पोस्ट्स

वारली चित्रशैलीच्या लेखमालेचा मागोवा

इमेज
वारली चित्रशैलीच्या लेखमालेचा मागोवा (भाग पहिला)     आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास, संशोधन करून मी ४ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली. एखाद्या कलेचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढच्या काळात मला जे जे नवनवे गवसले त्याची सचित्र लेखमाला लिहावी अशी कल्पना मनात आली. ती अनेकांनी उचलून धरली. दैनिक हिंदुस्थान, साप्ताहिक न्यूज मसाला तसेच इतरही काही नियतकालिकांमध्ये गेली दोन वर्षे ही लेखमाला सुरू आहे. त्यामुळेच मला अनेक वाचकांपर्यंत पोहोचता आले.प्रत्येक लेखासोबत एक लक्षवेधी चौकट दिल्याने वाचनीयता वाढली. पुढील महिन्यात ५१ नव्या लेखांचा माझा संकल्प पूर्ण होईल. या लेखमालेतील महत्त्वाच्या लेखांचा आवाका मोठा असल्याने, तीन भागांत आढावा घेतांना आनंद होत आहे.वारली चित्रशैलीत देवचौक, तारपानृत्याचे चित्रण व मोर यांना महत्वाचे स्थान आहे.      या लेखमालेतील लेखांची शीर्षके जरी बघितली तरी विषय- आशयाची विविधता लक्षात येईल. निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार, चैतन्यशील वारली चित्रे, धवलेरीची कला,  स्त्रीशक्तीची अभिव्यक्ती, सामूहिक वृत्तीची कलाकृती, वारली कलेचा शोध

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ! नासिकच्या छायाचित्रकार प्रशांत खरोटे तोलाराम कुकरेजा राज्यस्तरीय पुरस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर      बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई यांना देण्यात आला आहे           मुंबई, दि. 14 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई यांना देण्यात आला आहे           राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.           51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे. पुरस्कार खालीलप्रमाणे : वर्ष-2019 – बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप क

यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे ! आज अवयवदान दिवसानिमित्त मुंबईतील ग्लोबल हाॅस्पिटल आयोजित नासिकमधील रुग्णांसह भेटीच्या कार्यक्रमाचा खास वृत्तांत !!

इमेज
यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे !      नाशिक (प्रतिनिधी१३)::- अवयवदान दिवस म्हणून साजरा केल्या जाणा-या १३ ऑगस्ट रोजी मुंबईमधील परेल भागातल्या ग्लोबल हॉस्पिटल या मल्टी-स्पेश्यालिटी हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये नाशिकमधील यकृत प्रत्यारोपणाच्या रुग्णांसोबत (दाते आणि प्राप्तकर्ते) भेटीगाठीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इगतपुरी येथे राहणा-या ५० वर्षीय आल्थिया परेरा यांना २०१७ मध्‍ये यकृताची गरज निर्माण झाली; त्याप्रसंगी त्यांची २२ वर्षीय मुलगी लिसा परेरा अवयवदाता म्हणून पुढे आली. एका शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक आणि विश्वस्त असलेल्या श्रीम. आल्थिया आपल्या आजारातून पूर्णपणे ब-या झाल्या व आपल्या लाडक्या कार्यक्षेत्रात पुन्हा रुजू झाल्या. त्यांना आपले यकृत देऊ करणारी त्यांची मुलगी लिसा हिचे २०२० च्या ऑगस्ट महिन्यात लग्न झाले आणि आज ती एका ८ महिन्यांच्या बाळाची आई आहे. आजारपणामुळे विस्कटू पाहणारी या दोघींच्याही आयुष्याची घडी पुन्हा एकदा बसली आहे व त्यांचे जगणे प

माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी! प्रभाकर येरोळकर यांचा मरणोत्तर लेखसंग्रह " साप्ताहिकी " कुटुंबिय व चपराक प्रकाशनाकडून १४ आॅगस्ट ला प्रकाशित होत आहे ! तुम्हारे याद के, जख्म भरने लगते है, आप को पढ़ने के बहाने तुम्हे, याद करने लगते है। नागेश शेवाळकर यांनी लिहीलेले वाचनीय दोन शब्द !!

