पोस्ट्स

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास पुरस्कार !न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
"लोकराजा" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार ! नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन  २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे,  न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.       लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात "सेंट्रल टेबलावर" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.         सन २०१२ मा. खा.  डॉ. दौलतराव आहेर यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित करून सुरू

गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा !     गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाकारांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात.               आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात  आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा साकारण्यात येते. मूळात वारली चित्रकलेचा जन्मच परमेश्वराच

दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी -  मनसेचा आयुक्तांना इशारा. नाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.       गत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या क

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक             नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास क

माजी आमदार रामनाथ दादा मोते काळाच्या पडद्याआड !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कुंभारी चे भूमिपुत्र माजी आमदार रामनाथ मोते काळाच्या पडद्याआड निफाड तालुक्यातील कुंभारी सारक्या छोठ्या गावाला आमदारकी  ती पण  कोकण पट्यात  मिळवून देणारा  आज काळाच्या पडद्याआड !           नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी  गावचे भुमीपुत्र माजी शिक्षक आमदार  रामनाथ मोते वय ६८ यांचे दु: खद निधन झाले. महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे व सोडविणारे  शिक्षक नेते म्हणून कोकणासह  संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन झाल्याने मोते परिवारासह  राज्यातील शिक्षकांवर गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या जन्मगावी कुंभारीत स्वयंस्फुर्तीने गाव बंद करत त्यांना श्रद्धांजली वाहून व्यवहार बंद ठेवले याबाबत अधिक माहिती अशी की,      आज सकाळी ७ वा. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे वयाच्या ६८  व्या वर्षी  दु:खद निधन झाले. त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभुमी,  दादोजी कोंडदेव स्टेडीयम समोर , ठाणे ( प. ) येथे दुपारी 12 वा. शासकीय नियमांचे पाल

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग ! रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम !! !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    नाशिक-   ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. रानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक

यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?           नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे  लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या  सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले  निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्