पोस्ट्स

अक्षय कुमार प्रस्तुत "चुंबक" मराठी चित्रपट २७ ला प्रदर्शित होण्यास सज्ज !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! स्पेशल रिपोर्ट दीनानाथ यांजकडून फक्त न्यूज मसालावर !!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनधी ]               अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेल्या चुंबक या मराठी चित्रपटातील दोन व्यक्तिरेखा पोस्टरचे प्रकाशन दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गीतकार ,  गायक , लेखक स्वानंद किरकिरे आणि चित्रपटात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर येथील संग्राम देसाई यांची पोस्टर प्रकाशित ‘ चुंबक ’  २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित        बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेला चित्रपट म्हणून सध्या ‘चुंबक’चा मराठी चित्रपटसृष्टीत मोठा बोलबाला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मिडियाचा आधार घेत हा चित्रपट प्रस्तुत करत असल्याची घोषणा केली आणि या चर्चेला उधाण आले. ‘चुंबक’च्या चमूने आता आणखी दोन व्यक्तिरेखांची पोस्टर प्रकाशित केली आहेत. प्रसन्ना ठोंबरे आणि ‘डिस्को’ या त्या दोन व्यक्तिरेखा. प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा संग्राम देसाई या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या, मुळचा कोल्हापूरचा असलेल्या

"माँ तुझे सलाम" , या कार्यक्रमाद्वारे शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या मातापित्यांचा सन्मान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व शेअर करा !!

इमेज
    माँ तुझे सलाम......      नाशिक (२२) :- 3 एप्रिल 2018 रोजी मातृभूमीचे रक्षण  करतांना महाराष्ट्राचा  सर्वात  लहान तरूण, जवान शुभम मुस्तापुरे हा शहिद  झाला. ही बातमी महाराष्ट्रात पसरताच  अवघा महाराष्ट्र रडला  होता. अवघ्या विसाव्या वर्षी मातृभूमीसाठी  बलिदान  देणा-या काळीमातीच्या वीरपुञाच्या मातापित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र  राज्य पञकार  महासंघ यांच्या वतीने  नाशिक शहरातील  गंजमाळ येथील रोटरी  हाॅल  येथे "माँ तुझे सलाम" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले     अवघ्या  विसाव्या  वर्षी  बलिदान , भारत मातेचा  पुञ  देशासाठी  कुर्बान,प्राणवाहुनी देशासाठी, देशासही  अमर करे , वीर शहिद भारत  सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे...       धन्य  माता पिता ज्यांना पुञ असा लाभला, आणिक  धन्य  ताही  जो देशार्थ  वारला , प्राणवाहुनी देशासाठी, देशासही  अमर करे , वीर शहिद भारत  सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे....     जे देशासाठी  मेले ते वीर हुत्मामे  झाले, जे वीर  मरणार्थ ...त्यांचे जीवन  सार्थक  झाले प्राणवाहुनी देशासाठी, देशासही  अमर करे, वीर शहिद भारत  सुपुत स्व.शुभम मुस्तापुरे.....

आज २२ जून, नासिककरांनी रोटरी हाँल, गंजमाळ येथे सायं. ७:०० वा. आवर्जुन उपस्थित राहायलाच हवे, आबालव्रुद्धांसह, तरूणांनी तर नक्कीच हजेरी लावावी, "माँ तुझे सलाम" या देशभक्ती कार्यक्रमाला, शहीद कोण होतो , कुणासाठी होतो, अन् त्याचे मातापिता ? प्रश्नाचे उत्तर शोधायलाच हवे !! कार्यक्रमाविषयी सविस्तर माहीतीकरीता खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक::-देश रक्षणासाठी सीमेवर शत्रुराष्ट्राशी लढतांना शहिद होण्याचे वय फक्त २० वर्ष ? आणी खेळण्या-बागडण्याच्या वयातलं पोरगं देशासाठी अर्पण करणाऱ्या मातापित्यांचे मनातली घालमेल काय असेल ? साधा विचार करतांच अंगावर काटा ( शहारे नव्हे) उभा राहतो, पण त्या मातापित्यांप्रती जी भावना समाजाकडून व्यक्त व्हायला हवी तशी आज होतांना दिसत नाही, याचा अर्थ समाजांत तसे घटक नाहीत असे नाही, पण व्यक्त कसे व्हावे याचा मार्ग त्यांना अवगत होत नाही तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ कमीतकमी एका शहीदाच्या कुटुंबाच्या मागे ऊभे राहण्याचा प्रयत्न करतो हि विशेष उल्लेखनीय बाब समजायला हवी, समाजासाठी एक सकारात्मक संदेश पोहचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ करीत आहे.           शहीद शुभम मस्तापुरे , अवघा वीस वर्षाचा तरूण देशासाठी ३ एप्रिल २०१८ रोजी धारातीर्थी पडला, त्याच्या मातापित्याचा सन्मान शुक्रवार दि. २२ जुन रोजी सायं. ७ ते १० या वेळेत रोटरी क्लब, गंजमाळ येथे "माँ तुझे सलाम" या देशभक्तीपर संगीत रजनी च्या माध्यमातून मानवंदनेच्या रूपात होत आहे, महासंघाकडून वीरमाता-पित्यास १,११,०००/- रूपयांची आ

