पोस्ट्स

प्रशासनाची ताकद संजय राऊतांना कळली ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
प्रशासनाची ताकद संजय राऊतांना कळली ! शुक्रवारी दिल्लीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या देताना सहजरीत्या सत्तेत जाऊन बसलेल्यांनी अनुभवाने तरी शहाणं व्हायला हवे होते असे सांगत , "खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान अधिकारी कधीही दाबू शकतात !".      या वाक्याचे प्रशासनानेही अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे की नाही ? प्रशासनाची ताकद की हतबलता, चोरी की राजकारणावरील वचक ? काहीही असो, हल्ली जे प्रकरण सुरू आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात लवंगी फटाके किंवा मोठे फटाके फुटोत हे नंतर येणाऱ्या आवाजावरून कळतील, तुर्तास संजय राऊत यांच्या वाक्याने प्रशासनाची "ताकद" काय असते ते अधोरेखित होते, प्रशासनाची "ताकद" जशी वापरली जाईल ती योग्य की अतिरेकी हा प्रश्न नाही. प्रशासन आणि राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या कधीही एकत्र, एका बाजूला नसतात, परंतू त्यांच्या निर्णयाने तेच नाणे जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरात येते. याच नाण्यासाठी हा सर्व उपद्व्याप घडला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थांबवून की सत्तेवर प्रभूत्व मिळव

होळी- होलूबायला सिनगार केला कयाचा गं....... अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 *********************************** अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती !   आदिवासी वारली जमात निसर्गस्नेही आणि पर्यावरणरक्षक आहे. परंपराप्रिय वारली स्त्रीपुरुष सण - उत्सवात मनापासून रमतात. त्यांच्यासाठी होळीचा सण दिवाळीपेक्षाही मोठा आहे. माघ पौर्णिमेपासून त्यांच्या होलिकोत्सवाला प्रारंभ होतो. फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण पाड्याची एक सामूहिक होळी साजरी केली जाते. पंचमीपर्यन्त चालणाऱ्या या शिमग्यात धुळवडही उत्साहात होते. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंगानी रंगवतात. चेष्टामस्करीसाठी अगदी स्त्रीवेषापासून ते पोलिसापर्यंत विविध सोंगे वठवली जातात. याच अग्निपूजन परंपरेच्या अभिव्यक्तीचे सुंदर चित्रण वारली कलेतही दिसते.      वारली पाड्यांवर माघ पौर्णिमेला होलिकोत्सव सुरु होतो. महिनाभर दररोज संध्याकाळी लहानशी होळी पेटवतात. यावेळी हवेत गारवाही असतो. फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी सार्वत्रिक मोठी होळी पेटवली जाते. दुपारीच जंगलातून चिंबी म्हणजे हिरवा बांबू आणून पाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमिनीत रोवतात. काही भागात शिरीष वृक्षाचा सोटा वापरण्याची प्रथा आहे. होळीच

नासा यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न !! मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे साहित्य- नागेश शेवाळकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासा यांचे साहित्य वाचकांचे मनोरंजनासोबत प्रबोधनही करते -  नागेश सू. शेवाळकर नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न        नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येवती येथील प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी आणि कथाकार नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर होते.             ई साहित्य प्रतिष्ठान कडून नासा येवतीकर लिखित जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यांचे हे दहावे ई बुक होते तर तिसरे कथासंग्रह होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर हे होते तर प्रमुख उदघाटक म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. हनुमंत भोपाळे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत, पक्षिमित्र तथा साहित्यिक सुंदरसिंग साबळे आणि उपक्रमशील शिक्षिका व लेखिका सौ. रुपाली गोजवडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या ऑनलाईन ई बु

