पोस्ट्स

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक             नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास क

माजी आमदार रामनाथ दादा मोते काळाच्या पडद्याआड !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कुंभारी चे भूमिपुत्र माजी आमदार रामनाथ मोते काळाच्या पडद्याआड निफाड तालुक्यातील कुंभारी सारक्या छोठ्या गावाला आमदारकी  ती पण  कोकण पट्यात  मिळवून देणारा  आज काळाच्या पडद्याआड !           नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी  गावचे भुमीपुत्र माजी शिक्षक आमदार  रामनाथ मोते वय ६८ यांचे दु: खद निधन झाले. महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे व सोडविणारे  शिक्षक नेते म्हणून कोकणासह  संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन झाल्याने मोते परिवारासह  राज्यातील शिक्षकांवर गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या जन्मगावी कुंभारीत स्वयंस्फुर्तीने गाव बंद करत त्यांना श्रद्धांजली वाहून व्यवहार बंद ठेवले याबाबत अधिक माहिती अशी की,      आज सकाळी ७ वा. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे वयाच्या ६८  व्या वर्षी  दु:खद निधन झाले. त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभुमी,  दादोजी कोंडदेव स्टेडीयम समोर , ठाणे ( प. ) येथे दुपारी 12 वा. शासकीय नियमांचे पाल

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग ! रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम !! !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    नाशिक-   ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. रानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक

यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?           नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे  लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या  सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले  निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्

रिस्क" घ्यायला जे लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत ते जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत, हे ही नसे थोडके,,,,,,,,,,,,,. प्रशासनाकडून आॅफलाईन सभा अटी-शर्तीनुसार घेतल्या जाणार !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                      कोव्हिड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण भारतात अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आॅफलाईन सभा घेण्याचा मार्ग अटी-शर्तीनुसार मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी आॅनलाईन सभा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून कलगीतुरा रंगला असल्याचे आपण सारेच बघत आलो होतो. मात्र आता कोव्हिड-१९ चां प्रादुर्भाव व त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या मृत्युंच्या संख्येवर नियंत्रण तसेच संसर्ग झालेल्यांना आजारातून बरे करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे संपूर्ण देशात अनलाॅक प्रक्रीयेने सुरूवात केली आहे.          लोकप्रतीनिधींकडून आॅफलाईन सभांसाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते परंतु जनहितासाठी अशा दबावाला प्रशासन बळी पडले नाही. अनेकांकडून खडेबोल सुनावण्याचे "राजकारण" करण्यात आले. यांत प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. प्रशासनाला आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळू लागले तेव्हाच प्रशासनाकडून अटी-शर्ती नुसार मेट्रो सुरू करणे, रेल्वेच्या काही मार्गिकांवरील वाहतूक, आंतरराष्

पोलिस उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांना मातृशोक ! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या   मांजरगाव येथील माजी सरपंच  सखूबाई रामनाम सोनवणे यांच्या सासूबाई व प्रगतशील शेतकरी रामनाम नथु सोनवणे यांच्या मातोश्री भागीरतीबाई नथु सोनवणे यांचे( वय ९५ ) दुःखद निधन झाले ,त्यांचे पश्चात चार मुले ,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे,    मुंबई पोलीस दलात सेवा बजावणारे उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांच्या त्या  मातोश्री होत.

कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर! करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा          नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात  त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊसाहेब

न्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी !!!

इमेज
संपादकीय पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! समृद्ध मराठी भाषेतील म्हणी, "दिव्याखाली अंधार" "आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना" "वैद्याचं पोरगं पांगळं"       अर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात  काय ? जगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा ?     माध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी "निर्बुद्ध" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.       सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय ?        माध्यमांनी जाहीराती मिळविण्याचा जो बाजार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क- 7387333801.

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण!  - डॉ मुरहरी सोपानराव केळे निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स"द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळातही  चित्रपटाविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित्यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे. "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात

करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ! आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व  लोकार्पण         नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष  नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.              माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे.