पोस्ट्स

निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार ! वारली चित्रशैलीतील रामकथा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार !    चित्र, संगीत आणि नृत्य या कला आदिवासी लोकजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्या दैनंदिन वापराच्या साध्या साध्या वस्तूंनाही कलेचा परिसस्पर्श झालेला दिसतो. आवश्यक तितकंच तांत्रिक कौशल्य वापरून निसर्गपुत्रांनी केलेला सुगम कलाविष्कार हा आदिवासी कलेचा प्राण आहे. वारली चित्रे सहजपणे संवाद साधतात म्हणून ती सुगम आहेत. वारल्यांना त्यांच्या कलानिर्मितीची प्रेरणा निसर्गाकडून मिळते. त्यांचे माध्यम निसर्ग व आविष्कारही निसर्गच आहे. निसर्गाकडून घेऊन निसर्गालाच अर्पण करणे हे वारली जमातीचे जीवनसूत्र आहे. परिसराशी सुसंवाद साधणारी निर्मिती हे वैशिष्ट्य त्यांच्या कलेत ठळकपणे जाणवते.     वारली ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. त्यांची एक वेगळी संस्कृती असून तिच्या परिघातच ते आनंदाने जगतात. त्यांचे जीवन खडतर, कष्टमय असले तरीही निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची कला फुलते. भारतीय नागरी सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीला आदिवासी कलांचं अधिष्ठान आहे. वारली जमात दुर्गम पाड्यांवर राहून सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करते. ११०० वर्ष

तिच्यातली 'ती' जुन्या रूढी परंपरा म्हणजे ! कीड समाजाला लागलेली !! पारतंत्र्याच्या ओझ्याखाली ! स्त्री मात्र राहिलीय दबलेली !! 'ती' म्हणजे जगातली बाई. लेखिका भारती सावंत यांचा पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
तिच्यातली 'ती'               जुन्या रूढी परंपरा म्हणजे               कीड समाजाला लागलेली               पारतंत्र्याच्या ओझ्याखाली               स्त्री मात्र राहिलीय दबलेली                            'ती' म्हणजे जगातली बाई . समाजाकडून गृहीत धरलेले असे पात्र. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यंत्राप्रमाणे अव्याहत काम करणारी आणि सर्वांच्या तोंडावरचा आनंद पाहून सुखी-समाधानी राहणारी स्त्री! जगाच्या कानाकोपऱ्यात आपणास आढळेल. अगदी ठार अडाणी असलेल्यां पासून ते लाखो रुपये कमावणारी स्त्री ही बाईच असते. तिची किंमत घरातच केली जात नाही, तर समाजाकडून काय अपेक्षा करायच्या !आज-काल सर्वांना साक्षर, चांगल्या पगाराची नोकरी करणारी, तरीही सुगरण आणि घरदार सांभाळणारी मुलगी हवी असते. मग अशी लाखाचे पॅकेज कमावणारी मुलगी नवऱ्याकडूनही तशीच अपेक्षा न करेल तरच नवल! म्हणजे गृहकृत्यदक्ष मुलीचा तिच्यासाठी शेरा हवा. मुलांना का नको? संसार दोघांचा ना! मग खस्ता बाईनेच का काढायच्या? घरातील काम, धुणी भांडी,ओट्यावरची आवराआवर करायची. ऑफिसमधून येताना भाजी तिनेच आणून सगळी झोपल्यानंतर तिनेच निवडत बसायचं.म

