पोस्ट्स

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी पुरस्कार्थी ! श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व ! शब्दांकन- जी.पी.खैरनार सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 ******************************* श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व !      महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांची घोषणा केली. या पुरस्कारार्थी मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले श्री. अंबादास पाटील यांचा समावेश आहे .   श्री.अंबादास पाटील यांचे मुळ गांव हे सिन्नर तालुक्यातील देवपुर हे होय. अंबादास पाटलांचा जन्म हा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती मातीशी असलेली घट्ट नाळ व ग्रामीण भागातील कष्टकऱ्या विषयी असलेली प्रेम भावना त्यांच्या हृदयात ओतपोत भरलेली आहे.   श्रीमान अंबादास पाटील यांची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांना आई वडिलां बरोबर शेती काम करणे हे नियतीने आलेच. सिन्नर तालुक्यातील देवपुर गावाची ओळख ही माजी आमदार व मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे प्रणेते स्व. सूर्यभान (नाना) गडाख यांचे गाव म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात परिचित आहे. आदरणीय सूर्यभान गडाख यांच्या भावकीत जन्म घेतलेल्या

साईबाबांवर २० वर्षानंतर पुन्हा नवी टेलिव्हिजन मालिका १५ मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 *********************************** मराठी भाषेत साईबाबांवर २० वर्षानंतर पुन्हा नवी टेलिव्हिजन मालिका १५ मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर!                श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री साईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे. साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी" ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. या निमित्तानं जवळपास २० वर्षांनी टेलिव्हिजनवर साईबाबांची मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १५ मार्च सोमवारपासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. साईबाबा हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्व जाती धर्म पंथातील लोकांचे श्रद्धास्थान आहेत. गेल्या २० वर्षात त्य

यशवंत पंचायत राज अभियान : जिल्ह्यातील पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, ७३८७३३३८०१ ********************************* यशवंत पंचायत राज अभियान : जिल्ह्यातील नाशिक व कळवण पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागात द्वितीय व तृतीय पुरस्कार          नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली. याअंतर्गत नाशिक विभागात नाशिक पंचायत समितीने विभागात द्वितीय (जि. नाशिक) तर कळवण पंचायत समितीने अनुक्रमे तृतीय (जि. नाशिक) क्रमांकाचे पुरस्कार पटकावले, कळवण पंचायत समितीने सलग तिस-यांदा पुरस्कार मिळवला आहे, केंद्र व राज्य शासनाकडुन गट स्तरावर राबविल्या जाणा-या योजना त्याच बरोबर उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज याचे मुल्यमापन विभागस्तरावर करण्यात येऊन अखेर ३ पंचायत समित्यांची निवड ही विभाग निहाय करण्यात येते. नाशिक व कळवण या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सोलर पॅनलिंगचा वापर करुन उर्जेची बचत, स्वच्छ भारत मिशनची अमलबजावणी, वृक्षलागवडीची १०० टक्के उद्दीष्टपूर्ती, संपुर्ण लसीकरणाची उद्दीष्टपूर्ती यासह इतर सर्व योजना व कार्यालय

एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा संशयाच्या भोवऱ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 *********************************** एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा संशयाच्या भोवऱ्यात ! नासिक (प्रतिनिधी)::-एन डी एस टी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि २१ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असे कार्यकारी मंडळाने जाहीर केले आहे पण त्या सभेविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने ही सभाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संस्थेचे ११ हजाराहून अधिक सभासद आहेत, ऑनलाईन सभेत यापैकी किती सभासदांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार हा प्रश्न आहे, उपविधी दुरुस्तीचा कोणता बदल करण्यात येतोय हे कुणालाच माहीत नाही, कोणते फर्निचर निर्लेखन करण्यात येत आहे त्याचा तपशील गुलदस्त्यात आहे, दोष दुरुस्ती अहवाल सभासदांना बघायलाच मिळालेला नाही, मग त्यावर समर्थन देणे वा आक्षेप नोंदवणार कसा? सटाणा शाखेची खरेदी किंमत माहीत नाही, अवाढव्य खरेदीमुळे कर्ज मागणी अर्ज पडून आहेत, विमा हप्ता दरमाणसी किती हे कळायला मार्ग नाही. एजीएम च्या नियमानुसार सर्व सभासदांना वार्षिक अहवाल एक महिना आधी देणे कायदेशीर बंधनकारक असतांना त्याला फाटा देणे संशयास्पद आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभा

