पोस्ट्स

वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर ! कलागुरूच्या स्मृतींना दोन विश्वविक्रम अर्पण !! विश्वविक्रमच्या अमी छेडा यांच्या हस्ते संजय देवधर यांचा प्रमाणपत्रासह सन्मान !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर      कलागुरु पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतीला मी दोन विश्वविक्रम अर्पण केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वारली चित्रस्पर्धेतील सर्वाधिक सहभागाची 'वंडरबुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल'मध्ये नोंद झाली. यावेळी वारली चित्रांच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात आली. त्याची दखलही 'जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड्स'ने घेतली व एकाच उपक्रमात माझे दोन विश्वविक्रम साध्य झाले. नाशिकमधील आर.पी.विद्यालयात झालेल्या या सोहळ्याला लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, पंचवटी एज्युकेशन सोसायटी आणि जैन सोशल ग्रुप यांचे प्रायोजकत्व व सहकार्य लाभले. त्यामुळेच आदिवासी वारली चित्रशैलीवर विश्वविक्रमांची मोहोर उमटली.     वारली चित्रशैलीद्वारे गुरुवर्य पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य 'ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धे'चे आयोजन केले. २२ ऑगस्ट २०१८ रोजी पंचवटीतील आर.पी. विद्यालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत ही स्पर्धा रंगली.सुरुवातीला साधारणपणे १ हजार स्पर्धक सहभागी होतील असे ठरविण्

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन !

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

इमेज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी  डांगी भाषेत  केलेले आवाहन !!

क्यूआर कोड स्कॅन करा आणि चित्रफीती बघा ! कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांचे डांगी आणि अहीराणी भाषेत आवाहन ! जनजागृती साठी आंतरराष्ट्रीय धावपटूही करणार प्रबोधन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची जनजागृती मोहीम ! मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे डांगी व अहिराणी भाषेतून आवाहन तर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत देखील करणार प्रबोधन          नाशिक - जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा आहेत, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसिकरणासाठी पुढे येतांना दिसत नव्हते त्याचबरोबर कोरोना उपचारांबाबत या भागात अनेक गैरसमज पसरले असल्याने कोरोना उपचार घेण्यास टाळा-टाळ करतांना काही ठिकाणी आढळले, यावर जनजागृती करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोरोना उपचार जनजागृती ही विशेष मोहीम जिल्हा परिषदेच्या वतीने आमलात आणली गेली असुन यामार्फत लसीकरण झालेल्या नागरिक त्याचबरोबर कोरोना वैद्यकीय उपचार घेतलेल्या नागरिकांचे अनुभव, जिल्हा परिषद शाळा उंबरपाडा ता.सुरगाणा येथील शिक्षक रतन चौधरी यांचे लस घेण्याबाबतचे आवाहन याविषयी चित्रफिती तयार करण्यात आल्या असुन समाजमाध्यमांद्वारे या जनजागृतीपर चित्रफितींची प्रचार प्रसिद्ध केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या सर्व चित्रफिती

वसंत वसंत लिमयेंच्या 'लॉक ग्रिफिन' चा विस्तृत कॅनव्हास ‘ऑडिओबुक’ मध्ये 'स्टोरीटेल' वर ! एक वेगळा, नवा प्रवाह ठरलेली कादंबरी !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वसंत वसंत लिमयेंच्या 'लॉक ग्रिफिन' चा विस्तृत कॅनव्हास ‘ऑडिओबुक’ मध्ये 'स्टोरीटेल' वर ! 'लॉक ग्रिफिन' ही वसंत वसंत लिमये यांची अत्यंत उत्कण्ठावर्धक रोमांचकारी कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ च्या लोकप्रिय ऑडिओबुक श्रेणीत स्वतः लेखक वसंत वसंत लिमये धीरगंभीर आवाजात प्रदर्शित होत आहे. मराठी साहित्यातील एक वेगळा नवा प्रवाह ठरलेली ही कादंबरी श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार असून ती रसिकांना 'स्टोरीटेल' ने उपलब्ध करून दिली आहे. आयआयटीमधून बीटेक पदवीधर असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांच्या नावापासूनच होतो. १९९१-९२ या कालावधीत लेखक वसंत वसंत लिमये अपघातानंच मुंबईच्या एका सायंदैनिकात 'धुंद स्वच्छंद' स्तंभ लिहून लेखनाकडे वळले. या लेखांवर आधारित १९९४ साली पाहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर 'लॉक ग्रिफिन' ही त्यांची पहिली कादंबरी २०१२ 'ग्रंथाली' ने प्रकाशित केली. त्यानंतर त्यांच्या 'कॅम्पफायर', 'विश्वस्त' या कादंबऱ्याही 'लॉक ग्रिफिन' प्रमाणे भव्यदिव्य असल्याने लोकप्रिय ठरल्या आहेत. 'लॉ

जिल्हा रुग्णालयात सक्शन युनिटमध्ये बिघाड झाल्याने मोठमोठ्याने आवाज आला होता, तांत्रिक मदनीसांनी तत्काळ समस्या सोडवली आहे - अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक::- जिल्हा रुग्णालय  नाशिक मध्ये आज रात्री साडेनऊच्या सुमारास ३ सक्शन युनिटपैकी एका युनिटमध्ये  बिघाड झाल्याने मोठमोठ्याने आवाज झाला. त्यामुळे ड्यूटीवर असलेला नर्सिंग कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक आणि सरकार वाडा पोलीस स्टेशन यांना तात्काळ कळविले. तांत्रिक मदनीसांनी येऊन तत्काळ समस्या सोडवली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नसून सर्व रुग्ण व्यवस्थित उपचार घेत आहेत,  प्रशासकीय यंत्रणा सजग असून कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असा खुलासा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ के आर श्रीवास यांनी केला आहे.        सदर सक्शन युनिटचा आणि ऑक्सिजनचा काही एक संबंध नसुन ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना कुठल्याही प्रकारची इजा नाही. तसेच सक्शन युनिट आणि ऑक्सिजन हे दोघे वेगळी बाब असल्याने कोणताही गैरसमज करू नये असे ही त्यांनी सांगितले.

"ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास.". निशा डांगे यांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मविश्वास बाबत सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आत्मविश्वास हे यशाचे गमक          आत्मविश्वास हे तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या यशाचे गमक आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमची अर्धी लढाई आधीच जिंकलेली असते. आत्मविश्वास म्हणजे काय? तर सध्या सरळ असे म्हणता येईल, "आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवर असलेला विश्वास." स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही तुमचे मन वांच्छिल ध्येय मिळवू शकता. आत्मविश्वासाला आता व्याख्येत बसवू या, "ध्येयप्राप्ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यास मनाची जी अवस्था तुम्हाला प्रेरणा देत असते ती म्हणजे आत्मविश्वास."          आत्मविश्वास असणारी व्यक्ती जग जिंकू शकते. प्रबळ आत्मविश्वास अर्थात स्वतःकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी होय.  तुम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून स्वतःकडे पहाल तर तुम्हाला तुमच्यात अनेक क्षमता दिसतील. स्वतःचे सामर्थ्य जाणून घेतले तरच आपण आपले वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतो. "जीवनाच्या लढाईत यशस्वी बनण्याचे ब्रह्मास्त्र म्हणजे आत्मविश्वास"              आत्मविश्वास ही एक मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती आहे. आत्मविश्वासाने माणसात वैचारिक स्वातंत्र्य निर्माण होते. व्यक्ती कुठल्याही कठी