सृजनोत्सवी चित्रसृष्टी ! शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत,,,,,,,,,,,,. २९ मार्च पुपुल जयकर यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने,,,,,,,,,,,. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सृजनोत्सवी चित्रसृष्टी !    फाल्गुन पौर्णिमेनंतर, म्हणजे होळीपौर्णिमा झाल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. वसंतोत्सव हा निसर्गाप्रती तसंच समष्टीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सृजन सोहळा ! निसर्गात रममाण झालेल्या आदिवासी वारली जमातीच्या चित्रशैलीत बहारदार निसर्गाच्या विविधतेचे नेहमीच दर्शन होते. त्यांच्या कलानिर्मितीला वसंतऋतू पोषक ठरतो. म्हणूनच वारल्यांच्या चित्र, संगीत आणि नृत्यामध्ये निसर्ग विविध मोहक रूपं घेऊन सामोरा येतो.    शिशिरात सुस्त झालेली, गारठलेली सारी सृष्टी वसंताच्या स्पर्शाने रसरशीत होते. चैतन्याने बहरुन जाते. वसंतोत्सवाच्या या धुंदीत सृष्टीशी एकरुप होण्याची प्रेरणा आदिम आहे. वसंतऋतू येताना आपल्याबरोबर नवसृजनाचे सप्तरंग लेवून येतो. सर्वत्र विविधरंगी उधळण होते. सृष्टीतील प्रत्येक सूक्ष्म बदल टिपत असताना, आपण या सृष्टीचाच एक भाग आहोत हे भान आदिवासी बांधवांना जन्मजात असते. कारण ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून सृष्टीतील प्रत्येक घटकाशी  एकरूप झालेले असतात. मात्र निसर्गातील विविध प्रतिमा ते केवळ पांढऱ्या रंगात रंगवतात. अर्थात हे 'एकरंगी' बंधन त्

नांव सोनूबाई अन् हाती कथीलाचा वाळा याचप्रमाणे गांवाच्या नांवात विहीर अन् गांव सदा तहानलेलं अशा गावात मुंबई च्या अमास सेवा ग्रुपचा सेवाभावी उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  तहानलेल्या आदिवासी पाड्याला मदतीचा दिलासा         नाशिक ( प्रतिनिधी ) गावाच्या नावात विहीर असूनही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आदिवासी महिलांवर येते. पाण्याविना जीव झाला बेजार, सामाजिक बांधिलकीने दिला मोलाचा आधार असे चित्र नुकतेच बघायला मिळाले. पेठ तालुक्यातील घोटविहिर येथे अमास सेवा ग्रुप मुंबई व इतर समाजसेवी ग्रुप च्या मदतीने पाण्याचे ड्रम रोलर कोरोनाच्या नियमाचे पालन करुन वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक दिलीप आहिरे व सुरेश सूर्यवंशी यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे तहानलेल्या आदिवासींना दिलासा मिळाला.   घोटविहिरा हे गाव नेहमीच पाण्याचे भीषण दुष्काळी गाव आहे. या गावाला अमास सेवा ग्रुप मुंबई व पुष्य सेवा ग्रुप विलेपार्ले, सेवा समिती ग्रुप, गुंदेचा गार्डन लालबाग,मुंबई यांच्या वतीने हा मदतीचा हात देण्यात आला. गावातील महिलांना उन्हाळ्यात सुमारे ४ किमी अंतरावरुन पाणी आणावे लागते. अशा स्थितीत पाण्याचे ड्रम रोलर मिळाल्याने डोक्यावरचे ओझे कमरेवर आले अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. ड्रम वितरण प्रसंगी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या वेळी गावातील ग्रामस्थ  सुभाष चौधर

