पोस्ट्स

क्रांती कांबळेला विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
क्रांती कांबळेला सुवर्णपदक जाहीर -------------------------------------------------         उस्मानाबाद (२९)::- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकासाठी उस्मानाबाद येथील क्रांती पंडित कांबळे ही पात्र ठरल्याचे  विद्यापीठाने जाहीर केले आहे.        क्रांती कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय( वनामकृवि) लातूर येथून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी( कृषी जैवतंत्रज्ञान) शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. ती चारही वर्षे महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे .एकूण गुण( सीजीपीए) ८. ९४ घेऊन ती प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह विद्यापीठातून प्रथम आली आहे. तिला सुवर्णपदक (सुवर्ण मुलामित ) व गुणवत्ता प्रमाणपत्र २३ व्या दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कळविले आहे.        क्रांती कांबळे हिचे सर्व शिक्षक, कुटुंबीय ,नातेवाईक ,आप्तेष्ट यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आ

प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड       चांदवड::-(वार्ताहर): श्री.नेमिनाथ जैन संस्थेच्या आबड-लोढा-जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्राचार्य जैन हे नॅनो सायन्स विषयात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत.महाराष्ट्र शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून यापूर्वी गौरव केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आदर्श शिक्षक आणि आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. नायजेरिया विद्यापीठांशी महाविद्यालयाचा त्यांनी करार करून चांदवड महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांचे १२ विद्यार्थी हे पीएचडी धारक असून ३ विद्यार्थी पीएचडी प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चांदवड महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विषयासाठी पीएचडी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीचे अधिकृत पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्राचा

आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल: आर्थिक विकास होत असताना असमानतेकडे बोट दाखवणाऱ्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे संकुचन झाल्याने श्रीमंतांपेक्षा मध्यमवर्गीय आणि गरिबांना जास्त त्रास झाला, हे समजून घेतले पाहिजे ::- कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

इमेज
मुक्त व्यापार आणि आर्थिक विकासाचे समर्थन या गोष्टी शतकानुशतके भारतीय साहित्याचा भाग आहेत :कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल: कृष्णमूर्ती सुब्रमण्यम मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाचा शताब्दीवर्ष सोहळा संपन्न            आर्थिक विकासासाठी मुक्त व्यापाराला चालना आणि आणि मुक्त व्यापाराचे समर्थन या गोष्टी आपल्याला पाश्चिमात्यांनी शिकवलेल्या नसून त्या भारतीयांच्या जीवनशैलीचा गेली शतकानुशतके भाग आहेत. आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पाहतो की राजाला व्यापारावरील सर्व प्रकारची बंधने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.         त्यामुळेच आपण आर्थिक सुधारणांच्या तत्त्वज्ञानामध्ये संपत्ती निर्माण करण्याकडे एक वरदान म्हणून पाहतो असे प्रतिपादन भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना केले.          ते पुढे म्हणाल

एका स्मृतिदिनाची मैफील ! रसिकांनी घेतला घरबसल्या रफीयुगातील गाण्यांचा आनंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
रसिकांनी घेतला घरबसल्या रफीयुगातील गाण्यांचा आनंद     नाशिक ( प्रतिनिधी ) सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना तीन दशके मोहून टाकले. तो एक दैवी चमत्कार होता. शनिवारी रंगलेल्या मैफलीचा आनंद रसिकांनी घरबसल्या घेतला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुरेल रफीयुगाची प्रचिती त्यातून नव्या पिढीला आली.    नाशिकचे घन:श्याम पटेल रफीभक्त आहेत. शनिवारी ( दि.३१) सुरेल स्वरांचा बादशहा मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. खास त्यानिमित्ताने स्वरगंध प्रस्तुत ' वो जब याद आये ' या मैफलीचे आयोजन करण्यात आले.  दुपारी ४ वाजता या मैफलीचा आनंद फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रसिकांना घरबसल्या घेता आला. मैफलीत घन:श्याम पटेल यांच्या बरोबरच अमित गुरव,स्मिता पांडे, उषा मोदी या गायक, गायिकांचा सहभाग होता. पटेल व त्यांचे सहकारी गेली ५ वर्षे ३१ जुलैला प. सा. नाट्यगृहात कार्यक्रम सादर करायचे. यंदाही त्यांचा तसाच प्रयत्न होता. मात्र कोविडमुळे ते शक्य झाले नाही.पण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वरगंध घरोघरी पोहोचला.        वो जब याद आये या पारसमणी चित्रपटातील गाण्याने मैफलीच

येत्या 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान डिजिटल पेमेंट सुविधा –ई रूपी चे उद्घाटन करणार

इमेज
येत्या 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान डिजिटल पेमेंट सुविधा –ई रूपी चे उद्घाटन करणार नवी दिल्‍ली(३१)::-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 2 ऑगस्ट रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ई-रूपी या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन होणार आहे.         पंतप्रधानांनी कायमच डिजिटल उपक्रमांचे स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षात, देशातील विविध योजनांचे लाभ निश्चित लाभार्थ्यापर्यंत पोचावेत, त्यातील गळती आणि भ्रष्टाचार थांबावा हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने विविध कार्यक्रम आणि उपाययोजना केल्या आहेत. त्यातही सरकार आणि लाभार्थी यांच्यादरम्यान कमीतकमी मध्यस्थ यंत्रणा असाव्यात असे प्रयत्न करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हाउचर–म्हणजेच ई-पावतीची संकल्पना याच सुशासनाच्या संकल्पनेला पुढे नेणारी ठरली आहे.  ई-रूपी विषयी       ई-रूपी ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल पेमेंट सुविधा आहे. ही कयूआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. या सोप्या एकरकमी (वन टाइम)  पैसे देण्याच्या प्रणालीच्या वापरकर्त्याना यांची पावती, सेवा प्र

