पोस्ट्स

धडाका !! ग्रामसेवक सेवेतून निलंबित !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
          नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी नोव्हेंबर १८ मध्ये दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली होती. मात्र दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी सादर करतो अशी विनंती करून अद्यापपावेतो दप्तर सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकास जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नोव्हेबर महिन्यात दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी त्यांनी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली मात्र तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देतो अशी विनंती केली होती. मात्र मुदत देवूनही तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तळेगाव दिंडोरी येथील ग्रामसेवक संदीपान नेटके यांना कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आता बोला ! २०१७ पासुन गैरहजर शिक्षकाची आँनलाईन बदली ! बदली प्रकरणाने तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
           नाशिक –  इगतपूरी तालुकयातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक सन २०१७ पासून अनधिकृत गैरहजर असतानाही २०१८ मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करुन गैरहजर शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीस मान्यता देण्या-या इगतपूरी तालुकयातील तत्कालिन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.       इगतपुरी तालुकयातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बापु भिवसन पाटील हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र मार्च २०१७ पासून ते अनाधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द खातेचौकशी करणेकामी कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विशेष म्हणजे सदर शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर असल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनीच सादर केला होता. तरीदेखील २०१८ मध्ये झालेल्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सदर शिक्षकाने पेहरेवाडी येथून विनंती बदलीबाबत ऑनलॉईन माहिती भरुन मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी त्यास मान्यता दिल्याने संबंधित शिक्षकाची कळवण तालुकयातील आठं

माध्यमांसमोरील भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भाजप शिवसेनेचे माध्यमांसमोरचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक - माजी खासदार समीर भुजबळ   नाशिक , दि.३ जानेवारी:-  निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने माध्यमासमोर खोटी भांडणे करून देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहे. आज त्यांनी नाशिक तालुक्याचा दौरा केला.  यावेळी गिरणारे गण - मातोरी, देवरगाव गण -धोंडेगाव, गौवर्धन गण, विल्होळी गण,पिंप्री सय्यद गण,एकलहरे गण,  पळसे गण व लहवित गणाचा आढावा घेण्यात आला.            जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,नाशिक पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर आदी उपस्थित होते.            या

आज महिला मुक्ती दिनाचे आयोजन ! गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व मित्रांना शेअर करा !!!

इमेज
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिन ...      नासिक::-माळी समाज सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  महिला मुक्ती दिनाचे आयोजन  करण्यात आले आहे व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या समाजातील गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार सोहळा आज गुरुवार दि.०३ जानेवारी २०१९  रोजी सकाळी ११.३० आय.एम.ए हॉल शालिमार, नासिक येथे आयोजीत केला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मेट शिक्षण संस्थेच्या विश्वस्थ शेफाली भुजबळ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सुनिता निमसे असतील तर ,निलीमाताई सोनवणे,प्रीती महाजन,योगिता जाधव ,अंजना गांगुर्डे,मीनाक्षी पाटील नगरसेविका सत्यभामा गाडेकर ,माधुरी बोलकर ,सुप्रिया खोडे,कुसुमताई शिंदे  उपस्थित राहणार आहे.तरी या कार्यक्रमास संस्थेच्या सर्व सभासदांनी व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत ,माळी समाज सेवा समितीचे महिला मंडळाच्या अध्यक्षा  मंगला माळी , कार्याध्यक्षा मंगला जाधव  , उपाध्यक्षा संगीता अ

कामात हलगर्जीपणा केल्याने दोघे निलंबित !!! लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेत करण्यात आले निलंबन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – इ निविदेच्या कामात विलंब करुन कामात हलगर्जीपणा करणा-या इवद विभागातील कनिष्ठ लिपिकास तसेच प्रशासकीय मान्यतेबाबतच्या नस्ती स्वत:कडे ठेवून घेणा - या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहाय्यक लेखाधिका - यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी निलंबित केले आहे.       पंचायत समिती सुरगाणा येथे कार्यरत कनिष्ठ सहाय्य्क अमित आडके यांना तीन दिवस इवद क्र. १ या विभागात कामकाज करणेसाठी आदेशित करण्यात आले होते. उर्वरित तिन दिवस त्यांनी सुरगाणा येथे कामकाज करणे आवश्यक असताना तेथे ते कामकाज करणेसाठी हजर झाले नाही. त्यामुळे त्त्यांचेकडील काम मोठया प्रमाणात प्रलंबित राहिले आहे. इवद विभागात अमित आडके यांना निविदा संकलनाचे कामकाज देण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यारंभ आदेश देणे आवश्यक असताना त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. ८० अंगणवाडी कामांना प्रशासकिय मान्यता मिळून देखील इवद विभागाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नसल्याचे आढळून आले होते. निविदा विषयक कामकाज मोठया प्रमाणावर प्रलंबित ठेवल्याने त्यांच्याकडील पदभार अन्य

भारतीय संग्राम परिषदेची जिल्ह्यात जोरदार मुसंडी ! जिल्ह्यातील अनेक मुस्लीम बांधवांचा प्रवेश व नियुक्ती !!

इमेज
भारतीय संग्राम परिषद पक्षाची नासिकमध्ये अधिवेशनपूर्व बैठक संपन्न ! २७ जानेवारीला औरंगाबाद येथे अधिवेशन होणार ! नासिक(१)::- भारतीय संग्राम परिषदेचा २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील नियोजित अधिवेशनापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी काल संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे नासिकला आले होते, यांवेळी सटाणा, देवळा तसेच जिल्हाभरांतील अनेक कार्यकर्त्यांनी मेटेंच्या उपस्थितीत प्रवेश केला, याप्रसंगी बोलतांना आमदार विनायक मेटे यांनी पक्षाची भूमिका व वाटचाल यांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या अधिवेशनांत समाजाभिमुख ठरावांवर चर्चा होणार असुन सुशिक्षित बेरोजगारांना ५००० रूपये मासिक भत्ता देण्यात यांवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे अशा प्रमुख ठरावांबरोबर इतर विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसंग्राम तथा भारतीय संग्राम परिषद पक्षांत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.प्रवेश साेहळ्याप्रसंगी अँड. कातोरे, शिवा भागवत, उदय आहेर,अमित जाधव, मनोज दातीर यांसह मोछ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ

अहिर सुवर्णकार समाजातर्फे वधू वरांना मदतीचा हात ! स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव संस्कार दिन म्हणून साजरा-श्याम बिरारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अहिर सुवर्णकार समाजातर्फे आर्थिक दुर्बल वधू-वरांना   मदतीचा   हात       नाशिक  : नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेचे  संस्थापक स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्कार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अहिर सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.              अहिर सुवर्णकार संस्थेतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा, अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र, शिक्षित असूनही केवळ घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील आर्थिक दुर्बल वधू-वरांना आपले स्वप्न साकारता येत नाही. अशा वधू-वरांना संस्थेतर्फे मदतीचा हात दिला जाणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी यांनी व्यक्त केले. स्व. विजयकुमार पवार यांच्या स्मृतिदिनानिमित जैन गुरुकुल (वसतीगृह), मखमलाबाद आणि पेठ रोड येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वसतिगृहातील अनाथ मुलांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अनाथ व इच्छुक मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील दानश