एकलव्याची वृत्ती , जिद्दीतून कलाकृती ! काश्चुम डिझायनर गंधाली धोंगडे यांचा कोरोना काळातील कलेचा प्रवास !! लेख सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
NEWS MASALA SERVICES, NASHIK,      7387333801 **************************************** एकलव्याची वृत्ती , जिद्दीतून कलाकृती !      चित्रकलेचे शास्त्रशुद्ध उच्चशिक्षण सगळ्यांनाच घेता येत नाही.असे असले तरीही अनेकजण आपल्यातील अंगभूत सुप्त कलागुणांचा विकास एकलव्याच्या वृत्तीने करतात. रूढार्थाने गुरु लाभलेले नसतानाही, सातत्याने केवळ निरीक्षण, सराव करुन पारंगत होतात व यशाचे शिखर गाठतात. विदर्भातील अकोल्याच्या गंधाली धोंगडे यांनी अशीच वाटचाल करीत जिद्दीने कलाक्षेत्रात ठसा उमटवला आहे. व्यवसायाने त्या कॉश्च्युम डिझाईनर आहेत. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास करुन त्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना त्या गुरुस्थानी मानतात. त्यांची चित्रे बघून प्रेरणा मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात.    कोरोनाच्या आकस्मिक संकटाने सारे जग स्तब्ध झाले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्वांना अचानक लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घरात अडकून पडले. गंधाली यांनी या परिस्थितीत न डगमगता, ती इष्टाप

आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सामाजिक सभागृह कामाचे भूमिपूजन ! विनामोबदला जागा उपलब्ध करून देणाऱ्याचा आमदारांनी केला सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पिंपळनेर (साक्री)::- ग्रामपंचायत मळगाव (प्र ) वार्सा अंतर्गत डोंगरपाडा येथे आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत, सामाजिक सभागृह कामाचे भूमिपूजन साक्री तालुक्याच्या आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते पार पडले.      सदर कार्यक्रमाला प. स.सदस्य. शांताराम दादा कुवर, सागर गावित, सरपंच किरण बागुल,  उपसरपंच रमेश साबळे, दरेगाव ग्रामपंचायतीचे गटनेते विक्रम भोये, ग्रामसेवक रतिलाल पवार, ग्रामपंचायत सदस्य देवजी मावची, पोलीस पाटील विलास गांगुर्डे, माजी सरपंच वसंत कुवर, छोटुदादा कुवर, पांडू राऊत तसेच  पंचक्रोशीतील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.       सदर कार्यक्रमात सामाजिक सभागृहासाठी सामाजिक बांधिलकी जपून, विनामोबदला  जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डोंगर पाडा येथील ज्येष्ठ नागरिक सापट दादा गांगुर्डे  यांचा सत्कार आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी पुरस्कार्थी ! श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व ! शब्दांकन- जी.पी.खैरनार सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 ******************************* श्रीमान अंबादास पाटील एक गुणवंत, प्रामाणिक व कृतीशील व्यक्तिमत्व !      महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांची घोषणा केली. या पुरस्कारार्थी मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहाय्यक म्हणुन कार्यरत असलेले श्री. अंबादास पाटील यांचा समावेश आहे .   श्री.अंबादास पाटील यांचे मुळ गांव हे सिन्नर तालुक्यातील देवपुर हे होय. अंबादास पाटलांचा जन्म हा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती मातीशी असलेली घट्ट नाळ व ग्रामीण भागातील कष्टकऱ्या विषयी असलेली प्रेम भावना त्यांच्या हृदयात ओतपोत भरलेली आहे.   श्रीमान अंबादास पाटील यांची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांना आई वडिलां बरोबर शेती काम करणे हे नियतीने आलेच. सिन्नर तालुक्यातील देवपुर गावाची ओळख ही माजी आमदार व मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे प्रणेते स्व. सूर्यभान (नाना) गडाख यांचे गाव म्हणुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात परिचित आहे. आदरणीय सूर्यभान गडाख यांच्या भावकीत जन्म घेतलेल्या

साईबाबांवर २० वर्षानंतर पुन्हा नवी टेलिव्हिजन मालिका १५ मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 *********************************** मराठी भाषेत साईबाबांवर २० वर्षानंतर पुन्हा नवी टेलिव्हिजन मालिका १५ मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर!                श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री साईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे. साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी" ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. या निमित्तानं जवळपास २० वर्षांनी टेलिव्हिजनवर साईबाबांची मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १५ मार्च सोमवारपासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. साईबाबा हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील सर्व जाती धर्म पंथातील लोकांचे श्रद्धास्थान आहेत. गेल्या २० वर्षात त्य