सन्मित्र प्रा. डॉ. सुनील देवधर व शाळासोबती प्रदीप मुळे ! एकाच दिवशी दोघांवर कोरोनाचा आघात !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सन्मित्र हरपला...    प्रतिभावान कवी, उत्स्फूर्त विडंबनकार, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, तळमळीचा कार्यकर्ता, आदर्श पती, प्रेमळ पिता अशी विविध रूपे एका व्यक्तीत एकवटलेली दिसणे विरळाच म्हणावे लागेल. प्रा.डॉ. सुनील देवधर हे अशांपैकी एक होते. कोरोनाच्या विळख्यात ते अडकले व अवघ्या तीन दिवसात काळाने आमच्या या सन्मित्राला हिरावून नेले. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. केवळ उक्तीपेक्षा त्यांच्या कृतीतूनच ते अधिक असायचे व दिसायचे.     नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात प्रा.डॉ. देवधर यांनी ३६ वर्षे अध्यापन केले. ते अकौंटन्सी विभाग प्रमुख म्हणून जानेवारी महिन्यात निवृत्त झाले. महाविद्यालयात त्यांनी एन.सी.सी.च्या एअर विंगचे प्रमुख म्हणूनही काम केले. छात्रसेनेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. हरहुन्नरी स्वभाव असल्याने ते जणु जगन्मित्रच झालेले होते. त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार जमवला होता.शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच सामाजिक उपक्रमांमध्येही ते हिरिरीने सहभागी होत.गोदाघाट स्वच्छता म

कोरोना संपणार ! मात्र आपण आता कसं वागावं हे आपल्यावरच अवलंबून आहे !! प्रसिद्ध लेखक अंकुश शिंगाडे यांच्या लेखणीतून पाप-पुण्याचा लेखाजोखा !!

इमेज
कोरोना संपणार!               कोरोना आला आणि सर्वांच्या मनात भीतीमय वातावरण निर्माण करीत वाटचाल करता झाला. त्यातच या कोरोनानं अनेकांचे बळी घेतले आणि तो घेतच आहे. तो चीनमधून आला असला तरी आजही अख्खं जग त्याच्यामुळं धास्तावलं आहे. तसा तो फारच आग ओकत असल्याचे दिसते.  कोरोनावर औषधी कंपनींनी औषधीही काढली आहे. पण कोरोना त्या औषधालाही घाबरायला खाली नाही. ज्याप्रमाणे आज आपण कोरोनावर औषध काढली. त्यालाच प्रतिबंध म्हणून कोरोनानं आपलं रूप बदलवलं व तो नवीन स्वरुपात खुलेआम वावरतो आहे. कोणाला न भीता. त्यामुळं तो न संपण्याची चिन्ह दिसत आहेत.           माणसे पाप करीत होते. कोणी कोणाला विनाकारण लुटत होते. कोणी कोणाचे गळे दाबत होते. कोणी बलत्कार करीत होते. कोणी कोणाच्या मालमत्ता दाबत होते. कोणी कोणाची जीवही घेत होते. महत्वाचं म्हणजे हे पाप करतांना माणसे नातेसंबंधही पाहात नव्हते. पाप करतांना माणसाला पुढला संभाव्य धोकाही दिसत नव्हता. तो आंधळा झाला होता. काही तर म्हणत होते. हे पापपुण्य म्हणजे काय? काहीही पाप नसतं. पुण्यही नसतं. आजही असे काही महाभाग पापच करीत आहेत. ते कोणाला घाबरत नाही. कारण त्यां

गृह विलगिकरणात असलेल्या कुटुंबियांच्या घरी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट ! झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांच्या बाबतीत ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक(प्रतिनिधी)::- नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिक तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जातेगाव ग्रामपंचायत तसेच संदीप फाउंडेशन येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला व विविध सूचना केल्या. नाशिक तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा  मार्गदर्शन करून हॉटस्पॉट क्षेत्र, कंटेन्मेंट क्षेत्र, टेस्टिंग संस्थात्मक विलगीकरण याबाबत सविस्तर सूचना दिल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत जातेगाव येथे भेट देऊन कंटेन्मेंट क्षेत्राची पाहणी केली तसेच गृह विलगीकरणात असलेल्या दोन रुग्णाच्या कुटुंबांना भेटी देऊन ते काळजी कशी घेतात, घरात स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का याची महिती घेतली. संस्थात्मक विलागिकरण करणेसाठी शाळेची पाहणी करून संबधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी लसीकरणाच्या मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला. ग्रामपंचायत महिरावणी य

