पोस्ट्स

साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान..... !! एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो, या कुटुंबातील  सदस्य शिक्षकांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील - अध्यक्ष संजय देवरे !!! एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in -संपादक नरेंद्र पाटील ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान.....          जळगाव ::- एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे जळगावच्या प्रथम नागरिक सिमाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी तहसीलदार कैलास चावडे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य चौधरी , जैन ग्रुपचे किशोर कुलकर्णी, एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.           पुरस्कार वितरणानंतरच्या एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाहीलेले वास्तव व त्यातून पुढे समाजातील घटकांसाठी कार्य करणे, ही भावना रूजविण्याचे अपरोक्षपणे,  व अव्याहत कार्य शिक्षकांकडून केले जाते अशा सर्वच शिक्षकांचा हा गौरव सोहळा आहे, याप्रसंगी त्यांनी देवळा तालुक्यातील खेड्यातून मी तेथील शिक्षकांनी मला दिलेले सं

विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन-अध्यक्षा शितल सांगळे ! जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे गरजेचे-भुवनेश्वरी एस. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!

इमेज
नाशिक – समाजाला समृध्द आणि सशक्त करण्याची क्षमता शिक्षणात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे काळाची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.         जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज वडाळारोडवरील अशोका कॅम्पसमध्ये नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ सांगळे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विविध सामाजिक संघटना, कारखाने यांचे एकत्रिकरण करण्यात येवून सीएसआर सेलची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत आज सर्व घटकांसाठी नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले.         पुढे बोलताना शितल सांगळे यांनी शाळाबाहय मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांप्रमाणेच क्रिडाविषयक सुविधा व म

वेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्यूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
"वेडं मन तुझ्यासाठी" चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विजयकुमार घोटे यांचं दुःखद निधन ! न्यूज मसाला परीवाराचा हितचिंतक आज दि. ३० आॅगस्ट २०१९ रोजी आपणा सर्वांना दुरावला, त्यांस शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!! विजू, तुला आई आणि वडील यांनी "विज्या" हि हाक मारली की नाही मला माहीत नाही, परंतु ते सोडून तुला मिळालेल्या आयुष्यात दुसऱ्या कुणी अशी हाक मारली नसेल, तुझा स्वभावच मुळी सडेतोड, परखड पण आदबशीर होता आणि आज अचानक तु आम्हा सर्वांना सोडून गेलास, अनेकांनी आज हक्काने व तुझ्या निघून जाण्याच्या दुःखाने  "विज्या" तुझं "वेडं मन तुझ्यासाठी" च राखून ठेवलं रे म्हणत बैलपोळ्याचा अमावस्येच्या दिवशी (जे तुला कधी पटत नव्हते) सर्वांचे "मन" खट्टू करुन गेलास !           आदिवासी समाज तुझ्याकडे एक पत्रकार, यशस्वी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, भावी राजकीय नेता, समाजाचा आधारस्तंभ अशा भावनेने सतत पहात होता, तुझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना तुझा बौद्धिक व सामाजिक  सहवास हवाहवासा वाटायचा, नव्या धागूर ता. दिंडोरी जि. नासिक येथून मुंबई दिल्ली पर्य

२८ वी वार्षीक क्रिडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ! विजयी खेळाडू पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील व यश संपादन करतील-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!!

इमेज
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आयोजित २८ वी वार्षिक किडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आजचा दिवस हा मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन असल्याने संपूर्ण भारतात किडा दिन साजरा केला जातो. सदर किडा स्पर्धा २७ ते २९ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत पार पडली.  किडा स्पर्धेत पोलास आयुक्तालयातील परिमंडळ १, परिमंडळ२, पोलीस मख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय व इतर शाखा अशा ०४ संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत एकुण १५० पोलीस खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबाॅल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो असे पुरुष सांधीक खेळ व महिलांकरीला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडडी, खो-खो यांचा समावेश होता. वैयक्तीक खेळांमध्ये पुरुष व महिलांचे १००, २००, ४००, ८००, १५०० मीटर धावणे, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, रिले. क्रासकंट्री, मॅरेथॉन तसेच कुस्ती,  बाॅक्सिंग, वेटलिफ्टीग, जुडो, तायक्वांदो यांचा समावेश होता. स्पर्धा अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बेस्ट अॅथ

नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!

इमेज
नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! नासिक::- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण (सटाणा) येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी नंदुरबार जिल्हा परिषदेतून बढती बदलीने सारीका बारी यांनी आज नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.         सारीका बारी या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या जय हिंद महाविद्यालय धुळे येथे झाले आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनीधीने संपर्क साधला असता त्यांनी कुपोषण, शिक्षण व आरोग्य याविषयी काम करण्याचे मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर पंचायत समितीच्या इतर विभागातील कामकाजावर लक्ष देण्यात येईल, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपसातील विश्र्वासात दृढता निर्माण करून तालुक्याच्या विकासासाठी झटणार, प्रलंबित कामांचा निपटारा करतानाच नवीन कामांकडे लक्ष देण्यात येईल अशी माहिती दिली.

द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ! मराठीतील अनकट वनटेक सलग ४ तास २ मिनिट ५३ सेकंद चित्रपट !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल न्यूज मसाला, संपादक नरेंद्र पाटील, !!!!

'द हंग्री' मराठी चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ! -  'द हंग्री' चित्रपट मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र ठरला आहे. मराठी चित्रपट सृष्टीत अशा प्रकारच्या चित्रपटाचा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. 'द हंग्री' हा मराठी भाषेत तयार होणारा हा चित्रपट ४ तास ०२ मिनिट ५३ सेकंद अनकट वनटेक चित्रपट आहे. अशा मोठया चित्रपटाचे तो हि अनकट म्हणजे वन टेक असणाऱ्या प्रीमियर-शो झाल्यानंतर याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये करण्यात आली. संतोष राऊत व नितीन चव्हाण  दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ०६ जानेवारी २०१९ रोजी पुणे येथे चित्रित करण्यात आला आहे.या प्रसंगी गिनीज रेकॉर्डचे प्रतिनिधीं उपस्थित होते. मराठी भाषेतील जगातील पहिला अनकट वनशॉट, सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट ठरला. हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक अनोखा प्रयत्न होता, जो मराठी सिनेमाला नवीन उंचीवर घेऊन गेला असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाचे मयुरेश जोशी (डी.ओ.पी.) यांनी चित्रीकरण केले आहे. तांत्रिक दिग्दर्शन अभीर कुलकर्णी तर संगीत ओमकार केळकर यांचे लाभले आहे, या चित्रपट

जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार- भुवनेश्वरी एस. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक – मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी महिला व बालविकास विभागाच्या सर्व संबधित अधिकारी व कर्मचा-यांना पोषण अभियानाबाबत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या महिला व  बालविकास विभागाच्या वतीने पोषण अभियानाबाबत आज जिल्हास्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणेसाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, दिंडी, विविध स्पर्धा. पोषण मेळावे आदि विविध प्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिले असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनाही या