पोस्ट्स

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला ! २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे प्रात्यक्षित व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडून प्रक्रीयेचा आढावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
सय्यद पिंप्री येथे कोरोना लसीची ड्राय रन संपन्न २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे करण्यात आले प्रात्यक्षित नाशिक -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बहुप्रतीक्षित कोविड-१९ प्रतिबंधक लस ही नेमकी कधी दिली जाणार याबद्दल उत्सुकता असतांना जिल्हा प्रशासनाकडून दिनांक ८ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेचा ड्राय रन घेण्यात आला,  यामध्ये हे लसीकरण कशाप्रकारे पार पाडले जाणार याची रंगीत तालीम करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सय्यद पिंपरी येथे उपस्थित राहून घेतला.कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये तीन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, पहिल्या कक्षात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यात येईल त्यानंतर दुसऱ्या कक्षात लसीकरण करण्यात येईल, लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या कक्षात लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेऊन त्यानंतरच सोडण्यात येईल. यावेळी एखाद्या व्यक्तीस प्राथमिक उपकेंद्रातून जिल्हा रुग्णालयात हलवण्याची वेळ आल्यास १०८ रुग्णवाहिकेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्ह

ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांचा व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीमध्ये टाकण्यास विरोध ! नासिक::- केंद्रीय मार्ग व राज्यमार्गाची अधिसूचनेच्या ड्राफ्टमध्ये ट्रक्टर व ट्राॅली या वाहनांना गैरव्यावसायिक वाहन श्रेणीतून बाहेर करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आले याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रतन चावला यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.        ट्रक्टर व ट्राॅलीला सडक परीवहन विभाग किंवा एन एच ए आय च्या नियमावलीत संशोधन करून ट्रक्टर व ट्राॅलीला व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीत आणले तर टोल संकलन केंद्रावर यापुढे ट्रक्टर व ट्राॅलीला टोल भरावा लागेल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल तथापी राज्यात तथा देशात पुन्हा मोठे शेतकरी आंदोलन उभे राहिल. यावर समर्पक निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे आज देण्यात आले.

समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल जोग. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस 7387333801.

इमेज
समर्पित कार्यकर्ता हेच जनजाती कल्याणकारी उपक्रमांचे बळ -  अतुल जोग      नाशिक ( प्रतिनिधी ) जनजाति समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य "वनवासी कल्याण आश्रमाच्या" माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे बळ व गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. काल नाशिकमध्ये एका बैठकीसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी  संवाद साधला.        पत्रकार परिषदेत बोलतांना अतुल जोग म्हणाले ,संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला आहे, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क आहे.आज अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १ लाख ३८  हजारपेक्षा जास्त लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. यात क्रीडा केंद्रे,सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक

श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा ! निवेदनात नमूद केले कारण,,,,,,, नासिक::- श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन विशेष पोलिस महानिरीक्षक यांना देण्यात आले.       श्री श्री रविशंकर यांच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ (कार्टून फिल्म) अपलोड करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा अपमान होत आहे अशी भावना निवेदनात व्यक्त केली आहे.          निवेदनात औरंगाबाद खंडपीठातील एका प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचा कोणताही संबंध नाही असे नमूद करण्यात आले असून रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण करताना जे लिखाण केले व त्याचा व्हिडिओ (कार्टून फिल्म) बनविण्यात आला यातून समस्त शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्यामुळे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड चे नासिक महानगरप्रमुख हार्दिक निगळ, यांनी दिले, निवेदनावर योगेश पोटे, हर्षल पवार, प्रसाद गोसावी, आदित्य खरात, अभय खरात, शुभम ईतबारी, विनायक गोसावी, तसेच महाराष्ट्र जनस्वराज्य सेना तर्फे समाधान

विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ साहेब यांचा महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेकडून सत्कार व विविध विषयांवर चर्चा ! भागवत गायकवाड सुरगाणा यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,      नासिक (२)::- वनारे  ता. दिंडोरी येथे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ  यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना  सदस्यांनी भेट घेतली.  मंत्रालयातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी  केलेल्या मंत्रालयातील सहकार्याबद्दल त्यांचा भागवत धूम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामविकास सचिव यांच्याशी चर्चा करून एक प्रसिद्धी पत्रक लागू करावे जेणेकरून आदिवासी भागातील सर्व कर्मचारी बांधवाना एकस्तर योजनेचा लाभ मिळेल. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी मागील काही दिवसांपूर्वी राज्याध्यक्ष नितेश खांडेकर यांची जिल्हा सल्लागार भागवत धुम यांनी  घडवून आणलेली भेट व त्यानंतर झालेली चर्चा याविषयी आज झिरवाळ यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे "जुनी पेन्शन योजना, मी अजित पवार यांना याविषयी बोललो आहे, लवकरच आपण त्यांच्याबरोबर वर

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक "हरित शपथ" ! नववर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत  जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिक "हरित शपथ " ! नववर्षानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प नाशिक : "माझी वसुंधरा" या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामुहिक हरित शपथ घेत पर्यावरण संवर्धनासाठी व्यक्तिगत स्तरावर कृतिशील प्रयत्न करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात सकाळी सर्व कर्मचारी एकत्र येत जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी "माझी वसुंधरा" अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना "हरित शपथ" दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी याप्रसंगी सर्व कर्मचा-यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देत येत्या वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिने प्रयत्न करण्याचे आवाहन केले,

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ  कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी  राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार.        नाशिक ::-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी .केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल असे मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांच्या बाबत शासन   सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत बोलतांना डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.      राज्यातील हा समाज आर्थिक ,सामजिक दृष्टीने मागासलेला असून तो  गावखेड्यात राहतो.  त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरुन सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी डॉ. कदम म्हणाले. तसेच  क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योज

रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सुरेश भोर यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,    नाशिक::-तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फणसपाडा गावास  १००वर्षापुर्वीपासून दळणवळणाच्या दुष्टीने जोडणारा मुख्य व महत्त्वाचा रस्ता येथील काही नागरिकांनी उखडून फेकल्यानेआता संपर्कच तुटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.       याबाबत ची माहिती अशी की तालुकच्या पश्चिम पट्टयातील आदिवासी व दुर्गम भागातील फणसपाडा ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून तालुका प्रशासनाकडे मजबूत व हक्काच्या रस्त्यासाठी मागणी करून पाठपुरावा करत आहेत.व याबाबत तहसिलदार अनिल दौंडे यांनी कार्यवाही ही सुरू केली आहे. मात्र आता यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूकीत व्यस्त असल्याचा फायदा घेऊन काही मोजक्याच नागरिकांनी रस्ता उखडून फेकून पुर्ण गावास वेठीस धरले आहे. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. व तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे .अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व व्यक्त केली आहे.

Today's NEWS MASALA ISSUE,. संपादकीय. कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचा,. विशेष-मोफत जाहिरात, मोफत जाहिरात ! जाणण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !

इमेज
संपादकीय कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! नरेंद्र पाटील, संपादक- न्यूज मसाला       जगाने अर्थात मानवजातीने धर्म प्रांत भौगोलिक विविधता या बाबींवर लक्ष केंद्रित न करता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे.,,,,,,,,,,,,,,,,,,,          भ्रष्ट, व्यभिचारी यांना त्यांचे पोट भरत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेने वाट पहाणे धोकादायक आहे, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अतिजल्लोषात आणखी मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा, ब्रिटनमधून कोरोनाचं नवीन बाळ (ट्रेन) अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे !,,,,,,,,,,,,,,,,,,,,       

घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक असं म्हणतात की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी बालपणापासून लेखन दिग्दर्शन अभिनयाची आवड असलेल्या विजय जाधव यांनी स्वतः ला सिध्द करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक प्रसंगाला सामोरे जात आत्मविश्वासाने दर्जेदार लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कार्याची लघुपट चित्रपट महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विजय रामप्रसाद जाधव हे मूळचे हिंगोली जिल्हातील काळकोंडी येथील असून सध्या नाशिक मध्ये स्थायिक आहेत. त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. पण मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. ११९१ मध्ये जाधव यांचे वडील गवंडी कामानिमित्त कुटुंबासह नाशिकमध्ये आले. मुलांच्या शिक्षणाची  जबाबदारी आल्याने जाधव यांचे वडील परत गावाकडे आलेत. जाधव यांचे पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण गावी झाले. आठ