महीलादिनीच "अडलेल्या" महीलेची उपजिल्हा रुग्णालयाकडून हेळसांड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 ********************************** महीलादिनीच "अडलेल्या" महीलेची उपजिल्हा रुग्णालयाकडून हेळसांड ! नासिक( नरेंद्र पाटील ):: -त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या उप जिल्हा रूग्णालयात महीलादिनीच गर्भवती महिलेला दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले. यासह तिच्याकडे दुर्लक्ष करत प्रसूती न करता सात तासानंतर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात  पाठवण्यात आले. महिलादिनीच गरिब आदिवासी महिलेची हेळसांड झाली असल्याने संबंधित आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी आम. हिरामण खोसकर यांच्याकडे केली आहे. सोमवारी ( दि. ८ ) रोजी सकाळी ११ वाजता प्रसूतीसाठी आलेली आदिवासी महीला त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. सहा-सात तासांच्या विलंबाने आमच्याकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. तेथे उपस्थित असलेले एकमेव डाॅक्टरांनी कोणतेही उपचार न करता सदर महीलेला नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या. प्रत्यक्षात रूग्णवाहीका रात्री ८ वाजता आली. नाशिक येथे पाठविण्यात आल्यानंतर तिची नॉर्मल प्रसूती झाली. त्र्य

नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला सर्विसेस,  संपर्क-7387333801 ______________________________________ नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील नाशिक ( प्रतिनिधी ) घर, संसार सांभाळून अनेक महिला कलानिर्मितीचा छंद जोपासतात. त्यांनी आपल्या कलेचे मूल्य जाणून घेतले पाहिजे. देसी हाट या संकल्पनेतून नाशिकच्या अनेक कलाकारांची अप्रतिम हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर नक्कीच पोहोचेल.मात्र त्यासाठी मोठी स्वप्ने बघणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गुंतवणूक सल्लागार मंदाकिनी पाटील यांनी केले.     आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने काल ( दि.८) देसी हाट या वर्षभर सुरू रहाणाऱ्या कलाउत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मोजक्या कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कॅनडा कॉर्नरजवळच्या हेरंब रेसीडेन्सीत आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या मंदाकिनी पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. बिना रावत यांच्या हस्ते केक कापून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ओमप्रकाश रावत यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, अनेक महिला,पुरुष अंगभूत कलेचा वापर करून सुंदर कलानिर्मिती करतात. त्यांच्या कलाक

सावधान, सावधान ! कोणता नवीन नियम लागू होणार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सावधान ! परदेशात जायचे आहे ? तर आता ही काळजी घ्यावी लागेल ! कोव्हिड-१९ महामारीतून जग सावरायचे नांव घेत नाही, प्रत्येक देशात मंथनाच्या फैरी झडत आहेत, वेगवेगळ्या नियमावली तयार होत आहेत, आपणही परदेशात नोकरीसाठी, फिरण्यासाठी जाणार असाल तर फक्त पासपोर्ट, वीजा पूर्णतः उपयोगाचा नाही, त्याच्या जोडीला एक नवीन पासपोर्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. "कोव्हिड वॅक्सीनेशन पासपोर्ट" नावाचा नवीन पासपोर्ट लागू झाला तर आश्र्चर्य वाटू देऊ नका, युरोपियन देशांनी असा पासपोर्ट सक्तीचा करण्यासाठी तयारी सुरू केली तर ? यासाठी फक्त कोव्हिड लस टोचून घेतली आहे असं समजून घेणं मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशा नियमांचा अवलंब एखाद्या देशाने सुरू केला तर आपल्या जवळ कोव्हिड लस टोचून घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे व सोबत बाळगावे लागेल. याची सुरूवात युरोपियन देशांमधून लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत, यासाठी नागरिकांनी तितकेच सतर्क राहायला हवे असे वाटते. आपण भारतीय याबाबत नशीबवान आहात असेच म्हणावे लागेल कारण जगात भारत एकमेव असा देश आहे की एकाच वेळी तीन कंपन्या लस बनवित आहेत व पुरवठाही करत आहेत, आपला पासपोर्ट वीजा

