.कार्यक्रमास भागिरथ निकम,विजय लोहारकर,बापुसाहेब सोदक,गजेंद्र शिंदे, मयुर गोरे,पंकज सोनवणे, एम.एम.पवार, वेननाथ माधव,बालीबाई सोनवणे, दरेकर, कुमावत आदी नागरीक उपस्थितीत

छत्रपती शिवाजी महाराजांचा, जबाबदारी पेलणारा मावळा. कोंडाजी फर्जंद एक जून रोजी अवतरणार !!!

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांचा जबाबदारी पेलणारा मावळा कोंडाजी एक जून रोजी अवतरणार ! नासिक::- छत्रपती शिवाजी महाराज आणी शिवकाल मराठी अस्मितेचा विषय असुन त्या विषयाला ४० वर्षापूर्वी भालजी पेंढारकरांनी स्पर्श केला, त्यानंतर तसा भारदस्त प्रयत्न कुणी केल्याचं दिसत नाही.     तत्कालीन भौगोलिक व संरक्षणाच्या बाबत पन्हाळा किल्ल्याचे महत्व, महाराजांचा राज्याभिषेक व पन्हाळ्याच्या आसपासच्या रयतेवरील अन्याय यांसाठी पन्हाळा मराठी मुलखात आणणे महाराजांना गरजेचे होते, म्हणून महाराजांनी कोंडाजी फर्जंद या मावळ्यावर जबाबदारी सोपविली.      "आपण फकस्त लढायचं....आपल्या राजांसाठी....आन् स्वराज्यासाठी.....!      असं म्हणत कोंडाजी फर्जंद या योद्ध्याने ६० मावळ्यांना सोबत घेत २५०० विजापुरी सैनिकांशी लढून साडेतीन तासात पन्हाळा जिंकून दिला, हा हिंदवी स्वराज्याचा मावळा कोंडाजी फर्जंद च्या पराक्रमाची गाथा १ जूनला रूपेरी पडद्यावर जिवंत होत आहे.      "स्वामी समर्थ मुव्हिज क्रिएशन एलएलपी" ची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असुन सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्निल पोतदार  आहेत