पोस्ट्स

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी नाशिकचे प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे नेते विठ्ठलराव धनाईत यांचा ठराव !! विधान परिषदेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ व आ.सुधीर तांबे यांची धनाईत नावाने शिफारस !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रकाश उखाडे यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यासाठी नाशिकचे प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे नेते विठ्ठलराव धनाईत यांचा ठराव विधान परिषदेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ व आ.सुधीर तांबे यांची धनाईत नावाने शिफारस     .     नासिक::-प्राथमिक शिक्षक पदविधर संघटना व केंद्र प्रमुख सभेचे राज्य नेते विठ्ठलराव कारभारी धनाईत (म्हसरूळ-नाशिक)यांना राज्यपाल नियुक्त घेण्यात यावे.यासाठी विधान परिषद सदस्यत्वाचे नामनिर्देशन करावे.या मागणी संदर्भात प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटनेची  कार्यकारणी विशेष बैठक आॅनलाईन घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते हा विशेष ठराव मंजूर करण्यात आला.याबाबत काल विधान परिषदचे उपाध्यक्ष ना.नगहरी झिरवाळ व शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी श्री.धनाईत यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे धनाईत समर्थकांकडून सांगण्यात आले.    प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटनेचे राज्य  अध्यक्ष उमेश गोंदे हे या आॅनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तेंव्हा प्रामुख्याने राज्य कोषाध्यक्ष भास्कर भदाणे यांनी प्राथमिक शिक्षक पदवीधर संघटना व कें

न्यूज मसाला स्पेशल,. आँनलाईन सभा तहकूब एक शोकांतिका !! सविस्तर न्यूज मसाला स्पेशल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला स्पेशल , शोकांतिका-आॅनलाईन सभा तहकूब !         नासिक::-आँनलाईन सभा तहकूब करण्यात आली, या बातमीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी समर्थन केले. समर्थन करणाऱ्यांनाही स्पष्ट व खंबीरपणे भूमिका सादर करता आली नाही.         कोरोना जागतिक महामारी आहे, हे संकट भयानक रूप धारण करू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने नेहमी सूचित करण्यात येत आहे तरीही कुणी हट्टाला पेटून समाजाचं तसेच स्वत:चे नुकसान करून घेणार असेल तर अशांना काय उपमा देता येईल ? ज्यांचा उदरनिर्वाह आपले अस्तित्व विसरून करीत आहेत, आजच्या परिस्थितीला, उपासमारीच्या संकटाला तोंड देत आहेत, तेथे सभागृहात सभा घ्यावी असा आग्रह करणारे यांना काय उपमा देता येईल ?         न्यायालयात सुरु असलेल्या सुनावण्या आँनलाईन होत आहेत, एका प्रकरणात आँनलाईन कागदपत्रे सादर करणे शक्य नाही असे राज्यसरकारच्या वतीने न्यायालयाला सांगितले जाते तेथेही निर्णय प्रलंबित ठेवण्यात येतो, देशाचे पंतप्रधान, राज्य सरकारे, तसेच प्रशासकीय पातळीवर सर्वच आँनलाईन सभा घेत आहेत, यावरून तरी आँनलाईन व आॅफलाईन सभेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.        

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! नासिक::- न्यूज मसाला कडून प्रकाशित केलेल्या "बातमी अशी कुठे असते का ? या मथळ्याच्या बातमीची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून तत्काळ घेण्यात आली होती, जागतिक महामारी कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर आॅनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले होते, सदर प्रमाणपत्र ओम व शिवानी या जुळ्या भाऊबहीणीला नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.         जुळ्या भाऊबहीणीला प्रत्येक विषयात वेगवेगळे गुण आहेत मात्र एकत्रित गुणांची टक्केवारी समान मिळाली, न भूतो न भविष्यती असेच वर्णन असलेली ही घटना.          महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड कडून पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र प्रदान करतेवेळी ओम व शिवानी सोबत त्यांचे पालक श्री व सौ सुनील बिरारी, न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, माय मराठी वृत्तवाहीनीचे सुनील निकम उपस्थित होते. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांना लीना बनसोड यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले, कोणत्याही क्षेत्रात शिक्षण

