पोस्ट्स

दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज बीलामुळे बंद पडलेली ४२ गांव पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ नरेश गितेंनी बोलविलेल्या बैठकीतील चर्चेनंतर यशस्वीपणे सुरू !

इमेज
नाशिक -  गेल्या दोन महिन्यापासून थकीत वीज बिल व नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना अखेर शुक्रवारपासून (दि. ९) सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण विभागाने पिण्याच्या पाणी प्रश्नी संवेदनशीलता दाखविल्यामुळे योजना कार्यान्वित करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे.         ४२ खेडी पाणी पुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यापासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणी पुरवठा

पत्रकार संघाच्या सभासदांना न्यूज मसालाचा लोकराजा दिवाळी विशेषांक मोफत भेट देण्यात आले !!!

इमेज
       नासिक::- आज दि. १० रोजी नासिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या सभासदांना न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून भेट देण्यात आला.       याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर  गोडसे ,उपाध्यक्ष सुनिल पवार,प्रकाश उखाडे,सरचिटणीस अरुण बिडवे,खजिनदार अरुण तुपे,संघटक गोकुळ लोखंडे,सहसरचिटणिस दिपक कणसे,पंकज पाटील,मंगलसिंह राणे,संतोष भावसार,नंदु शेळके,जगदीश सोनवणे आदीसह सभासद  उपस्थित होते.

न्यूज मसाला परिवारातर्फे रूग्णांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ व सुरूची भोजन वाटप ! कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळ पवार (मालेगांव) यांच्या चौथ्या पुणस्मरणानिमित्त, !! उपक्रमाच्या सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व कमेंट बाँक्समध्ये आपले नांव व मोबा. नंबर लिहा !!!

इमेज
नासिक::- कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळराव पवार , मालेगांव, यांच्या चौथ्या पुण्यस्मरणा निमित्त ६ नोव्हेंबर रोजी संदर्भ सेवा रूग्णालय, नासिक येथे दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन न्यूज मसाला परिवाराकडून करण्यात आले.         ज्यांची दिवाळी दवाखाण्यात उपचार घेण्यांत जात असेल व सोबत त्यांचे नातेवाईक असतील तर ? हा प्रश्न व त्याचे उत्तर खूप अवघड आहे, ते पूर्णपणे समाधानकारक कुणालाही देता येणार नाही मात्र प्रयत्न करायला सुरूवात तर करूया याप्रमाणे न्यूज मसाला परिवाराकडून असे उपक्रम राबविले जातात.        कै. आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त, आप्तेष्टांना दवाखाण्यात उपचार घेतेवेळी स्वत:ची दिवाळी साजरी न करणाऱ्यांच्या मुखी दिवाळी फराळ तरी जायला हवा, याउद्देशाने संदर्भ सेवा रूग्णालयातील रूग्णाच्या नातेवाईकांना (100+50)  दिवाळी फराळ+बिस्किट+केळी व ५० व्यक्तींना सुरूची भोजन देण्यात आले, याप्रसंगी कै. आप्पांचे नातू इंजि. प्रणित पवार, तेजस पाटील, जिग्नेश पाटील व न्यूज मसाला संपादक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.       सदर उपक्रमास अन्नछत्रच्या संचालिका सौ. संगिताजी केडीया यांचे मार्गदर्शन मिळाले.

लोकराजा दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, डाँ. अनिरूद्घ धर्माधिकारी व नासिक कवीचे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते प्राकाशन करण्यात आले, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
       न्यूज मसाला च्या "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ चे उत्साहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत आले            जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शितलताई सांगळे, उत्तर महाराष्ट्रातील ख्यातनाम ह्रुदयरोग तज्ञ डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी व नासिक कवी चे अध्यक्ष शरद पुराणिक यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यांत आले.           दरवर्षी न्यूज मसाला च्या दिवाळी अंकाच्या मुखप्रुष्ठावर आजी माजी संसद सदस्याचे छायचित्र प्रकाशित करून त्या लोकप्रतिनिधीस "लोकराजा" म्हणून वाचकांसमोर आणले जाते, हे सातवे पुष्प मा. खास. हेमंत गोडसे यांचे छायाचित्र प्रकाशित करून गुंफण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष शितलताई सांगळे यांनी आवर्जुन सांगीतले                  दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा अंक दर्जेदार बनविला असुन मराठी वाचकांसाठी "लोकराजा" दिवाळी विशेषांक वाचकांची दिवाळी नक्कीच गोड करेल असे मनोगत डाँ. अनिरूद्ध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.               कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरोग्यदूत तुषार जगताप यांनी केले, आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे स्वागत व आभार न्यूज मसाला, नासिकचे संप

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी रविवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालणार, या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थान कडून करण्यात आले आहे-अध्यक्ष हभप संजय धोंडगे, सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा रविवारी " ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सोहळा " - वारकरी संप्रदायमध्ये ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शिवशंकर यांचा ब्रम्हगिरी पर्वतावर पदस्पर्श झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या रूपाने येथून ज्ञानगंगेचा उगम झाला. या अवतारी भावंडांंनी ही ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली असून त्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, म्हणून समस्त वारकरी ही प्रदक्षिणा करीत असतात.            संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी मंडळी अाश्विन महिन्यातील एकादशीला ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा मारतात. हजारोंच्या संख्येने वारकरी  पालखी समवेत भजन करीत ब्राम्हगिरीची प्रदिक्षणा पूर्ण करून गाठीशी पुण्य गाठतात. यंदाही संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली व श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी भजनी मंडळ, त्र्यंबकेश्वर, यांच्या पुढाकाराने संत निवृत्तीनाथ महाराज यांची अाश्विन एकादशी दि. ४ नोव्हेंबर रविवार रोजी स

महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशचा शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा ! जाणीव-शेतकऱ्यांप्रती पोलीस बाँईजची, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे समर्थन _________________________________ अकोला :- शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदयार्थी आघाडीने समर्थन दिले आहे. उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाळ अंबादास पोहरे यांनी 25 ऑक्टोबर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी या आधीही मोबाईल टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. मागच्या वर्षी कपाशी वर आलेल्या बोंडअळीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा केल्यामुळे आणि शिवाजी महाराज पिक विमा योजनेचे नाव बदलण्यासाठी पोहरे हे आंदोलनाला बसले आहेत.        त्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार ताले यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. यावेळी संदिप शेळके, राम निंबकर, विशाल खेळकर, सागर निंबेकर, सागर जामोदे, गौरव उमाळे आणि अतुल ताले यांच्या सह असोसिएशनचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वारा-किरतकार 9665382780

नासिकचे सुनील वाजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील वाजे तर इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत सुनील वाजे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून तर नाशिकच्या इगतपुरी तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.           राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ.छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी (मामा) आव्हाड यांनी बाळासाहेब गाढवे यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. तर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सुचविल्याप्रमाणे सुनील वाजे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. वाजे व गाढवे यांच्या नियुक्तीचे राजकीय वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.