प्रशासनाची ताकद संजय राऊतांना कळली ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
प्रशासनाची ताकद संजय राऊतांना कळली ! शुक्रवारी दिल्लीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या देताना सहजरीत्या सत्तेत जाऊन बसलेल्यांनी अनुभवाने तरी शहाणं व्हायला हवे होते असे सांगत , "खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान अधिकारी कधीही दाबू शकतात !".      या वाक्याचे प्रशासनानेही अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे की नाही ? प्रशासनाची ताकद की हतबलता, चोरी की राजकारणावरील वचक ? काहीही असो, हल्ली जे प्रकरण सुरू आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात लवंगी फटाके किंवा मोठे फटाके फुटोत हे नंतर येणाऱ्या आवाजावरून कळतील, तुर्तास संजय राऊत यांच्या वाक्याने प्रशासनाची "ताकद" काय असते ते अधोरेखित होते, प्रशासनाची "ताकद" जशी वापरली जाईल ती योग्य की अतिरेकी हा प्रश्न नाही. प्रशासन आणि राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या कधीही एकत्र, एका बाजूला नसतात, परंतू त्यांच्या निर्णयाने तेच नाणे जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरात येते. याच नाण्यासाठी हा सर्व उपद्व्याप घडला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थांबवून की सत्तेवर प्रभूत्व मिळव

होळी- होलूबायला सिनगार केला कयाचा गं....... अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801 *********************************** अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती !   आदिवासी वारली जमात निसर्गस्नेही आणि पर्यावरणरक्षक आहे. परंपराप्रिय वारली स्त्रीपुरुष सण - उत्सवात मनापासून रमतात. त्यांच्यासाठी होळीचा सण दिवाळीपेक्षाही मोठा आहे. माघ पौर्णिमेपासून त्यांच्या होलिकोत्सवाला प्रारंभ होतो. फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण पाड्याची एक सामूहिक होळी साजरी केली जाते. पंचमीपर्यन्त चालणाऱ्या या शिमग्यात धुळवडही उत्साहात होते. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंगानी रंगवतात. चेष्टामस्करीसाठी अगदी स्त्रीवेषापासून ते पोलिसापर्यंत विविध सोंगे वठवली जातात. याच अग्निपूजन परंपरेच्या अभिव्यक्तीचे सुंदर चित्रण वारली कलेतही दिसते.      वारली पाड्यांवर माघ पौर्णिमेला होलिकोत्सव सुरु होतो. महिनाभर दररोज संध्याकाळी लहानशी होळी पेटवतात. यावेळी हवेत गारवाही असतो. फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी सार्वत्रिक मोठी होळी पेटवली जाते. दुपारीच जंगलातून चिंबी म्हणजे हिरवा बांबू आणून पाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमिनीत रोवतात. काही भागात शिरीष वृक्षाचा सोटा वापरण्याची प्रथा आहे. होळीच

नासा यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न !! मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे साहित्य- नागेश शेवाळकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासा यांचे साहित्य वाचकांचे मनोरंजनासोबत प्रबोधनही करते -  नागेश सू. शेवाळकर नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न        नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येवती येथील प्रसिद्ध स्तंभलेखक, कवी आणि कथाकार नासा येवतीकर यांच्या जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर होते.             ई साहित्य प्रतिष्ठान कडून नासा येवतीकर लिखित जादूची पिशवी या ई कथासंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्यांचे हे दहावे ई बुक होते तर तिसरे कथासंग्रह होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विनोदी लेखक व जेष्ठ साहित्यिक नागेश सू. शेवाळकर हे होते तर प्रमुख उदघाटक म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. हनुमंत भोपाळे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत, पक्षिमित्र तथा साहित्यिक सुंदरसिंग साबळे आणि उपक्रमशील शिक्षिका व लेखिका सौ. रुपाली गोजवडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या ऑनलाईन ई बु