पोस्ट्स

औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा ! आयोजकांतर्फे मनोरंजन गूरु यांच्या मनोरंजनाची खास मेजवानी !! जीपींकडून आलेल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
औषध निर्माण अधिकारी संघटनेचा अनोखा फार्मसी दिवस उत्साहात साजरा !            नाशिक जिल्हा शासकीय औषध निर्माण अधिकारी संघटनेने शासकीय रुग्णालयीन औषध निर्माण अधिकारी यांचेसाठी हॉटेल साधना, गंगापूर रोड नाशिक येथे मनोरंजन गुरु यांचा अनोखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.या कार्यक्रमात  उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांचे दैनंदिन कामा व्यतिरिक्त एक मनोरंजनात्मक कार्यक्रम घडवुन सर्वांना तीन ते चार तास मनोरंजन व हास्य विनोदात तल्लीन करुन टाकले होते. महिलांच्या व पुरुष अधिकारी यांच्या विविध खेळांतून मनोरंजन केले जात होते. कार्यक्रमाच्या मध्यानात विविध हिंदी गाण्यांवर नाचण्याचा ठेका धरुन उपस्थित औषध निर्माण अधिकारी बंधु भगिनी यांनी मनमुराद आनंद साजरा केला. विविध जुन्या गाण्यावर नाचण्याचा ठेका उपस्थित औषध निर्माण अधिकारी यांनी धरल्यावर मनोरंजन गुरु हेही सर्व उपस्थित यांचे बरोबर गाण्याच्या तालावर नाचत होते.               उपस्थित औषध निर्माण अधिकाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी शिवाजी (आण्णा) मुसळे, श्री.मिश्रा,  पिंपळसे व श्री.मोरे साहेब यांचा सेवानिवृत्ती निमित्त

  प्लॅटून वन फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट पिकासो चा फर्स्ट लूक लाँच! दशावताराची कथा आणि व्यथा प्रथमच रूपेरी पडद्यावर !! न्यूज मसालाच्या रसिकांसाठी पिकासो बाबतचे महेश भट्ट यांचे ट्वीट !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
      'प्लॅटून वन फिल्म्स'निर्मित मराठी चित्रपट'पिकासो'चा फर्स्ट लूक लाँच! ·                 पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा आणि व्यथा! ·                 अभिनेता प्रसाद ओक यांचा विलक्षण भावमुद्राभिनय! ·                 ' पिकासो '   चे फर्स्ट लूक पोस्टर  जेष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले ट्विट! मुंबई, २३ सप्टेंबर २०१९: 'बुटीक फिल्म स्टुडिओ' आणि 'प्लॅटून वन फिल्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या'पिकासो' या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक आज खास प्रेक्षकांसाठी आज प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक यांच्या दशावतारातील मोहक छबीचा फर्स्ट लुक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली असून चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. अमराठी युवा निर्माते शैलादित्य बोरा यांची ही पहिली निर्मिती असून 'कोर्ट' या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाचे कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं असून ह

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य ! मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली !        नाशिक  – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. आज देवळा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या खालप फाटा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आवारात पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतूक करुन जिल्हयातील सर्व शाळांमध्ये अशाप्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात  स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून जिल्हयातील ग्रामपंचायतींमध्ये याबाबत विशेष ग्रामसभा घेवून या मोहिमेचा शुभारंभ तसेच प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत प्लॉस्टिक श्रमदान, स्वच्छताफेरी, शपथ, गृहभेटी आदि प्रकारचे उपक्रम ग्रामपातळीवर राबविण्य

न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ! दिवाळी विशेषांक प्रकाशक अनेक संकटांचा सामना करीत लेखक कवी यांच्या सृजनशील शब्दांना समाजापर्यंत पोहचवितात - अॅड. बाळासाहेब तोरस्कर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !     पुणे (२२)::- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला नक्षत्रांचं देणं काव्यमंच, पुणे, या संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक, समिक्षक अॅड बाळासाहेब तोरस्कर प्रसिद्ध कवी विलास शिंदे, यशस्वी उद्योजक अतुलशेठ परदेशी, वसई येथील सुप्रसिध्द डॉ, पल्लवी बनसोडे, रेखा रोशनी मुंबई, संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे आदिंच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृहात येथे सोहळा संपन्न झाला.         पुणे येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था गेली वीस वर्षे लेखक कवी यांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. लेखक कवी यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दिवाळी अंक प्रकाशक मोठ्या कष्टाने व आर्थिक संकटातून प्रयत्नशील असतात त्यांचा सत्कार करणे व त्यांना सामाजिक पाठबळ मिळावे या हेतूने तेरा वर्षांपासून राज्यभरातील दिवाळी विशेषांकातून दरवर्षी तीन उत्कृष्ट अंकांना  गौरविण्यात येत आहे, या वर्षी न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला गौरविण्यात आ

जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! ऐतिहासिक भास्कर वाघ प्रकरणाला उजाळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब !                       जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून आजही अशी अफरातफर होते व प्रशासनाला उशिराने जाग येते, काही वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली गेली होती, सदर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती, "भास्कर वाघ" हे नाव न राहता एक वाक्प्रचार रूढ झाला होता, आजही आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा धनादेशावर शून्य वाढविला जात असे आता सरळ धनादेश व त्यावरील स्वाक्षऱ्याच बनावट करून तब्बल दोन कोटी ष्याऐशी लाख रुपये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे युनियन बँक खात्यातून काढून नेल्याची घटना घडली आहे. मात्र मुळ धनादेश आजही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे असताना बनावट धनादेश आरोपीने बनवलाच कसा, त्याला सदर माहिती कशी मिळाली, कव्हरींग नोट व सह्यांचा नमुना कसा प्राप्त झाला असे प्रश्र्न उपस्थित होत आहेत.      राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर तुषार जगताप यांना मिळाली संधी... !!! न्यूज मसाला परीवाराकडून त्यांच्या निवडीचे व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नाशिक मधून तुषार जगताप यांना मिळाली संधी...                नाशिक(२१) :- राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रथमच महामंडळाच्या अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा त उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा देण्यात आला असून नऊ संचालक महाराष्ट्रातील विविध भागातून निवडण्यात आले असून नाशिक विभागातून तुषार जगताप यांना संधी देण्यात आली आहे. _________________________________________            न्यूज मसाला चे हितचिंतक आमचे मित्र तुषार जगताप यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !                          संपादक                        नरेंद्र पाटील __________________________________________          या निवडीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन तसेच नाशिक खासदार, आमदार सर्व पक्षीय पदाधिकारी मराठा संघटना, मराठ

शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बॅंक ! २२ सप्टेबरला समाज प्रबोधन शोभायात्रा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन !! कार्यक्रम उदय निरगुडकर व चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत !!! नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक चे शंभराव्या वर्षात पदार्पण !      नासिक (२०)::- नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक २२ सप्टेंबर २०१९ ला ९९ वर्ष पूर्ण करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत स्वच्छ व सुंदर नासिक, प्लॅस्टिकमुक्त नासिक, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण जनजागृती करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण कार्यक्रमास जेष्ठ लेखक व व्याख्याते उदय निरगुडकर, सिने व नाट्य अभिनेता चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे असून सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह शोभायात्रेचे आयोजन केले आहे.          शतक महोत्सवी वर्ष लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , नोव्हेंबर २०१९ पासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे साहित्य संमेलन, माजी संचालक-पदाधिकारी सन्मान सोहळा, जिल्ह्यातील बॅंक व नोकरदार पतसंस्थांची परिषद भरविणे, सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यानांचे