इमेज
माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी!         'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' हे कुण्या संस्थेचे ब्रीदवाक्य नव्हे तसेच तो कुणाचा प्रण नाही तर तो ध्यास आहे, पुण्यातील एका नामांकित साहित्य प्रकाशन संस्थेचा! घनश्याम पाटील ह्या तरुणाने 'किशोर' वयात 'चपराक' प्रकाशनाची निर्मिती केली. निर्मितीपासूनच पाटील एक गोष्ट सातत्याने करीत आहेत ती म्हणजे 'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' साहित्य निर्मितीची! लेखक मग तो जुना असो, प्रतिष्ठित असो की नव्याने लिहिणारा असो. ज्या लेखकाजवळ उत्कृष्ट साहित्य आहे हे समजायला अवकाश घनश्याम पाटील हे त्या लेखकाचा शोध घेतात आणि ते साहित्य वाचक दरबारी अत्यंत आकर्षक स्वरुपात सादर करतात.        बाह्यरंग हे कोणत्याही पुस्तकाचे महत्त्वाचे अंग असते. पुस्तक हातात घेतल्यानंतर मुखपृष्ठ असेल, कागद असेल, अक्षरांचा आकार असेल, साहित्याची मांडणी असेल ह्या बाबी वाचकांना आकृष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चपराक प्रकाशन, पुणे यांची पुस्तके पाहिली म्हणजे बाह्यरंग किती महत्त्वपूर्ण ठरतात याची कल्पना येते. या कोणत्याही बाबतीत तडजोड करायची नाही ही महत्त्वाकांक

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात !    नासिक(१२)::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक परिसरातील गरजू अंध कुटुंबांना अन्नधान्याचे संस्थेच्यावतीने वाटप करण्यात आले तसेच नाना काळे यांच्या मित्र परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.          ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड ही संस्था गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली नासिक व नासिकबाहेरील ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींची सेवा करीत आहे. या संस्थेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मोफत निवासी संगणक केंद्रातून गेल्या वर्ष पर्यंत ५७ अंध मुलींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १७ ते १८ मुलींना सरकारी व खासगी कार्यालयात रोजगार मिळाला आहे. तसेच गेल्यावर्षापासून कोरोना महामारी चे संकट असल्याने अनेक स्वयंरोजगार

हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग ! नासिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ई - स्कुटरची निर्मिती !! अवघ्या १५ ते २० रुपयांत ९० किलोमीटर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग !  नाशिक ( प्रतिनिधी ) :- हयासा ई - मोबिलिटी प्रा. लि. कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग करण्यात आले. हयासा कंपनी नाशिकमध्ये ओजस, दक्ष, इरा आणि निर्भर या चार आकर्षक मॉडेल्सची निर्मिती करीत आहे. हयासा म्हणजे वेग ! आता वेगाचा अनुभव वाहनधारकांना या चार मॉडेल्सद्वारा घेता येईल. दिंडोरी येथे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या ई - वाहनांच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात वितरण व्यवस्था उभी राहील.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.          हयासा ई - मोबिलिटी कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा निश्चितच आनंद वाटतो. ओजस व दक्ष या स्कुटर्स तरुणाईला भुरळ घालतील. ' इरा ' हे मॉडेल विशेषतः महिलांना आकर्षित करेल. निर्भर हे मॉडेल व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल. कंपनीचे उत्पादन दिंडोरी या आदिवासी व अतिदु

आदिवासी पाड्यांवरील ५८ शाळांतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ! ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ ! मुंबई च्या अमास सेवा ग्रुप चा उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ !         नाशिक ( प्रतिनिधी ) - अमास सेवा ग्रुप, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-घोटविहिरा व इतर शाळेतील विद्यार्थ्याना काल शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.  आपल्या कर्तृत्वाने जनमानसात समाजसेवेने व सामाजिक कार्याने सुगंधीत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अमास सेवा ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांतभाई देढीया व विजय भगत त्यांच्यातर्फे जि.प.प्राथमिक शाळा-घोटविहिरा, पिंपळवटी, घोसाळी, गांवधबर्डा व पळशी या शाळेतील विद्यार्थ्यांना व पेठ,दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यातील ५‌‌८ शाळेतील ३५१४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.     कोविडच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. अशा कालावधीत गरीब गरजू विद्यार्थ्यांना अमास सेवा ग्रुप मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य दिल्याने ' शाळा बंद पण शिक्षण सुरु ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच मदत होईल. त्यामध्ये वह्या, पेन व इतर लेखन साहित्याचा समावेश आहे. या उपक्रमाला हरिश्चंद