पोस्ट्स

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
धुळे::- राष्ट्रवादी काँग्रेसच्या साक्री तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची निवड झाल्या बद्दल  धुळे जिप. अध्यक्ष  शिवाजीराव दहिते यांनी मराठेंचा सत्कार केला.                     सत्काराला उत्तर देतांना, जिल्हा कार्यकारिणीने एकमताने केलेली माझी निवड व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेरणेने मिळालेली जबाबदारी पार पाडण्याचे तसेच पक्ष संघटन व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करेन असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी सांगीतले.              या सत्कार सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे . साक्री तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष . विलासराव बिरारीस ,  माजी जिप. सदस्य उत्तम राव देसले हे उपस्थित होते, त्या सर्वांनी जितेंद्र मराठे यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुर्वीची खाद्यसंस्क्रुती टिकविण्याचे काम महीला स्वयंसहाय्यता गटांकडून टिकविली जात असुन या चळवळीला अधिक गती द्यायला हवी-नाम.शितल सांगळे ! महिलांमध्ये परीवर्तनाची ताकद असून देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रीय सहभाग महत्वाचा-पोलीस अँकेडमी संचालक अश्वती दोरजे !! ४ मार्च पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
       नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परीषद अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.        कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त सुखदेव बनकर, प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर, शिक्षण सभापती यतीन पगार, जि.प.सदस्य नितीन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे आदी उपस्थित होते.          यावेळी बोलताना श्रीमती सांगळे म्हणाल्या, लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत नेले आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारून  या गटांची वाटचाल स्वावलंबन

उद्योजक अनंत सांगळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना प्रवेश ! मातोश्रीवर उध्दव ठाकरेंकडून बांधले शिवबंधन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक चे उद्योजक अनंत (नाना) सांगळेंचा शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश.. माजी मंञी बबनराव घोलप,आमदार नरेंद्र दराडे  यांनी दिल्या शुभेच्छा... नाशिक::- येथील उद्योजक  "अधिकारी इंडस्ट्रीज" चे संचालक अनंत सांगळे यांनी  मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र  दराडे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला.        या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधुन सांगळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांगळे हे  नाशिकमध्ये विविध  सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.       अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांनी बेरोजगारी दूर करण्याचे काम  हाती घेतले आहे. त्यांच्या  या कार्याची दखल शिवसेनेनी घेतली आहे.शिवसेनेच्या माध्यमातून  नाशिकच्या विकासाठी तसेच  सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी  शिवसेनेत प्रवेश केला असून,  पुढील काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करत राहणार असल्याचे सांगळे यांनी  सांगितले.

दादर मधील व्यापारी संघटनाचे २५०० हून अधिक व्यापारी व कर्मचारी यांनी दहशतवादी हल्ल्याचा दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला ! मुख्यमंत्री निधीस देणार प्रत्येकी १०००/- रुपये !! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत  ' दादर व्यापर्‍यांनी संघटनेने '  मोर्चा काढून जवानांना वाहिली श्रद्धांजलि! अर्धा दिवस दुकाने बंद ठेऊन दहशतवाद विरोधी घोषणा – फलकांसह २५०० हून अधिक जणांनांचा मोर्चात सहभाग!   आपल्या राष्ट्राची सर्वात अनमोल - मौल्यवान संपत्ती असलेल्या आपल्या सैन्यावर पाकिस्तानी अतिरेकी संघटनेने भ्याड हल्ला करून भारत मातेच्या ४४ शूर वीर पुत्रांचं घेतेलेलं बलिदान हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी वेदनादायी व अतिशय दुख्ख: देणारी घटना आहे. या हल्याचा तीव्र निषेध नोंदवत दादर येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपली सर्व दुकाने (औषधांची दुकाने वगळता)   उतस्फूर्त बंद ठेऊन शत्रू राष्ट्राचा आणि दहशतवादाचा धिक्कार करीत निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये जवळपास २५०० हून अधिक व्यापारी – कर्मचारी सामील झाले होते. ‘दादर व्यापारी संघ’,  ‘उपनगरीय सराफी संघटना’,  ‘सुवर्णकार कारागीर संघटना’, ‘मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ’, ‘ दादर मेटल मर्चंट असोसिएशन’, ‘ दादर हॉटेल संघटना’, ‘ दादर धान्य व्यापारी संघटना’, ‘दादर फेरीवाले संघटना’*  अशानिमित्ताने एकत्र

अरे फोन का उचलत नाही ? हिम्मत होत नाही काय ? असं काय घडलंय काल ? सविस्तर वाचून दोन मिनिटे शांत राहून सर्वांनी थोडा राग व्यक्त करायलाच हवा !!!

