निसर्गाशी मानवाचे असलेले अतूट नाते हेच त्यांच्या चित्रांचे अधिष्ठान व भावविश्व ! सचित्र पर्जन्यसूक्त !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
सचित्र पर्जन्यसूक्त पावसाळ्याच्या प्रारंभी जून, जुलै महिन्यात आदिवासी वारली चित्रकार पावसाची, शेतीची, पावसात नाचणाऱ्या मोरांची चित्रे काढतात. झोपडीच्या भिंतीवर अशी चित्रे काढण्यामागे चांगले पीक तयार होऊन अन्नधान्याने समृद्धी यावी, हा प्रामाणिक उद्देश असतो. निसर्गावर त्यांची अपार श्रद्धा आहे. वारली जमात पावसारंभी जणू एका तालासुरात सचित्र पर्जन्यसूक्त गात असते. ढगातून जमिनीवर येणाऱ्या पावसाच्या धारा अन् सरी, आनंदाने थुईथुई नृत्य करणारे मोर, आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, शेतातील पेरणी, शेतकऱ्यांची लगबग, गुरेढोरे, शेतीची अवजारे व निसर्गाची विविध रूपे यांचा चित्रांमध्ये समावेश असतो. केवळ पांढऱ्या रंगात रंगविलेल्या इंद्रधनुष्यात सप्तरंगांची उणीव भासत नाही हे विशेष ! आदिवासी वारली जमात शेतीसंस्कृती जपते. त्यांच्या जगभर लोकप्रिय झालेल्या चित्रसंस्कृतीलाही ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळेच वारली चित्रशैलीत शेतात काम करणारे स्त्रीपुरुष, झाडेझुडपे, विहिरी, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक अशा शेतीला उपयुक्त घटकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. निसर्गाशी मानवा