पोस्ट्स

संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा हिरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा हिरे         नाशिक येते २६ ते २८ मार्च रोजी होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जी काही मदत लागेल ती व्यक्तीशः व भारतीय जनता पार्टीचे तिनही  आमदार, नासिक मनपा महापौर करण्यास कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिक दृष्टया नाही, तर स्वतः हजर राहून हे संमेलन यशस्वी करू, असे प्रतिपादन नाशिक पश्र्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केले.            मराठी साहित्य संमेलनाच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सोमवारी (ता. ८) रोजी बैठक झाली. यावेळी त्यांनी संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या १० लाखाच्या निधीचे पत्र लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनिल भालेराव, महेश हिरे, विश्वास ठाकूर यांच्यासह लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.             गिरीश पालवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे. जी काही मदत लागेल ती भाजपा

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध ! किती शुल्क व बॅंक खाते क्रमांक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!  

इमेज
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध       नासिक::-९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान नाशिकला होत आहे. त्या साठीचे प्रतिनिधि शुल्क (रु. ३०००/- ), स्वागत समिती सदस्य शुल्क   (रु. ५०००/- व अधिक), ग्रंथ प्रदर्शन स्टॉल बुकिंग शुल्क  (रु. ६५००/- ), आणि इतर तत्सम शुल्क संबंधीतांना  ऑनलाइनपद्धतीने  संमेलनाच्या बँक खात्यात भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.         ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीचा तपशील खालील प्रमाणे आहे.  नांव:- 94 ABMSS LOKHITWADI MANDAL NASHIK खाते क्रमांक::- 077100100000005 बॅंक::-The Nashik Merchants Co-op Bank Ltd. College Road Branch,  IFSC : NMCB0000078           ऑनलाइन पद्धतीने शुल्क  भरतांना पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सादर माहिती आणि भरलेली रक्कम, UTR  NO. अथवा REF. NO. अथवा स्क्रीन शॉट सह ९४२२९४५०५३ या वॉट्स ऍप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत दीक्षित यांनी केले आहे.  या बाबत अथवा  ९४

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष र. ग. कर्णिक यांचे निधन !!

इमेज
र. ग. कर्णिक यांचे निधन अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे माजी निमंत्रक, लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदय स्थान असलेले र. ग. कर्णिक यांचे आज दुख:द निधन झाले.  अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात प्रखरपणे प्रकाश देणारा नभातील लखलखनारा तारा आज निखळला आहे. कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ विसावली...... लोकप्रिय कामगार कर्मचारी नेते र.ग.कर्णिक निवर्तले.... रमाकांत गणेश अर्थात र. ग.कर्णिक यांचा जन्म २७ जानेवारी, इ.स. १९२९ मध्ये झाला.       पुढे १९४८ साली सचिवालयात नोकरी करू लागल्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी समजू लागल्या. तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यामुळे कर्मचाऱ्यांची झालेली ससेहोलपट त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी काही सहकाऱ्यांना एकत्र करून १९५८ साली सेक्रेटरिएट ॲंड अलाईड ऑफिसेस स्टाफ असोशिएशन (मंत्रालय) या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांचीच निवड झ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ! बोध नाहीच, चिन्ह कशाचे ? संमेलनापूर्वीच वादविवादांची नांदी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
बोध नाहीच ; चिन्ह कशाचे ?    साहित्य संमेलन आणि वादविवाद हे अलीकडच्या काळात समीकरणच झाले आहे. नाशिकमध्ये मार्च महिन्यात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची अध्यक्ष निवडप्रक्रिया कोणत्याही वादाविना सुरळीत पार पडली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि ख्यातकीर्त विज्ञानलेखक डॉ.जयंत नारळीकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचे बव्हंशी सर्व स्तरांतून स्वागतच झाले. मात्र वादाची पहिली ठिणगी पडली ती बोधचिन्ह निवडीने. बोधचिन्ह व घोषवाक्यातील अशुद्ध लेखनाने साहित्य महामंडळाच्या कारभारावर टीकेची सरबत्ती सुरु झाली. बोधचिन्हाची स्पर्धा घाईघाईने उरकण्यात आली. त्याला फारशी प्रसिद्धी देण्यात आली नाही त्यामुळे प्रतिसादही मिळाला नाही. मोजक्या ५३ प्रवेशिकांंमधून निवडलेल्या बोधचिन्हातून 'बोध' तर होतच नाही ; मग हे 'चिन्ह' कशाचे म्हणावे असा प्रश्न उपस्थित होतो!    तसे बघता चित्रे, छायाचित्रे बोलकी असतात. त्यात हजार शब्दांची ताकद सामावलेली असते. तोच वारसा सांगणारे बोधचिन्ह हे सुस्पष्ट, सुसंगत व नेमका बोध घडविणारे असले पाहिजे,नव्हे तीच बोधचिन्हाची प्राथमिक अट असते

माध्यमिक शिक्षणाधिकारी झनकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या कडे धुळे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार !! नासिक:- माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या कडे धुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारण्याचे निर्देश ! धुळे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे पदोन्नतीने विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ मुंबई या पदावर पदस्थापना झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर अतिरिक्त कार्यभार नासिक विभागातील अन्य अधिकाऱ्याकडे देण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे केली होती. यानुसार नासिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार तत्काळ स्विकारण्याचा व तसा अहवाल शासनास व आयुक्त कार्यालयात सादर करण्यात यावा असे निर्देश शिक्षण आयुक्त, पुणे यांनी दिले आहेत.

सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. चर्चेअंती लेखणी बंद आंदोलन मागे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबध्द- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ----------------------------------- सामाजिक न्यायासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ जानेवारी २१ रोजी समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क, महाराष्ट्र राज्य पुणे यांची बैठक झाली. सदर बैठकीत प्रधान सचिव शाम तागडे व डॉ प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज  कल्याण म. रा. पुणे हे उपस्थित होते. यावेळी कर्मचारी संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेत असताना मुंडे यांनी सांगितले की, संघटनेच्या रास्त मागण्यासांठी सामाजिक न्याय विभाग हा संघटनेच्या पाठिशी आहे, परंतू कामाच्या कार्यक्षमतेबाबत (work accountability) कोणतीही तडजोड केली जाणार नाही.  सामाजिक न्याय विभागामध्ये शिस्तप्रिय पध्दतीने चाललेले कामकाज कौतुकास्पद असून सदर कामाकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचा-याने स्वत:ची कौशल्य व कार्यक्षमता वाढवून प्रत्येक नागरिक व लाभार्थ्याला न्याय देणे आवश्यक आहे. रिक्त पद, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे त्यामुळे ज्यावेळेस पद भरण्याचे

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान ------------------ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई दि २९ : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी या संमेलनाच्या आयोजनास आपल्या शुभेच्छाही दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच स

बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
बॉक्सर अंजली व श्रीहरी यांचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव !         नाशिक, दि.२४ जानेवारी :- महाराष्ट्र राज्याचा सन २०२० चा क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज बॉक्सर अंजली मोरे व श्रीहरी मोरे या बंधू व भगिणीचे आज नाशिक येथील कार्यालयात सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ तसेच मोरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.       बॉक्सिंग खेळाडू अंजली मोरे आणि श्रीहरी मोरे हे दोघेही विश्वविख्यात बॉक्सर मेरी कोम यांचेकडे गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. अंजली मोरे हिने आतापर्यंत २७ सुवर्णपदक तर श्रीहरी २५ सुवर्णपदक पटकावले असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२० सालचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अथर्व वैरागकर, अथर्व वारे यांना मानाचा जोशी स्मृती पुरस्कार जाहीर        नाशिक ( प्रतिनिधी ):- भूपाली क्रिएटिव्हज या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे दरवर्षी दिनरंग संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये नाशिक परिसरातील होतकरु, उदयोन्मुख युवा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी पं.            गजाननबुवा जोशी पुरस्कार अथर्व ओंकार वैरागकर या युवा शास्त्रीय गायकाला तर पं. नारायणबुवा जोशी पुरस्कार युवा तबलावादक अथर्व नितीन वारे यांना काल ( दि.२३ ) जाहीर करण्यात आले. स्व. पं. दिनकर कैकिणी यांच्या स्मरणार्थ दिनरंग स्मृती महोत्सव लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी हे दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. दोघांनाही घरुन सांगीतिक वारसा लाभला असून ते नेटाने तो पुढे नेत आहेत. भूपाली क्रिएटिव्हजचे प्रमुख संदीप आपटे यांनी अशी माहिती दिली. या संगीत महोत्सवात नाशिककर रसिकांना दमदार कलाकारांच्या कलेचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल !!! ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दिली फिर्याद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.                नासिक::-कोरोना साथरोग लॉकडाऊन काळात करंजवण (दिंडोरी) येथे घराच्या पडवीत बालविवाह संपन्न झाला होता. अल्पवयीन मुलगी आणि तिची आई रा.लखमापुर फाटा, मुळगाव जळगाव यांनी करंजवण येथे एका घराचे पडवीत दि. २ मे २०२० रोजी अल्पवयीन मुलगी हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह घोटी ता. इगतपुरी येथील तरुणाचा चोरून संपन्न झाल्याने करंजवन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी दि. २२ जानेवारी २०२१ रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी आरोपी, आरोपीचे आई-वडील, बहीण व अल्पवयीन मुलीची आई यांचे विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९ , १० , ११ ( १ ), भारतीय दंड संहिता १९६० चे  कलम १८८ , २६९ , २७० , २७१ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.         सदरचा प्रकार ज्यांच्या घराच्या पडवीत विवाह संपन्न झाला होता ते मयत झाल्याने त्यांच्या विधीसाठी अल्पवयीन मुलगी व मुलाचे स्वकीय करंजवन  येथे २४ नोव्हेंबर २०२० रोजी आले असता, पहाटे गरम पाण्याचा ड्रम सांडल्याने