पोस्ट्स

१९ ऑक्टोबर भारताचे नाव उज्वल करणारे संख्याशास्त्रज्ञ : डॉ. शरद्चंद्र श्रीखंडे यांच्या जयंतीनिमित्त,,,,,,,. संख्याशास्त्राचे सहयोगी प्रा. विजय कोष्टी यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
१९ ऑक्टोबर भारताचे नाव उज्वल करणारे संख्याशास्त्रज्ञ : डॉ. शरद्चंद्र श्रीखंडे यांच्या जयंतीनिमित्त,,,,,,,           संख्याशास्त्रांच्या प्रमेयांची नवी उकल करून आधुनिक विज्ञानशाखांचा रस्ता सोपा करणारे,  जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. शरदचंद्र श्रीखंडे यांचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन.  लिओनार्द ऑयलर या अठराव्या शतकातल्या जागतिक कीर्तीच्या स्विस गणितज्ञाने १७८२ मध्ये केलेल्या लॅटिन चौरसाच्या उकलीतल्या मर्यादा, ज्या १७७ वर्षे कोड्यात टाकत होत्या, त्या १९५९ मध्ये डॉ. श्रीखंडे यांनी आर. सी. बोस आणि ई. टी. पार्कर यांच्यासमवेत स्पष्ट केल्याच्या  महत्वपूर्ण घटनेची बातमी रविवार, २६ एप्रिल १९५९ रोजीच्या न्युयॉर्क टाइम्स च्या पहिल्या पानावर आली होती. हे त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधन. याशिवाय डॉ. श्रीखंडे यांनी शोधून काढलेला १६ शिरोबिंदू (व्हर्टायसेस), ४८ बाजू (एजेस्) आणि ६ डिग्री (प्रत्येक शिरोबिंदूला ६ बाजू येऊन मिळतात) असलेला ‘श्रीखंडे आलेख’ नावाने ओळखला जाणारा आलेख कोडिंग सिद्धान्त, क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सिद्धान्त, प्रयोग संकल्पन किंवा अभिकल्प (डिझाइन ऑफ एक्सपेरिमेंट्स) आदी क्षेत्रात उपय

नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही...! जपानी रसिकांची वाहवा मिळवणारा राजेश मोर !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नावातल्या 'मोराचा' डौल चित्रांमध्येही...    "मी जंगलात राहातो आणि त्याचाच  एक अविभाज्य  भाग आहे. झाडंझुडुपं, वेली, शेती, पशुपक्षी यांच्याशी माझं अतूट नातं आहे. आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. मी त्या साऱ्यांचा प्रतिनिधी असून त्यांच्याच भावना चित्रातून व्यक्त करतो. आडनावाप्रमाणेच मोरासारखा डौल माझ्या कलेत यावा म्हणून मी प्रयत्नशील असतो, सुदैवानं त्यात यशस्वीही होतो. बारीक नक्षीकाम आणि आकारांची सुंदर गुंफण हे इतरांच्या दृष्टीतून जाणवणारं माझ्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे", असं वारली कलाकार राजेश मोर आवर्जून सांगतो. मोरांची चित्रे ही तर त्याची खासियत आहे. त्याने अनेकरंगी वारली चित्रे रेखाटण्याचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.    डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या दुर्गम पाड्यावर १९८२ साली राजेश लक्ष्मण मोर याचा जन्म झाला. वडील भगताचे काम करायचे. आई बानीबाई झोपडीच्या भिंती वारली चित्रांनी सजवायची. तिला व वडिलांना लग्नघरी चौक लिहायला बोलवायचे. छोटा राजेश आईला मदत करता करता वारली चित्रशैली शिकला. जवळच्या कासा गावातील आश्रमशाळेत राहून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तो

संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार.            वाडीव-हे::-मोबाईल वरील समाजमाध्यमामुळे नव्वद टक्के पीढ़ी वाचन संस्कृति पासून दूर गेली आहे, समृद्ध जीवन जगण्यासाठी पुस्तकांचे वाचन अतिशय महत्वाचे आहे. स्वताचे जीवन, आपले संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील त्यासाठी पुस्तकेच मार्गदर्शक ठरतील, त्यासाठी पुस्तकांना गुरु स्थानी ठेवून आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवता येईल असे प्रतिपादन वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार यांनी केले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात एका परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.      वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन "वाचाल तर वाचाल" या विषयावर पोतदार यांनी मार्गदर्शन केले तर "मराठी भाषेचे महत्व आणि संवर्धन" या परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रथमता प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांनी ग्रंथालयाचे मह

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन !        नाशिक प्रतिनिधी : सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोसत्व नाशिकमध्ये होतो आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकपासून या महोत्सवाची सुरुवात होऊन, महाड पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. दादांच्या सांस्कृतिक क्षेत्रांतील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून तसेचं लोकांपर्यंत त्यांची गाणी व  विचार पोहचवणे हा या कार्यक्रमामागील संयोजकांचा मानस आहे. नाशिक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. तीन सत्रात संपन्न होणा-या या महोत्सवात विविध मान्यवर वामनदादांंच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा गीत-काव्य आणि व्याख्यानातून मांडणार आहेत. पहिल्या सत्रात, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ. संजय मोहड हे वामनदादांच्या गीतांचा 'गीत भीमायन' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शाहीर मेघानंद जाधव (औरंगाबाद) हेदेखील यावेळी दादांची गीत

ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! नासिक::- शासकीय घरकुल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाचे प्रकरणाचा अहवाल फिर्यादी यांचे बाजूने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी २७५००/- रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी लोकसेवक चंद्रकांत पाटील ग्रामसेवक दहेगाव (म) ता. चांदवड यांस रुपये २५०००/- लाचेची मागणी करून लाच  स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरूद्ध चांदवड पोलिस ठाण्यात ५७४/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

अनिल चैत्या वांगड एक प्रतिभावान शिष्योत्तम ! वारली चित्रशैली म्हणजे मातीचा सन्मान !!

इमेज
प्रतिभावान  शिष्योत्तम                "आदिवासी वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची ज्ञात परंपरा आहे. या कलेला समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी, वारसा आणि स्थानिक भौगोलिक संदर्भ आहेत. माझे गुरू पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्यामुळेच वारली कलेला नाव आणि वैभव प्राप्त झाले. ते टिकवून अधिक उंचीवर नेण्याचे काम माझ्यासह नव्या पिढीने करायचे आहे. सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेतून मी त्यांच्याकडे शिकलो. सध्याची व्यावसायिकता व अर्थकारणाच्या रेट्यामुळे एकूणच कलाविश्वात परिवर्तन अपरिहार्य आहे. मात्र तरीही विचारात सुस्पष्टता असेल तर वारली चित्रशैली विशुद्ध स्वरुपात टिकवणे शक्य होईल", असा अभिप्राय मशे यांचे प्रतिभावान शिष्योत्तम अनिल वांगड व्यक्त करतात.                अनिल चैत्या वांगड यांचा जन्म १९८३ साली डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या वांगडपाडा येथे झाला. नववीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण झाल्यावर परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडले. पुढे सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेत जिव्या सोमा मशे यांच्याकडे अनिल यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. आत्मसात केलेल्या कलेला त्यांनी आपल्या प्रतिभेने अधिक

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर ! नासिक जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तात्याराव लहाने, दिशा प्रतिष्ठान सह ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर तात्याराव लहाने, प्यारे खान, अमितेशकुमार, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान, यांच्या सह राज्यातील ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ तारखेला मुंबईत गौरव.     मुंबई - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज येथे केली. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत सह्याद्रि अतिथीगृह येथे सायंकाळी ४.०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३० मान्यवरांना स्मृतिचिन्ह व कृतज्ञतापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कृषि राज्य मंत्री डॉ. विश्वजित पतंगराव कदम हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार विजेत्यांची नावे अशी,