इमेज
कुण्या देशभक्ताने लिहिलेल्या चार ओळी जशाच्या तशा ! आपला देश आज सुतकात आहे. ४२जवान शहीद.... ... पहाटे झोपेत असताना , काशमीरात तैनात असलेल्या 'मराठा लाईट इन्फन्टरी'तल्या एका मित्राचा फोन येतो...... 20 तास ड्युटी करून त्याचा आवाज कमालीचा थकलेला दबलेला असतो...  माझा जीव कातरून जातो... . तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या ---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती..??. आता ड्युटी संपली माझी- पहाटेपासणं फोन करतोय... फक्त रिंग येतीय.. . . मी पुण्यावरनं त्याच्या घरी फोन करतो... पण 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........ . . मग गावाकडच्या एका मित्राला फोन करून  त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... अंधारात चाचपडत तो त्याच्या घरी पोचतो.. कित्येक वेळा बेल वाजवूनही दार उघडलं जात नाही... . . परत मी त्याच्या घरी फोन करतो... 8 व्या वेळेला यावेळी फोन उचलला जातो, पलीकडून वाहिनीचा घाबरलेला -(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो... . थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता वहिनी ?? . . वाहिनी रडायला लागतात... जोरात! बांध फोडतात

श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभाग राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती !! सविस्तर बातमी साठी खालील लिन्कवर क्लिक करा !!!

इमेज
श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभाग राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती. औरंगाबाद/नासिक ::- मुळच्या देवळा जि नासिक येथील श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.          शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी ही नियुक्ती जाहीर केली असुन शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी श्रीमती फारूकी यांचे नियुक्तीबाबत अभिनंदन केले.          सध्या गाढे जळगांव येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या फारूकी यांचे बालपण व शिक्षण देवळा येथे झाले आहे, एक उत्तम संचालक म्हणून त्यांनी खुलताबादमधील पतसंस्थेचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळलेला आहे, त्यांची नियुक्ती ही शिक्षक भारती परीवारासाठी अभिमानाची बाब असुन महिलांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला अधोरेखीत करणारी गोष्ट असल्याचे मत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्यांकडून व्यक्त होत आहे.      या नियुक्तीचे मराठवाडा तसेच नासिक जिल्ह्यातील मान्यवर, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

काँग्रेसच्या त्यागामुळे देश एकसंघ राहीला-पत्रकार हेमंत देसाई. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कॉंग्रेसच्या त्यागामुळे देश एकसंघ ........ नाशिक : कॉंग्रेस पक्षाला त्यागाची मोठी परंपरा आहे महात्मा गांधी,पंडित नेहरू,लालबाहदूर शास्त्री अशा सर्वांनी देशाच्या उभारणी मध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या कर्तबगारी मुळे देशांमध्ये शिक्षणाची पाळेमुळे रोवली गेली.त्यांच्या सोबतीला पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे अंतरराष्ट्रीय धोरण व विकासाची दृष्टीमुळे भारत देश प्रगती पथावर आहे पण कॉंग्रेसच्या परिवाराने केलेल्या त्यागामुळे आपला देश एक संघ राहिला असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.         मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीची विशेष बैठक शनिवार दि.(९) रोजी कॉंग्रेस भवन येथे पार पडली.या बैठकीला नाशिक भेटीला अालेले हेमंत देसाई यांनी मार्गदर्शन केले.         या बैठकीत मध्य नाशिक ब्लॉक कमिटीच्या कार्यकारिणीमधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कॅमेटीने आयोजित केलेल्या संवाद या प्रशिक्षण शिबिराच्या प्रशस्ती पत्रकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.          देसाई यांनी पुढे बोलतांना प