खरंच महिला "अबला" आहेत का  ?  ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करताना हेच अपेक्षित आहे- दिलीप देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेला विशेष लेख !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
||  खरंच महिला "अबला" आहेत का  ?  || स्त्रियांना अबला संबोधून दुय्यम स्थान दिले जाते. खरच ती अबला आहे का? परवा परवाच महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुका झाल्यात.खूप महिला निवडून आल्यात.खरतर त्यात अनेक सक्षम महिला आहेत.पण सत्तेचे केन्द्र आपल्या  कडेच रहावे ह्या  प्रयत्नात स्त्रियांना बाजूला सारून देता पुरुष मंडळी . आणि स्त्रियांना सबला,सक्षम, करण्याच्या गोष्टी करतात.                   खडकी.ता.दौंड.जि.पुणे.इथे सरपंच म्हणून निवडून आलेली एकवीस वर्षाची तरुणी स्नेहल काळभोर ,हिची प्रतिक्रिया बोलकी आहे.आपल्याकडे सक्षमता आहे.मला महिला आणि सगळ्यां साठी काम करायच आहे.विविध आरोग्य- शिक्षण,योजना आणायच्या आहे.बचत गटाचे काम करायचे आहे.आदर्श गाव निर्माण करायचा आहे.निवडून आलेल्या महिला सदस्यांना मी सांगितले आहे.काम आपल्याला करायचे आहे.कामकाजात,निर्णयात,नातेवाईकांना येण्यास परवानगी  नाही. मार्गदर्शन घेऊ. महिलादिवस साजरा करतांना हेच अपेक्षित आहे.              ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो..वर्षभरात ज्या कोणी महिलांनी, शिक्षण,कला,क्र

अकरा शतकांच्या परंपरेचे समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व ! रिनाचे योगदान बघता तिची शिफारस पुढील वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी होणे उचित ठरेल ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अकरा शतकांच्या परंपरेचे समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व !      आदिवासी वारली जमातीच्या लोकजीवनाचे, संस्कृतीचे व धार्मिक चालीरीतींचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रशैलीत उमटलेले दिसते.११०० वर्षांची ही परंपरा मुख्यत्वे महिलांनीच जोपासली, वृद्धिंगत केली. सुमारे ५० वर्षांपूर्वी दुर्गम पाड्यांवरचे हे कलावैभव शहरी रसिकांसमोर आले. एकेकाळी महिलांची मक्तेदारी असणाऱ्या या कलेत सध्या पुरुषी वर्चस्व निर्माण झालेले जाणवते. आता मोजक्याच महिला वारली चित्रे रंगवताना दिसतात. हा सांस्कृतिक वारसा हिरीरीने पुढे नेणारी रीना उंबरसाडा - वळवी ही अकरा शतकांच्या परंपरेचे समृद्ध, सर्जक प्रतिनिधित्व करते. तब्बल चार वेळा ती फ्रान्सला जाऊन आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तिचा हा अनोखा कलाप्रवास...     छोट्या रीनाची आई जमनीबाई लग्नप्रसंगी वधूवरांच्या झोपडीच्या भिंतीवर लगनचौक लिहायची. हे रेखाटन उत्सुकतेने बघणारी रीना या कलेचा उपजत वारसा लाभल्यामुळे त्यात रमायची. शाळेत असताना हौसेने शुभेच्छापत्रांवर वारली चित्रे रेखाटायची. त्याचे कौतुक व्हायचे. पुढे दहावी उत्तीर्ण झाल्यावर व्यवसायाने वकील असणाऱ्या असूंता पारधी यांन

निसर्गाचं गाणं, लोकसंस्कृतीचं लेणं ! निसर्ग व लोकसंस्कृतीप्रेमींसाठी खास लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
निसर्गाचं गाणं ; लोकसंस्कृतीचं लेणं !    दुर्गम भागात वस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जमाती भारतात आहेत. त्यांना मूलवासी किंवा आदिवासी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, नंदुरबार, तसेच विदर्भातील काही भाग आदिवासी बहुल आहे. शेजारच्या डांग भागातही आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, कातकरी, गोंड, कोरकू, भिल्ल या जमातींचा समावेश होतो. त्यांच्या जीवनशैलीवर जसा निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच तो त्यांची लोकगीते, लोककथांवरही आहे. सूर्यचंद्र, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडंझुडपं, सभोवतालचा परिसर यांचं वर्णन आणि गुणगान त्यात आढळतं. ते त्यांच्या लोकसंस्कृतीचंच कलारूप आविष्करण आहे. वारली चित्रशैलीत तर ते अधिक नितळपणे प्रतिबिंबित होतं. सध्या वसंत ऋतूत जणू सारी सृष्टीचं गाणं गात असते.     ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीला बऱ्याचदा लोककथांंचा  आधार असतो. लोकगीतांमधील लय, ताल व विचार चित्रांमध्ये प्रकट होतो. लोकसंस्कृतीची रसरशीत भावानुभूती त्यातून मिळते.आदिवासी वारली जमातीतील कलाकार, विशेषतः स्त्रिया आपल्या झोपडीच्या भिंती चित्रांनी सजवतात.