जेष्ठ साहित्यिक, पत्रकार अरूण साधू यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत "झिपऱ्या" चित्रपट आज प्रदर्शित होत आहे, दिग्दर्शक केदार वैद्य यांच्याशी केलेली बातचीत खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी, !! सविस्तर मुलाखतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
 दीनानाथ जी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] -ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत कलाकृती "" झिपऱ्या ""   " झिपऱ्या " सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांची वास्तवाला धरून लिहिलेली - वास्तववादी कादंबरी ,,,, रेल्वे स्टेशन च्या वर " बूट पोलिश " करणाऱ्या मुलांचे जीवन व्यथित करणारी, मनाला भिडणारी खरीखुरी संवेदना " झिपऱ्या " मधून जाणवते. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये " झिपऱ्या " ला पांच नामंकन मिळाली,  अरुण साधू यांचे लिखाण हे मनाला भिडणारे, मानसिकतेला हाथ घालणारे आणि विचार करायला लावणारे आहे, अरुण साधू यांचा कालखंड सर्वाना माहित आहेच, त्यांच्या सर्वच साहित्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्यांच्या कालखंडात सहकार चळवळ उभी राहिली, आणीबाणी चा तो काळ होता, त्याच काळात अनेक संप - मोर्चे होऊन अनेकदा मुंबई करांचे जीवन ठप्प झालेले होते, साहित्य, नाटक, चित्रपटामधील दाहकता आणि वास्तवता याचा विचार सर्वसामान्य वाचक करू लागला होता, त्याच काळात राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात अनेक

ग्रामसेवक निलंबित ! सीईओंच्या सूचनांचेही पालन न करण्यासारखे गंभीर वर्तन, समज देऊनही घरकुल पुर्ण न करणे, दप्तर दिरंगाई, दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वत:च्या ताब्यात ठेवणे, !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक (२१):– कळवण तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक सुनिल महाले यांना घरकुल पूर्ण न करणे, दप्तर अद्यावत न ठेवणे तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वतच्या अखत्यारीत ठेवणे आदि गंभीर कारणांमुळे जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी याबाबतची कार्यवाही केली. कळवण तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतमध्ये सुनील महाले ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. मात्र ग्रामपंचायतीत काम करताना विविध कामकाज अपूर्ण असल्याने तसेच कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना वेळोवेळी समज देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील त्यांच्या कामात सुधारणा झालेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा बैठकीत तसेच विडीओ कॉन्फरन्समध्ये सूचना देऊनही त्याचे पालन न करता गावातील अपूर्ण घरकुल पूर्ण न करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना अद्यावत न ठेवणे, ग्रामपंचायतीचे शासकीय दप्तर ग्रामपंचायतीत न ठेवता स्वतच्या अखत्यारीत ठेवणे, अपूर्ण दप्तर तपासणीसाठी सादर करणे या विविध गंभीर कारणांमुळे सदर ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले आहे.

९८ व्या नाट्य संमेलनातील एक परिसंवाद " सांस्कृतिक आबादुबी " !! सविस्तर वृत्तांतासाठी खालील लिंकवर क्लिक करा ,,,,

इमेज
दीनानाथ घारपुरे  [  मनोरंजन प्रतिनिधी  मुंबई::- ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंडला मोठ्या उत्साहाने साजरे झाले ,  यामध्ये विविध कार्यक्रमाची रेलचेल होती ,  रसिक प्रेक्षकांनी सर्वच कार्यक्रमाचा आस्वाद मनमुरादपणे अनुभवला ,  या संमेलनात  "  सांस्कृतिक आबादुबी  "  हा परिसंवाद डॉ हेमू अधिकारी रंगमंच ह्या ठिकाणी आयोजित केला होता ,  ह्या मध्ये डॉ जब्बार पटेल ,  प्रतिमा कुलकर्णी , पुरुषोत्तम बेर्डे ,  अद्वैत दादरकर ,  प्रियदर्शन जाधव ,  चिन्मय मांडलेकर ,  देवेंद्र पेम , प्राजक्त देशमुख ,  संतोष पवार ,  प्रताप फड , केदार शिंदे ,  यांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र जोशी ऋषिकेश जोशी यांनी केलं होते ,  त्यांनी कलाकार दिगदर्शक यांना विविध प्रश्न विचारून बोलते केलं आणि हळूहळू हा सांस्कृतिक आबादुबी चा परिसंवाद रंगायला सुरवात झाली ,  या मध्ये डॉ जब्बार पटेल म्हणाले ,  मला जी नाटके पटतात ते मी करतो ,  ह्यावेळी त्यांनी घाशीराम कोतवाल विषयीच्या आठवणी सांगितल्या ,  आणि आता एखादे नाटक करण्याचा विचार आहे असेहि ते म्हणाले . देवेंद्र पेम म्हणाले कि मला विनोदी नाटके कर

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालखी सोहळा नियोजन समन्वय समिती स्थापन करा-संजय धोंडगे, अध्यक्ष , संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ समाधी संस्थान !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती स्थापन करा : संजयनाना धोंडगे पंढरपूर दि २० - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या संतांच्या  पालखी सोहळ्यांना विज , पाणी , रस्ते , आरोग्य , रॉकेल , गॅस , दर्शन  पास , सुरक्षा या व अशा अनेक अडीअडचणीना  तोंड द्यावे लागते . त्या अडचणी   निवारण करण्यासाठी तसेच या  प्रमुख पालखी सोहळ्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  राज्यातील प्रमुख सात पालखी सोहळ्यांची समन्वय समिती स्थापन करावी अशी मागणी  श्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे यांनी केली . श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या संत तुकाराम भवन मध्ये राज्यातील सहा पालखी सोहळा प्रमुखांची बैठक पार पडली . या बैठकीस श्री विठठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य  ह भ प शिवाजी महाराज मोरे ,राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे ,  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे , संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प बाळासाहेब मोरे , संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजयनाना धोंडगे , सचिव पवनकुमार भुतडा , संत सोपानकाक