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..... शब्द देऊन शब्दला कृतीत आणण्यासाठी झटणारे विरळाच असतात ! कोणी शब्द कृतीत आणला या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले,, रासाका माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांनी पूर्णाकृती पुतळ्याला उजेडात आणून आपला शब्द ठरविला खरा . निफाड तालुक्यातील रासाका  कार्यस्थळावरील कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा   रासाकाचा  वीज पुरवठा खंडित असल्या कारणाने अनेक वर्षापासून अंधारात होता तर ज्यांनी हा पूर्णाकृती पुतळा रासाका  कार्यस्थळावर उभारला ते रासाका चे  माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांना कर्मवीरांचा पुतळा अंधारात ही बाब खटकत होती कारण ज्या कर्मवीर काकासाहेब काकासाहेब वाघ यांनी रासाका  नाही तर तालुक्यातल्या उत्तर-पूर्व पट्ट्यात सर्वप्रथम वीजपुरवठा आणला त्यांचाच   पुतळा अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींना वाईट वाटत होते त्यामुळेच     दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून जवळपास 25 हजाराचा  सौर ऊर्जा किट कर्मवीर काकासाहेब वाघ पुण्यतिथीच्या दिवशी घोषणा करत देण्याचे रासाका  कार्य स्थळावरील कर्मवीराना  22 जुलै या कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने अभिवादन करताना सांगितले व त्याची अंमलबजावणी करत कर्मवीरांचा पुत

आजीबाईंच्या निधनानंतर नातू हार्दिक निगळ याने कशाप्रकारे वाहीली श्रद्धांजली !! , , सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! ,

इमेज
प्रकाश उखाडे यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कष्टप्रद ‘आजीबाईं’ च्या निधनानंतर आपल्या शेतातच अस्थिविसर्जन व वृक्षरोपणाने जपल्यात आठवणी..!’         नासिक::- काळी आई धन धान्य देई.. म्हणूनच आपल्या मायभुमीवर प्रेम अन् सतत कष्ट करता-करता मायभुमीमुळेच आपले जीवन सफल झाले..आज सारंच कुटूंब गुण्यागोविंदाने जीवन जगत आहे..ते केवळ आपल्या आजीबाईंमुळेच..म्हणून आजीबाईंच्या निधनानंतर आठवण कायम रहावी यासाठी म्हसरूळच्या निगळ कुटूंबाकडून अस्थिविसर्जन कुठल्याही तीर्थक्षेत्री न करता आपल्याच शेतात खड्डे खोदून अस्थि विसर्जनासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करून आजीबाईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.             आजीबाईंनी आपले संपुर्ण जीवनच शेतात घालवलं..अन् शेतातच राबतां-राबतां आपल छोटंस कुटूंब बहरलं..अशा या आजच्या छोट्यातून मोठया सदस्यात बहरलेल्या आनंदमय कुटूंबातील कष्टमय माऊलीच देवाघरी निघून गेली..त्यानंतर मात्र त्याच माऊलीच्या आठवणी शेतातच रहाव्यात यासाठी आजी माऊलीचा नातू हार्दिक निगळ याच्या संकल्पनेतून व सर्वांच्या एक विचाराने अखेर सदर वयोवृध्द आजीबाईंचे निधनानंतर अस्थिविसर्जन हे  त्यांच्याच शेतात करण

वैनतेय विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची १० वी बोर्डाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस वैनतेय विद्यालयाचा  इयत्ता १० वी बोर्डाचा   निकाल  ९४.६०  टक्के          नासिक::-निफाड  शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या वैनतेय  विद्यालयाचा गत अनेक वर्षांपासूनचा  इयत्ता १० वी  बोर्डांच्या निकालाची उत्तुंग परंपरा याही वर्षी सुरू ठेवत ९४.६०  टक्के लागला आहे, विद्यालयाने या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी  ९८  टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम क्रमांकाने आली आहे. १० वी परीक्षेसाठी या विद्यालयाचे   ३८९  विद्यार्थी प्रविष्ट झाले  होते यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहेत, यातील विशेष प्राविण्य श्रेणीत   १७७ विद्यार्थी, प्रथम  श्रेणीत ८६  विद्यार्थी , द्वितीय  श्रेणीत  ८३ विद्यार्थी , तृतीय  श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त  गुण मिळाले आहेत       या विद्यालयात आलेले  प्रथम ५ गुणवंत  विद्यार्थी   पुढीलप्रमाणे प्रथम-  वैष्णवी मनोज  लाहोटी ( ९८ टक्के) -  ,द्वितीय - अमित ज्ञानेश्वर कापसे - ( ९६.२० टक्के ) ,  तृतीय-  विजया यशवंत  कुंद

बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!

