पोस्ट्स

पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या उल्हासनगर शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!! बदलापूर, प्रतिनिधी : युनायटेड इंडियन्स पार्टीची सभा बदलापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेत श्यामभाऊ जांबोलीकर यांची उल्हासनगर शहराध्यक्ष तर दिपक साठे यांची शहर सचिव पदी तसेच बदलापूर शहर सचिव पदी अमर साखर्डे यांची निवड करण्यात आली आहे . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांनी माहिती देताना सांगितले की सद्या फक्त शहर पातळीवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत व निवड केलेल्यांना त्यांचे कार्य बघून त्यांची तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर नियुक्ती करण्यात येणार आहे . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय सचिव संभाजी जाधव यांनी सांगितले की युनायटेड इंडियन्स पक्ष हा देशप्रेमी संघठीत भारतीयांचा पक्ष आहे व ह्या पक्षात कुठल्याही प्रकारचा जातीयवाद होत नाही . तसेच सर्व धर्माच्या बांधवांचे पक्षात स्वागत करण्यात येईल . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार ओमकार सुब्रमण्यम यांनी नवनियुक्त पदाधिकार्

निवडणूक कर्मचाऱ्यास तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करून केले उपचार !! मतदान केंद्रांवरील आरोग्य सुविधेचा डॉ. नरेश गिते यांनी दिवसभर घेतला आढावा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
             नाशिक –लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या सर्व मतदान केंद्रांमध्ये आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्गत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मोहगाव ता नाशिक येथील बुथवरील कर्मचारी श्री. मावळे यांना किडणीस्टोन चा त्रास झाले कारणाने त्यांना तातडीने शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सर्व आरोग्य यंत्रणा सूसज्ज ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी  व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे  प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच तालुका व इतर ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आदी कर्मचारी सकाळपासूनच मतदान केंद्रात उपस्थित होते. प्रत्येक केंद्रात आरोग्य विभागाने स्टॉल लावला होता. यामध्ये विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. उष्माघाता बाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती.आरोग्य विभागाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही तयार

हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळ यांना विजयी करा - अण्णासाहेब कटारे! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
हिटलरशाहीचा पाडाव करून  समीर भुजबळ यांना विजयी करा -  अण्णासाहेब कटारे   नाशिक,दि.२५ एप्रिल :-  शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला, सर्व समावेशक समाजव्यवस्थेचा भक्कम पाया असलेल्या, संविधानाच्या माध्यमातून समर्थपणे उभा राहिलेला आपला देश आहे.  २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर स्वकेंद्रित विचारांच्या गर्तेत अडकलेल्या पक्षांच्या हाती गेला आणि त्यानंतर संपूर्ण देशात घडत गेलेल्या घटना, घडामोडी यांनी देशातील राजकीय, सामाजिक,आर्थिक, नियोजन, न्यायव्यवस्था,व्यक्ती व विचार स्वातंत्र्य अशा सर्वच घटकांवर अंकुश ठेवण्याचे काम केले जात असल्याने हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले आहे.             खा.शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली प्रांत, राज्य,वर्ण, अन्न इत्यादी विविधता असलेल्या सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जनसहभागातून विकासाची परंपरा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष व भुजबळ कुटुंबिय यांच्या संस्कारातून उभे र

गोडसे यांच्या प्रचारार्थ शहरात दुचाकी रॅलीचा झंझावात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
   गोडसे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीस मोठा प्रतिसाद         नाशिकः लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो तरुणांनी मोटारसायकलवर स्वार होत गोडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मोटारसायकलला लावलेले भगवे झेंडे, गळ्यात भगवी मफलर, डोक्यावर भगवी टोपी, मनगटात भगव्या रंगाची पट्टी व खिशाला अडवलेला धनुष्य बाणाचा बिल्ला अशा थाटात शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर महायुतीतील रासपाचा पिवळा, रिपाईचा निळा व भाजप-सेनेचा भगवा अशा विविध रंगी झेंड्यानी शहरातील रस्ते सजले होते.         सकाळी नऊच्या सुमारास अशोक स्तंभ येथील ढोल्या गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रस्त्यात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्या त्या भागात रॅली आल्यावर तेथील तरुण दुचाकीवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी होत होते. अनेक ठिकाणी उमेदवार  खा. गोडसे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. महायुतीची ही रॅली रुंग्ठा हायस्कूल

बिनचेहऱ्याची आघाडी पापं करूनही निर्लज्जपणे सामोरे येते, काॅग्रेसचे घोटाळे सुद्धा आदर्श घोटाळे आहेत-उद्धव ठाकरे ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकः  ज्यांनी सत्तर वर्षे देश लुटून खाल्ला, देशातील जनतेला पिळवलं त्या काँग्रेस व राष्ट्रवादीची बिन चेहऱ्याची आघाडी आहे. एवढी पापं करुनही ते पुन्हा निर्लज्जपणाने सामोरे येत आहे. त्यांनी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाचा सत्यानाश केला. आम्ही देव, देश व धर्मासाठी एकत्र आलो आहोत. देशाच्या हितासाठी युती केली आहे. ही भगवी वज्रमूठ पक्की असून कोणीही तिला टक्कर देऊ शकणार नाही. इथे इनाम राखणारी माणसं आहेत. एक दिशा आहे एक विचार आहे व एक नेता आहे. काश्मीरमधील ३७० कलम काढणार असून देश द्रोह्यांना फासावर लटकावणार असून आम्ही राममंदीर बांधणारच असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.          नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवर हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी , राज्यमंत्री दादा  भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हा संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सेनेचे

समीर भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे -- अनिता भामरे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक (प्रतिनिधी) विकसनशील शहरांच्या यादीत असलेले नासिक शहर हरवले, यावर उपाय म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी  केले         विकसनशील शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर असलेले नासिक भाजपा सरकारच्या काळात हरवले आणि विकासात मागे पडले म्हणून नासिक शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे  आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मतदारांना केले. केवळ मोठमोठ्या घोषणा करून सर्व सामान्य जनतेला फसवून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मात्र गेल्या पाच वर्षांत ह्या सरकारने कुठल्याही प्रकारचे जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेतले नाही यामुळे जनतेच्या मनात राग आहे. शेतकरी कर्जमाफी नाही, युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, नोटबंदी, अशा विविध कारणांमुळे जनता हवालदिल झाली आहे असे भ

लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड ! गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड                 खा. गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद           नाशिकः  खा. हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांत चांगली कामे केली आहेत. ते सुसंस्कृत, सुस्वभावी, हुशार व चांगली वर्तणूक असलेला विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात त्यांचा लौकिक आहे. लोकोपयोगी कामांमुळे जनमाणसांत गोडसे यांची प्रतिमा उंचावली असून ते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम इंजिनिअरींग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यांची महाविद्यालयाशी नाळ जोडली आहे. या महाविद्यालयातील सर्व सेवकवृंद त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहातील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य  व्ही. बी. गायकवाड यांनी केले. प्रचार दौऱ्यानिमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.            प्रारंभी महाविद्यालयाच्यावतीने गोडसे यांचे स्वागत करण्यात आले. गोडसे यांनी माझी उमेदवारी याबाबत प्राध्याकांशी संवाद साधला. त्यानंतर गोडसे यांनी कॉलेज रोडवरील एचपीटी कॉलेजमध्ये जा