चिपळूण पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावले नासिकचे मनसैनिक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
चिपळूण पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावले मनसैनिक.   नाशिक : ढगफुटी व वसिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे कोकणातील चिपळूण, महाड, खेड, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी भयानक पुरस्थिती उद्भवली आहे. ढगफुटी मुळे खचलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  आदरणीय राजसाहेब ठाकरे  यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सैनिकांना तातडीने पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. मनसेचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सर्व मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळून जवळपास ७००० किलो तांदूळ, २५०० पेक्षा अधिक पाणी बाटल्या, दीड हजार ब्लेन्केट, सेनीटरी नेपकीन्स, सेनिटायझर, फिनाईल, बिस्कीट, फरसाण, बेसन, पीठ आदि साहित्य घेऊन याचे वाटप व्यवस्थित होण्यासाठी व तेथील पूर परिस्थीतीची पाहणी करून मदत कार्यात सहाय्य करण्याच्या उद्देशाने नाशिक मनसेचे पदाधिकारी चिपळूणला गेले आहेत. खेड येथील मनसे शहराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः तेथील परिस्थितीची प

एक हात मदतीचा ! रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्तांना नाशिक जिल्हा परिषदेचा " माणुसकीचा " आधार !

इमेज
रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्तांना नाशिक जिल्हा परिषदेचा "माणुसकीचा" आधार    नाशिक (३१)::- महाराष्ट्र राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापुर व काही प्रमाणात सोलापुर जिल्ह्यामध्ये पुर पाण्यामुळे मोठ्या शहारांसह छोट्या मोठ्या गावांना पुर पाण्याने वेढा दिला, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांवर पावसाच्या अति वृष्टीमुळे डोंगराची दरड कोसळुन संपूर्ण गाव जमीनदोस्त झाले. या अस्मानी संकटामुळे अनेक कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडली, या कुटुंबांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मदतीचे आवाहन केले व रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करत परिस्थितीची माहिती घेतली , त्याच बरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी दरड कोसळून जमिनीखाली दाबलेल्या तळीये गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधत आवश्यक मदतीचा तपशील घेतला व त्याद्वारे नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत पदाधिक

वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद ' पितामह पद्मश्रींचा आशीर्वाद ' वारली चित्रशैलीचा आस्वाद सर्वांनी घ्यावा ' !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसे स, नासिक,  7387333801 ******************************** वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद '     चित्रकार आणि पत्रकार या नात्याने विविध ललित कलांचा परामर्श मला घेता आला. वास्तववादी चित्रणशैलीपासून आजच्या डिजिटल पेंटिंगपर्यंतची अनेक स्थित्यंतरे मी अनुभवली. मात्र चाळीस वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत, आदिवासी वारली चित्रशैलीने मोहून घेतले. याच कलेवर लक्ष केंद्रित करून संशोधनात्मक अभ्यास केला. वारली कलेचा व्यापक आवाका, त्यातली क्षमता सामोरी आली. प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे समृद्ध संचित रसिकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने २००८ मध्ये 'वारली चित्रसृष्टी' हे पुस्तक माझ्याच 'कल्पक प्रकाशना'तर्फे प्रकाशित केले. नंतर 'वारली आर्ट वर्ल्ड' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रसिद्ध झाले. शब्द आणि चित्रांचा सुरेख समन्वय त्यातून साधता आला. आज जागतिक मैत्री दिन आहे. पुस्तकांशी केलेली मैत्री कायमच समृद्ध करते.     आतापर्यंत माझ्या 'वारली चित्रसृष्टी' या पुस्तकाच्या चार तर 'वारली आर्टवर्ल्ड'च्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रत

जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ! जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द !! नासिक(२९)::-सर्वांना गेली दिड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना मागील आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. या पुरग्रस्त भागातील जनतेचे जीवनमान उध्वस्त झाले आहे. अशा भयावह परिस्थितीचा विचार करून संघटनेचे माजी अध्यक्ष स्व.माधवराव भणगे साहेब यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु.२५०००/- (अक्षरी रु. पंचवीस हजार) रक्कमेचा धनादेश नासिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.   याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव(बाबा) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, संघटक प्रमुख ज्ञानेश्वर कासार सुभाष कंकरेज, राजेंद्र अहिरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
NEWS MASALA SERVICES, NASHIK, 7387333801 ********************************** ' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज !              शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रकलेला अलीकडे भरपूर मागणी वाढली आहे. पूर्वी आदिवासी पाड्यांवरील झोपड्यांच्या भिंतीपुरत्या मर्यादित  स्वरूपातील या कलेने, आता मोठेच फॅशनेबल रूप धारण केले आहे. वारली चित्रे विविध वस्त्रप्रावरणांवर अधिराज्य गाजवताना दिसतात. सध्या वारली प्रिंट असलेले ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ती, लेगिंग्ज तसेच लहान मुलांचे, तरुणांचे टी शर्टस् मार्केटमध्ये हिट आहेत. याशिवाय बेडशीट्स, स्कार्फ, पडदे आणि हँडबॅग्स, पर्सेस, फोल्डर्स, पाऊच देखील वारली चित्रांनी सजतात. मागणी तसा पुरवठा या न्यायाने बाजारपेठेत वारली डिझाईन्सचा मोठा ट्रेंड  निर्माण झाला आहे. मात्र बऱ्याचदा अशी वारली डिझाईन्स जाणकार आणि मूळ शैलीशी बांधिलकी असणाऱ्या कलाकारांकडून करून न घेतल्याने, वारलीच्या नावाखाली काहीही खपवले जाते. कलेला येणारे हे विकृत स्वरूप मारक ठरते. रेखाटनाचे असले भलतेच 'फ्युजन'  केवळ  'कन्फ्युजन' निर्