इमेज
                             नासिक::- येथील बाॅईज टाऊन शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान ८८.२०% गुण मिळाले. यांत काही विशेष नाही असे आपल्याला वाटत असेल तर ही बातमी वाचायलाच हवी.         ओम आणि शिवानी यांनी जे समान गुण मिळविले हा नासिक नव्हे तर जगभरातील तमाम वाचकांसाठी कुतुहलाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणही तसेच आहे, असा विक्रम भविष्यातही लवकर घडेलच असं छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही.           नाशिक येथील आई इव्हेंट्स या संस्थेचे संचालक सुनील बिरारी हे मूळचे पाळे ता.  कळवण येथील असून सध्या व्यवसायानिमित्त वास्तव्यास नाशिक येथे आहेत. यांचे जुळे मुलगा व मुलगी (भाऊ बहीण) यांना इयत्ता दहावी शालांत परीक्षेत (२०१९-२०) दोघांनी समान (८८.२०%) गुण मिळविले आहेत, विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित होत असतात मात्र असा विक्रम प्रथमताच घडल्याचे दिसून येते व भविष्यात लवकर कधी होणार हे सांगणे शक्य नाही,  कौतुकास्पद बाब तसेच हा विशेष योगायोग आहे.      जुळ्यांचा चेहरा राम और शाम असतो असे अनेक चित्रपटात वा वास्तवात आढळून येते, मात्र मुलगा आणि मुलगी हा जन्मताच बदल असलेले ओम आ

कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व उपचार होणेकामी "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन ! सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक - बाळासाहेब क्षीरसागर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
"सच प्रणाली" ऍपचे उदघाटन संपन्न ! ******************************        नासिक::-कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका आढावा सभेप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, सौ.संगीता पावसे, भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          कोरोना प्रादुर्भाव या संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना या संदर्भात समन्वयाने चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमि

न्यूज मसालाचा अंक दि. ३० जुलै २०२०. संपादकीय-मुलाखतीचा सोस !! दीपक दंडवतेंच्या लेखणीतून-सारस्वतांच्या नगरीतील संतोष !!! रासाका-निसाका सहकार विशेषांक !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय                      मुलाखतींचा सोस !! मुलाखतीला जायचं म्हणजे तयारी करावी लागते पण कितीही अभ्यास करून जा, जर मुलाखत घेणाऱ्यांनी आधीच ठरवलेले असेल तर काय कुणाची बिशाद की तुमची निवड होईल ? बरं मुलाखत कोणी कोणाची घ्यावी याचे काही संकेत असतात, अनेक ठिकाणी स्पष्ट लिहीलेले असते की परीक्षार्थी ने जर कुणाची ओळख दाखविली, मुलाखत घेणाऱ्यावर दबाव आणला किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर उमेदवाराला मुलाखत देण्यापासून रोखले जाईल ! आणि रोखले जातेच ! मात्र आज कुणीही मुलाखत घ्यायला येतो आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत असतो ! अनाकलनीय असे वाटते. माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा संशोधनाचा विषय आहे तरीही अनेक माध्यमे मुलाखत या गोंडस नावाखाली उखळ पांढरे करून घेतात, सर्वच मुलाखती अशा असतात असे नाही.          मुलाखतीची प्रश्नावली कशी, कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही व कधी किती सोयीस्कर असेल हेही सांगता येत नाही. मुलाखतीला विचारले जाणारे प्रश्न एकसारखे असतील तरीही ज्याची निवड करायचे ठरविले तोच निवडला जातो ! हे कसं ?       एका नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये प्रत्येका

पक्षीय जोडे बाजूला ठेवून मॅरेथॉन बैठकांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची आशा ! आता मात्र निर्णायक लढाईसाठी सर्व एकत्रित येणार ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,           नासिक::-निफाड तालुक्यातील सहकार चळवळ कर्मवीरांनी ज्या अनुषंगाने स्थापन केली होती त्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो या लोक भावनेतून आपण सर्वांनी काम केले तर पुन्हा संस्थांना व सहकारला उर्जिता अवस्थेत आणणे अवघड नाही, निफाड सहकारी साखर कारखाना, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी व केजीएस शुगर इन्फ्रा प्रा.ली., हा खाजगी कारखाना बंद अवस्थेत असल्याने हे कारखाने सुरु करणे कामी निफाड तालुक्यातील सर्व पक्षीय जेष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करावा या दृष्टिकोनातून निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घेऊन पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सोमवारी बैठक आयोजित करून आपली भूमिका मांडली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुक्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी विलास बोरस्ते यांनी बैठकीचा मुख्य हेतू काय आहे हे विशद करून आमदार दिलीप बनकर यांनी प्रास्ताविका मध्येच बैठकीचा मुख्य हेतू तालुक्यातील सहकार चळवळ टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून जेष्ठाचे मार्गदर्शन व सह